अर्जुन तेंडुलकरची हिंदुस्थानी संघात निवड

सामना प्रतिनिधी । मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुनची हिंदुस्थानच्या अंडर-१९ क्रिकेट संघात निवड झाली आहे. श्रीलंकेविरुद्ध जुलै महिन्यात होणाऱ्या मालिकेसाठी अर्जुनची निवड झाली आहे.

अर्जुनची कसोटी क्रिकेटसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र एकदिवसीय सामन्यात पदार्पणासाठी अर्जुनला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आशिष कपूर, ज्ञानेंद्र पांडे, राकेश पारिख यांच्या निवड समितीने अर्जुनला हिंदुस्थानी संघात खेळण्याची संधी दिली आहे. श्रीलंकेच्या या दौऱ्यात कसोटी संघाचं कर्णधारपद दिल्लीच्या अनुज रावतकडे तर एकदिवसीय संघाचं कर्णधारपद आर्यन जुयालकडे देण्यात आलं आहे. या दौऱ्यात एकूण दोन कसोटी सामने (४ दिवसीय) आणि ५ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या