
जी-7 परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कश्मीरचा राग आळवला. जम्मू-कश्मीरसाठी कोणतीही मर्यादा ओलांडू असे म्हणत इम्रान यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची पोकळ धमकी दिली आहे.
कश्मीर द्विपक्षीय मुद्दा, कोणी दखल देऊ नये! मोदींनी ट्रम्पना समोरच सुनावले
जम्मू-कश्मीरचा मुद्दा आम्ही चर्चेने सोडवू इच्छित होतो. परंतु आम्ही आता या मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्यामुळे आता याबाबत ठोस निर्णय घेण्याच्या स्थितीत आम्ही पोहोचलो आहोत, असे इम्रान खान म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी जगभरातील मुस्लीम देशांनी कश्मीरप्रश्नी एकत्र यावे असे आवाहनही केले.
आंतराष्ट्रीय स्तरावर कश्मीर मुद्दा लावून धरणार असल्याचे इम्रान म्हणाले. तसेच 27 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रात कश्मीरबाबत बोलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यासह 1965 नंतर पहिल्यांदा कश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
Pakistan PM Imran Khan: I will speak at the UN General Assembly on September 27 and highlight the Kashmir issue on world stage https://t.co/MSKs4bspJY
— ANI (@ANI) August 26, 2019
युद्धाच्या धमकीचा पुनरुच्चार
कश्मीर प्रश्नाचा संघर्ष युद्धामध्ये परावर्तीत झाल्यास दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत हे लक्षात ठेवा. अण्वस्त्र युद्धामध्ये कोणीही विजय मिळवू शकत नाही आणि याचे परिणाम जागतिक स्तरावर होतील. याची जबाबदारी जगातील सुपरपॉवर देशांकडे असेल. भले मग त्यांनी आमचे समर्थन करो अथवा नाही. पाकिस्तान कोणत्याही थराला जायला मागेपुढे पाहणार नाही, अशी दर्पोक्ती इम्रान यांनी केली. तसेच PoK मध्ये आम्ही तयार असून हिंदुस्थान बालाकोटसारखा हल्ला पुन्हा करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
Imran Khan: If conflict moves towards war then remember both nations have nuclear weapons &no one is a winner in nuclear war and it has global ramifications.Super powers of the world have a huge responsibility..whether they support us or not Pak will go to every extent (file pic) pic.twitter.com/6Rgpg2kscS
— ANI (@ANI) August 26, 2019




























































