
केंद्र सरकारने हत्यार कायद्यात सुधारणा केली आहे. नव्या तरतुदीनुसार बेकायदेशीरपणे हत्यार बाळगल्यास व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
लोकसभेत हत्यार कायद्याच्या सुधारित तरतुदींचे विधेयक पारित करण्यात आले आहे. नव्या कायद्यानुसार कुणालाही बेकायदेशीरपणे हत्यार बाळगता येणार नाही. तसे कोणी केल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तसेच लग्नात उत्साहाच्या भरात जर कोणी गोळीबार केला तर त्यालाही अटक होऊ शकते. तसेच दोन लाख रुपयांच्या दंडही त्याला ठोठावला जाऊ शकतो.
लोकसभेत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की पोलिसांना फोन केल्यास घटनास्थळी पोहोचायला ग्रामीण भागात सरारसरी 30 मिनिटे लागतात तर शहरी भागात 10 मिनिटे लागतात. त्यामुळे आता लोकांना हत्यार ठेवण्याचे गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
लग्नात आनंदाच्या भरात अनेकवेळा हवेत गोळीबार केला जातो. त्यावर अमित शहा म्हणाले की, परवाना असलेल्या बंदुकीतून केलेल्या फायरींगमुळे मृत्यू होत नाही. परंतु 2016 साली एकट्या उत्तर प्रदेश अशा घटनांमध्ये 191 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बिहारमध्ये 12 तर झारखंडमध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
कायद्यातील नवीत तरतुदीनुसार एकाच व्यक्तीला दोन हत्यारांचे परवाने घेण्याचा अधिकार असेल. तसेच हत्याराची वैधता ही तीन वर्षांऐवजी पाच वर्ष असणार आहे. लोकांना हत्याराचे इलेक्ट्रॉनिक परवानाही मिळणार आहे.


























































