वास्तुविशारद उल्हास राणे यांचे निधन

प्रसिद्ध पर्याकरण तज्ञ आणि निसर्गाभिमुख, समाजाभिमुख वास्तुरचना या संकल्पनेला धरून देशभरात अनेक प्रकल्प साकारणारे वास्तुरचनाकार उल्हास राणे यांचे मंगळकारी कोरोनामुळे बेंगळुरू येथे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. उल्हास राणे यांच्या संकल्पनेतून धारावीच्या डम्पिंग ग्राउंडवर ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’चा प्रकल्प उभा राहिला. सह्याद्री वाचवा मोहीम, पश्चिम घाट बचाव मोहीम या चळवळीतील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या निधनाबद्दल पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

मुंबईत झालेल्या रौप्यमहोत्सवी पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपद राणे यांनी भूषवले होते. बीएनएचएस या संस्थेशी ते जोडले होते. वास्तुरचना, पर्याकरणावर विपुल अभ्यासपूर्ण लेखन केलेल्या राणे यांची ‘अद्भुताच्या शोधात’ ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. हेरिटेज इमारती, कोकणातील अनेक देवळांचे पुनरुज्जीवन, लातूर भूकंपानंतर पारधीवाडी गावाचे लोकसहभागाने पुनर्वसन असे अनेक प्रकल्प त्यांनी राबवले.

आपली प्रतिक्रिया द्या