मणिपूरमधून लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्करी अधिकाऱ्यांच्या अपहरणाच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील रहिवासी असलेले कनिष्ठ आयुक्त अधिकारी (JCO) कोन्सम खेडा सिंग यांचे आज सकाळी 9 च्या सुमारास घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात सीमावर्ती राज्यात वांशिक हिंसाचार झाला होता. तेव्हापासून लष्करी अधिकाऱ्यांच्या अपहराणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अपहराणाची ही चौथी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार लष्करी अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अपहरण का करण्यात आले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. रजेवर आलेल्या किंवा तैनात असलेल्या सैनिकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लक्ष केले जात आहे. मे 2023 नंतरची ही चौथी घटना आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये आसाम रेजिमेंटचे जवान सेर्टो थांगथांग कोम यांची अज्ञात सशस्त्र गटाने अपहरण करून हत्या केली होती. दोन महिन्यानंतर हिंदुस्थानी लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेत चार जणांची हत्या करण्यात आली होती. तर जवानाचे वडील पळूण जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी इंफाळ शहरात एका पोलीस अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते.

या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी चेतावणी दिली आही की, अशा घटनांना आळा घालण्यासाठी सशस्त्र दल (विशेष) अधिकार कायदा किंवा AFSPA पुन्हा लागू करण्यात येईल.