शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येरवडा (पुणे) या संस्थेला सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने आवश्यक असून इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

या वसतिगृहामध्ये इयत्ता 11 वी ते 12 वी आणि पदविकापर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींना मोफत प्रवेश दिला जातो. या संस्थेसाठी 5 हजार ते 5 हजार 500 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाची इमारत आवश्यक असून त्यामध्ये किमान 20 ते 25 खोल्या, 10 संडास, 10 बाथरुम, वीज, पिण्याचे पाणी, पाणी साठवणुकीची सोय आदी सुविधा तसेच इमारतीभोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे.

इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या पुणे शहराच्या जवळपासच्या भागातील इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे (दूरध्वनी 020-29706611) अथवा गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, येरवडा पुणे 06 (भ्रमणध्वनी क्र. 9561568459) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.