
तुम्ही जर अॅपल आयफोन किंवा अन्य अॅपल डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Amazon वर ‘अॅपल’ सेलची सुरुवात झाली आहे. यामध्ये iPhone 11, iPhone 7, iPads आणि MacBooks सहित अनेक अॅपल प्रोडक्ट्सवर ऑफर देण्यात येत आहे. या सेलची सुरुवात झाली असून ग्राहक 16 डिसेंबरपर्यंत याचा लाभ घेऊ शकतात.
सेलअंतर्गत iPhone 11 ची विक्री 51,999 रुपयांना केली जात आहे. तसेच येस बँकेच्या ट्रांजेक्शनसह ग्राहकांना 1,750 रुपयांची अतिरिक्त सवलत दिली आहे. या सेलमध्ये iPhone 7 ची विक्री 23,999 रुपयांमध्ये केली जात आहे.
ग्राहकांना iPad Mini वर 5,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तसेच एचडीएफसी बँक डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंतची त्वरित सवलत मिळू शकेल.
Amazon वर एचडीएफसी बँक डेबिट व क्रेडिट कार्ड आणि नो-कोस्ट ईएमआय ट्रांजेक्शनवर MacBook Pro मॉडेलवर 6,000 हजार रुपयांची सवलत मिळत आहे. iPhone 12 mini आणि iPhone 12 वर या सेलमध्ये एचडीएफसी कार्डवर 6,000 रुपयांची सवलत मिळत आहे. तसेच iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max वर 5,000 रुपयांची सवलत मिळत आहे.



























































