कलम 370 हटवल्याने खुश आहेत पाकिस्तानी तरुण, लग्नासाठी हिंदुस्थानला पसंती

5033

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी काही पाकिस्तानी तरुण मात्र भलतेच सुखावले आहेत. कारण या पाकिस्तानी तरुणांना हिंदुस्थानी तरुणींनाच आयुष्याचे सोबती बनवायचे असून दोन तरुणांनी तर गुजरातमध्ये येऊन लग्नही केले आहे.

गुजरातमधील राजकोट येथे या दोघांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. हे दोघे तरुण महेश्वरी समाजाचे असून कराचीत राहतात.पण तिथे हिंदूंच्या लग्नावर अनेक बंधने आहेत. लग्नानंतर वरात न काढणे, लग्नसोहळे साजरे न करणे अशी बंधने हिंदूंवर लादली जात आहेत. यामुळे व्यवसाय व इतर कारणांमुळे हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेल्या या समाजाच्या तरुण तरुणींना हवा तसा जोडीदार निवडता येणार आहे. यामुळे 370 कलम हटवल्याचा त्यांना विशेष आनंद झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या