पुस्तकाच्या पलीकडे… कार्तिक वजीर : लोकशाहीवरचे भाषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. अनिल कुलकर्णी

एखादं कौशल्य जनसामान्यांत ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्याने वैगुण्यावरही मात करता येते. काwशल्यं ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही, पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहतं. नुकताच एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. “भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’’ त्याने लोकांना अक्षरशः हसवलं.

कार्तिक वजीर असं त्याचं नाव असून तो जालना जिह्यातील अंबड तालुक्यातील रेवळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे. या शाळेतील तो पहिलीतला विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याची घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर म्हणून ओळखला जातो. रातांधळेपणामुळे त्याची दृष्टी कमी आहे. म्हणून तो वर्गात फळ्याजवळ बसतो. तो रंगाने गोरा असल्यामुळे सगळे त्याला भुऱया नावाने चिडवतात. सुरुवातीला त्याला प्रजासत्ताक दिनी बोलण्याची संधी देण्यात आली नाही. मात्र त्याच्या जिद्दीमुळे त्याला नंतर संधी देण्यात आली. त्याचे शिक्षक भरत मस्के यांनी त्याला एक भाषण लिहून दिलं होतं. ते त्यांनी आपल्या बहिणीकडून कार्तिकचे भाषण तयार करून घेतल्याची माहिती आहे.

“लोकशाहीमुळे मी खेळतो, माकडासारखा झाडावर चढतो, पण लोकशाहीमुळे माझे वडील मला काही बोलत नाहीत, पण काही मुलं शाळेत मास्तरांना माझं नाव सांगतात आणि काही जण लोकशाहीला पायदळी तुडवतात, तसं मास्तरही मला तुडवतात, पण मी खूप गरीब आहे. संपूर्ण तालुक्यात माझ्यासारखा गरीब कोणीही नसेल’’ अशा शब्दांत त्याने प्रेक्षकांची मनं अक्षरशः जिंकली.

मनातील आशय जेव्हा सहजपणे, उत्स्फूर्तपणे बाहेर पडतो तेव्हा लोकांना तो भावतो. आशय पुस्तकातला जरी असला तरी तो सादर करताना काwशल्य, भाषेचा लहेजा, आरोह अवरोह, संवादाची फेक या सगळ्या बाबी पुस्तकांच्या पलीकडील आहेत. यशोगाथा या व्हायरल व्हायलाच हव्यात. आता ते प्रसारमाध्यमामुळे अनेकापर्यंत चांगला संदेश घेऊन पोहोचत आहे. मुख्यमंत्र्यांनीही या मुलाची चौकशी करून त्याच्या डोळ्यावरील उपचारांसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केवळ पुस्तपं वाचून अभ्यास करून यश संपादन करत असतानाच आपल्या अंगभूत काwशल्यांची जोपासना करत व ते वृद्धिंगत करण्यासाठी आपल्याला यशाचा टप्पा गाठता येतो हेच यावरून लक्षात येतं.

अनेक ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या गोष्टी समाजासमोर आणल्या पाहिजेत, त्या वारंवार बिंबवल्या पाहिजेत. केवळ आनुवंशिकतेच्या पुण्याईवर जगण्यापेक्षा स्वतःमधील सुप्त गुण ओळखून आपणच आपल्यातून उमलायला हवं. संधी नेहमीच दार ठोठावत नसते. ती आपल्याला खेचूनही आणावी लागते.शाळेमधून सहशालेय उपक्रमांची रेलचेल हवी. तरच विद्यार्थ्यांना त्यांचे अंगभूत कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. जे जे व्हायरल होतं तीच संस्कृती म्हणून आपल्यासमोर येते, पण प्रत्येक व्हायरल सत्य नसतं, त्याची पडताळणीही करायला हवी हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. अनेक चांगल्या गोष्टी अजूनही व्हायरल होत नाहीत, त्या शोधायला हव्यात हे यानिमित्ताने लक्षात घेण्यासारखे आहे.

– [email protected]