आयफोनची विक्री घटली; अ‍ॅपल कंपनीचे नुकसान

1010

अ‍ॅपल कंपनीच्या आयफोनची विक्री घटल्याने कंपनीच्या वार्षिक तिमाही नफ्यात 3 टक्के घट झाली आहे. अ‍ॅपल कंपनीचा नफा 92 हजार 270 कोटी इतका झाला आहे.

आयफोनने बुधवारी तिमाही उत्पन्न घोषित केले. त्यानुसार आयफोनची विक्री जुलै ते सप्टेंबर या काळात 9 टक्क्यांनी कमी होऊन 33.4 अब्ज डॉलर म्हणजे 2.37 लाख कोटी रुपये एवढी झाली. एकूण महसूलात 2 टक्क्यांनी वाढ होऊन ते 64 अब्ज डॉलर म्हणजे 4.54 लाख कोटी रुपये राहिले.

ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत महसूलवाढीची आशा
अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले की, सर्विसेज, वियरेबल्स आणि आयपॅडची विक्री वाढल्याने महसुलात वाढ झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत 85.5 अब्ज डॉलर महसुलाची  अपेक्षा व्यक्त केली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने आयफोन विक्री वाढेल, अशी अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या