3 फेब्रुवारीपासून बीड येथे सैन्य भरती, पन्नास हजार उमेदवारांची होणार क्षमता चाचणी

3999

हिंदुस्थानी सैन्य दलाच्या वतीने भरतीचे आयोजन पाच वर्षातून एकदा होत असते. बीड येथे 3 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होत असलेल्या सैन्यदल भरती साठी आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

याप्रसंगी सैन्यदलाचे सैन्यभरती अधिकारी कर्नल दीनानाथ सिंग यांनी सैन्यदल भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेली नोंदणी 19 जानेवारी 2020 पर्यंत सुरू राहणार असून आत्तापर्यंत 46 हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे, तसेच ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार असून युवकांनी भरतीचे प्रलोभन व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे असे सांगितले. दि. 3 पासून सलग दहा दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार असून दररोज जवळपास पाच हजार पेक्षा जास्त उमेदवारांची क्षमता चाचणी घेतली जाईल. या दहा दिवस चाललेल्या भरती प्रक्रियेतून अंतिमरित्या दीड हजार पेक्षा जास्त उमेदवार निवडले जातील. या अनुषंगाने करावयाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक त्या सूचना देखील कर्नल सिंग यांनी यावेळी दिल्या.
सैन्यभरतीसाठी बीड व लगतच्या चार जिल्ह्यातील उमेदवार मोठ्या संख्येने शहरात दाखल होणार असल्याने आणि सैन्यभरतीचे ठिकाण सैनिकी शाळा, म्हसोबा फाटा जवळ, कॉलेज ऑफ फार्मसीच्या मागे नगर रोड, बीड येथे असून शहरापासून काही अंतरावर असल्याने या भरतीसाठी येणाऱ्या युवकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन व तयारी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

पूर्वतयारी बैठकीसाठी सैन्यदलाचे कॅप्टन एस. राजू , उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव- पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, पोलीस उपाधिक्षक स्वप्निल राठोड, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री .सानप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी एस. एन.कराळे , जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे किरण काळे यासह बीएसएनएल, सैनिक शाळा, नगर परिषद आधी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची पाहणी
बीड येथे होणार्या सैन्य भरतीच्या तयारीनिमित्त पहाणी करण्यासाठी आलेले कर्नल डि.एन. सिंग कॕप्टन एस.राजू, सुभेदार मेजर अनिल कुमार यांचा विद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षकवृंद ,प्राचार्य श्री .डाके एस ए, विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या