घोषणा सरकार! केंद्रीय मंत्र्यांचं निवडणूकीपूर्वी जनतेला दीड लाख कोटींच्या रस्त्यांचं ‘गाजर’

महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची अक्षरश: दुरावस्था झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून रखडले आहे. तर  समृद्धी महामार्ग व अटल सेतू यांवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून सामान्यांचा बळी जात आहे. सरकार मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. असे असताना निवडणुकांच्या तोंडावर जनतेचा हा आक्रोश सरकारला परवडणारा नसल्याचे लक्षात घेऊन सरकाराने पुन्हा एकदा घोषणांचे गाजर दाखवायला सुरूवात केली. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी थेट विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी येत्या वर्षात होणाऱ्या रस्ते कांमाची घोषणा केली. पुणे शहरासाठी 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विधानभवन परिसरात माध्यंमांशी बोलताना ते म्हणाले की, येणाऱ्या 2026 या वर्षात महाराष्ट्रातील काही कामे मंजूर झाली आहेत. एमएसआयडीसी आणि एनएचएआय यांच्या माध्यमातून ही कामे येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये पुण्यापासून ते संभाजीनगर हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. हा 16 हजार 318 कोटींचा एक्सप्रेस हायवे असणार आहे.  पहिला पुणे ते संभाजीनगर असा रस्ता आहे. तो रस्ता चांगला बांधून 2 हजार कोटी खर्च कऱणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

याव्यतिरिक्त दुसरा रस्ता पुण्यात शिकरापूरपासून नवीन हायवे डायरेक्ट करून अहमदनगरच्या बाहेरून बीड जिल्ह्यातून पुढे संभाजीनगरला जो़डणारा ग्रीन फिल्ड हायवे आहे. हा 16 हजार 318 कोटीचा आहे. यामुळे पुणे ते संभाजीनगर दोन तासात आणि संभाजीनगर वरून नागपूर अडीच ते पावणे तीन तासात पार करता येईल. त्याचबरोबर तळेगाव चाकण शिकरालापूर एलिवेटेड हा एक रस्ता आहे. त्यावर फ्लायओवर आणि त्याच्यावर आणखी एक फ्लाओवर एकाच पिलरवर आहे. तसेच त्यावर आणखी एक मेट्रो स्टेशन असणार आहे. हा मार्ग 4 हजार 207 कोटी रुपयाचा असणार आहे. याव्यतिरिक्त हडपसर टू यवत हा एलिवेटेड पूल आहे. तो 5 हजार 262 कोटी रुपयांचा असणार आहे, असे गडकरी म्हणाले.

हडपसर टू यवत हा एलिवेटेड पूल 5 हजार 262 कोटी रुपयांचा आहे. डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी असे 27 हजार कोटी रुपयाची काम त्यांना दिलेली आहे. याव्यतिरिक्त एनएचआय कडून नाशिक फाटा टू खेड असा दोन पॅकेजमधील नवा हायवे बांधण्यात येणार आहे.पहिला पॅकेज नाशिक फाटा ते आळंदी फाटा 4 हजार 403 कोटी रुपयांचा असणार आहे तर आळंदी फाटा ते खेड 3398 कोटी रुपयांचा असणार आहे. यानंतर पुणे सातारा असा 1 हजार कोटी रुपयांचा रस्ता असणार आहे. यामध्ये केवळ पुणे शहरासाठी 50 हजार कोटींची कामे मंजूर कऱण्यात आली असून येत्या तीन महिन्यात ही कामे सुरू होती असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा नंतर काटोल बायपास,जाम बायपास, नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2000 कोटीचा मार्ग असणार आहे. यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ अवतराम घाट या मराठवाड्यातला चाळीसगाव आणि संभाजीनगरमधील रस्त्यांच्या कामाची किंमत 2800 कोटी रुपये इतकी असेल. फोर लेनिंग ऑफ तळोजा बॉर्डर टू तळोजा टू शहादा हा 1074 कोटी मंजूर केलेला आहे. आणि पुन्हा पुढे शिरपूर पर्यंत हा पुन्हा 1404 म्हणजे एकंदर 2 हजार कोटीचा हा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. तसेच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला एक पॅरलल एक्सप्रेस हायवे बांधला जाणार आहे. 130 km रस्ता असून जवळपास 15 हजार कोटीचा असणार आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध असणर आहे.

अन्युअल प्लॅन मध्ये 60 हजार कोटी रुपयाच्या कामला मंजुरी दिलेली आहे त्याची लिस्ट आहे त्यातले 20 हजार कोटी आता सध्या मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. हे सगळे मिळून जवळपास दीड लाख कोटी रुपयाची कामं या वर्षात महाराष्ट्रात मंजूर झालेली आहे आणि यातली जवळपास 50 हजार कोटी रुपयाची काम आपण पीडब्ल्यूडी च्या कार्पोरेशनला आपण दिलेली आहेत असे गडकरी म्हणाले.