अरमान मलिकची रोमॅण्टिक भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या जादुई गाण्यांनी तरुणांना भुरळ घालणाऱया लोकप्रिय गायक अरमान मलिक याचे ‘सून माही’ हे रोमॅण्टिक सिंगल गाणे नुकतेच चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला तरुणाईची पसंती मिळत असून अवघ्या दोन दिवसांत 50 लाख ह्यूज मिळाले आहेत.

‘ख्वाबों के किनारे, मै भी आऊ तू भी आ रे… जिले जिंदगी जरा सी, थोडे लम्हे गुजारे’ असे या गाण्याचे बोल आहेत. कुणाल वर्मा यांनी रचलेल्या या गाण्याला अमाल मलिक याने संगीतबद्ध केले आहे. अरमान मलिकने ‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘बम बम बोले’ या गाण्यातून बॉलीवूडमध्ये गायक म्हणून पदार्पण केले होते.