2.12 लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मंजुरी; लष्कराला मिळणार हेलिकॉप्टर, ड्रोन सिस्टम, शस्त्रांचा मोठा साठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराला आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली असून संरक्षण दलासाठी तब्बल 2.12 लाख कोटींच्या खरेदीला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या खरेदीमध्ये नवे हेलिकॉप्टर, लांब पल्ल्याच्या कामिकाझे ड्रोन सिस्टम आणि अन्य काही अत्याधुनिक शस्त्रांचाही समावेश आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषद यांनी या खरेदी प्रस्तावांना सोमवारी मंजुरी दिली.

लष्करासाठी हाय मोबिलिटी वाहने, सेल्फ-प्रोपेल्ड ट्रक्ड गन प्रणाली, हवाई संरक्षण प्रणाली आणि ड्रोनविरोधी प्रणाली खरेदी केल्या जाणार आहेत. नौदल आणि वायुदलासाठीही अनेक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म, हेलिकॉप्टर, रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींना मंजुरी मिळाली आहे. लष्करासाठी हाय मोबिलिटी वाहने आणि सेल्फ-प्रोपेल्ड ट्रक्ड गन प्रणाली खरेदी केल्या जाणार आहेत. लाइट मल्टी-रोल हेलिकॉप्टर खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, लष्करासाठी अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आणि मानवरहित हवाई प्रणालीविरोधी प्रणाली खरेदी केल्या जाणार आहेत.

यामध्ये इतर मानवरहित हवाई प्रणाली आणि निगराणी मानवरहित हवाई वाहनांच्या खरेदीलाही मंजुरी दिली. हवाई दलासाठी हेलिकॉप्टर, हवाई संरक्षण प्रणाली आणि रडारच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून एकात्मिक निगराणी आणि प्रहार प्रणाली तसेच लांब पल्ल्याच्या कामिकाझे ड्रोन प्रणालींचाही यात समावेश आहे.