आम्ही औषधे पाठवतो अन् पाकिस्तान अतिरेकी, लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण जग कोरोनाच्या संक्रमणाने भयभीत झाले आहे. हिंदुस्थान अशा आणीबाणीच्या प्रसंगात जगभरात औषधांचा पुरवठा करत आहे. याच वेळी पाकिस्तान मात्र हिंदुस्थानात अतिरेकी पाठवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा हल्लाबोल लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केला. पाकिस्तानी सीमेवर घुसखोरीच्या घटना वाढल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. लष्करप्रमुख मुकुंद नरवणे हे कश्मीर दौऱयावर असून त्यांनी आज कुपवाडा सीमेला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नरवणे यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत हिंदुस्थान जगाला मदत करण्यात व्यस्त असताना पाकिस्तान मात्र कश्मीर अशांत करण्याच्या कटकारस्थानात गुंतला असल्याचा स्पष्ट आरोप केला. गेल्या काही दिवसांपासून कुपवाडा, राजौरी, पुंछ तसेच कठुआ सीमेवर शस्त्र्ासंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. नुकतेच हिंदुस्थानी लष्कराने पाच अतिरेक्यांचे सीमेवरच एन्काऊंटर केले आहे. गोळीबाराच्या आडून अतिरेकी हिंदुस्थानात घुसवण्याचे हे षडयंत्र आहे, मात्र आम्ही डोळय़ात तेल घालून पहारा देत आहोत असे ते म्हणाले.