
सर्व मुंबईकरांना पाणी देण्याच्या महापालिकेच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या जल अभियंता खात्याकडून सर्व निवासी जागांना पाणीपुरवठा करण्याबाबतचे धोरण प्रस्तावित आहे. हे धोरण महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
आले आहे. मुंबईकरांनी या धोरणाबाबत अभिप्राय व सूचना [email protected] या ई-मेल आयडीवर 22 एप्रिल 2022 पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in -> In focus -> find out more -> quick links -> water for all या मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळांना भेट द्यावी.
























































