
‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळख असलेल्या ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबईचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एनओसीची मागणी केली असून त्याला त्याची ट्रान्सफर करायची आहे. जर मुंबई असोसिएशनने त्याला एनओसी दिली तर अर्जुन आगामी रणजी मोसमात गोव्याच्या संघाकडून मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
22 वर्षीय अर्जुनला मागच्या हंगामामध्ये मुंबईच्या सीनियर टीमने रणजी ट्रॉफीसाठी निवडले होते, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला एनओसी मिळाल्यानंतर त्याची फिटनेस चाचणी घेण्यात येईल, असे विधान गोवा क्रिकेट असोसिएशनकडून करण्यात आले आहे. फिटनेस चाचणीत पास झाल्यास अर्जुनला गोव्याकडून खेळण्याची संधी मिळू शकते.































































