
>> आश्लेषा महाजन
मुलींना आपल्या हक्कांची जाणीव झाल्याने त्या आता अन्यायाला विरोध करत आहेत, आवाज उठवत आहेत. स्वतःचे अधिकार मिळवीत आहेत. अशावेळी हा स्त्रियांचा लढा आहे, म्हणून पुरुषांनी अलिप्त राहून चालणारच नाही. कारण हा अवघ्या समाजाला ढवळून टाकणारा लढा आहे. स्त्रिया हा समाजाचा 50टक्के व्यापणारा घटक आहे, असे क्षणभर मानले, तर हा निम्मा घटक मागास ठेवणे हे समाज व पुरुषासाठी लांच्छन आहे.
स्त्र्ााrला आदिमाया, शक्ती, सर्जनाची स्वामिनी, माता, पोषिता, धारिणी, संजीवनी… अशी अनेक नावे आपली संस्कृती देत आली आहे. पार्वती, लक्ष्मी, सरस्वती या देवतांनीही लोकसंस्कृतीमध्ये, लोकसाहित्यामध्ये आपले स्थान निर्माण केले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते…’, ‘गृहिणी गृहमुच्यते’, ‘नवरात्रीतला स्त्राr-शक्तीचा जागर’ असे एकीकडे असताना दुसरीकडे ‘न स्त्राr स्वातंत्र्यमर्हति…’ प्रकारची भयाण दांभिकताही दिसते. कारण एकाच काळात अनेक कालखंड आपण जगत असतो. एकीकडे इंडियातील स्मार्ट मुलगी स्वतःला सिद्ध करते तर दुसरीकडे हिंदुस्थानतली एखादी उपेक्षित कन्या संधींच्या अभावी प्रगतीचे पंख मिटून घेते. त्याच वेळी एखादी भारतवर्षातली खेडय़ातली पोर शिक्षणाअभावी शेतात राबत असते, तर आदिवासी पोट्टी रानोमाळ भटकत असते. एकूणातच स्त्राrचे जगणे तिच्या गर्भाशय असलेल्या शरीराशी जोडलेले ठेवण्यातच समाजपुरुषाला धन्यता वाटत राहण्याचे मूळ कारण उक्रांतीत आहे. उक्रांत झाल्यावर गुहेमध्ये वास्तव्य करत असताना पुरुष अरण्यात जाऊन शिकार करू लागला. बालसंगोपन करता करता चूल सांभाळत स्त्राrने रुजवंतीचा-शेतीचा शोध लावला. हे सोयीचे व उपयुक्त असे श्रमविभाजन पुढे स्त्राrला संस्कृतीच्या पिंजऱयात डांबणारा पिंजरा ठरला. सर्जनशील स्त्राrकडे मूल जन्माला घालण्याचे असलेले वैशिष्टय़ स्त्राrला ‘परिपूर्ण’ करते. ते पुरुषाला अप्रूपाचे वाटत असतानाच, त्यावर स्वामित्वहक्क गाजवण्यातच आपले हितसंबंध आहेत, असे त्याला व पुरुषधार्जिण्या संस्कृतीलाही वाटत आले आहे. आज बालिका दिन साजरा करावा लागतोय, राबवावा लागतोय, हे सुदैव म्हणावे की दुर्दैव, हेच सांगणे अवघड आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षांत अल्पवयीन मुलींच्या बाबतीत मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे घडले आहेत. विज्ञानाच्या दुरुपयोग करत स्त्राrभ्रूणाच्या मूलभूत मानवी हक्कांवर जन्माच्या आधीपासूनच ‘ब्रह्मास्त्र्ा’ सोडले जाते. ‘पुत्रवती’ होण्याच्या हट्टापायी मुलींना जन्मालाच येऊ दिले जात नाही. त्यापायी आपल्या देशातले स्त्राr-पुरुष गुणोत्तर व्यस्त झाले आहे. आज 1000 पुरुष व फक्त 918 स्त्र्ाया असे गुणोत्तर आहे. जगल्या-वाचलेल्या मुलींना उपेक्षा, दुय्यम वागणूक, कुपोषण यांना सामोरे जावे लागते. शिक्षणापासून वंचित असलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या या मुली म्हणजे कुटुंबासाठी घोरच! अशावेळी स्त्रीवर होणाऱया अन्याय-अत्याचारांवर पायबंद घालून तिला सक्षम, आत्मनिर्भर व स्वयंसिद्ध करण्याऐवजी मुलीचे लवकर लग्न लावून एकदाची तिला नवऱयाच्या व सासर नामक पुरुषकेंद्री चिरेबंदी संस्थेत स्वाधीन केले की आई-बाप म्हणून एकदाची इतिकर्तव्यता झाली, असे आजही बहुसंख्य कुटुंबांत मानले जाते.
खेडय़ांमध्येच नव्हे, तर शहरांमध्येही आजही अल्पवयीन मुलींची लग्ने चक्क उरकली जातात. ज्यांचे खेळण्या-बागडण्याचे वय आहे अशा कोवळ्या मुली मूल कडेवर घेऊन घरीदारी कष्ट उपसताना दिसतात. दरवर्षी जगात दीड कोटी मुलींचे लग्न त्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आत केली जातात. वयात आलेल्या मुलीची ‘ओटी भरण्याचा’ कार्यक्रम नातलग, शेजारपाजारच्या लोकांना बोलवून थाटामाटात साजरा करून ती पोर ‘मोठी झाल्याचे’ जगजाहीर केले जाते. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका अहवालानुसार हिंदुस्थानात आजही 70टक्के मुलींची लग्ने अठरा वर्षे हे कायदेशीर वय पूर्ण होण्याच्या आधी अक्षरशः उरकून टाकली जातात. याचा अर्थ कायदा व पोलिसी खाक्या तळागाळात पोहोचलेला नाही किंवा कायद्याला गुंडाळून ठेवण्याचे कसब अशा पालकांनी कमावलेले असते. अर्धवट सोडलेली शाळा वा कॉलेज, प्रगल्भतेचा अभाव, वेडय़ा वयाचे सळसळते हॉर्मोन्स यांतून उमेदीची वर्षे भयानक अनुभवांनी व्यापली जातात. या काळात लैंगिक अत्याचाराला बळी पडण्याची शक्यतादेखील जास्त असते. स्वतःच्या हक्कांविषयी, अधिकारांविषयी त्या कोवळ्या मुली अनभिज्ञ असतात.. जगाच्या पाठीवर कुठेना कुठे दर दहा मिनिटाला एका तरी अल्पवयीन मुलीला हिंसाचाराला बळी पडावे लागते. मारहाण, सक्तीचे लग्न, छेडछाड, बलात्कार, ऑनर किलिंग, वेश्या व्यवसायात ढकलले जाणे – अशा अनेक प्रकारच्या भयाण प्रसंगांना मुलींना तोंड द्यावे लागते. मुलीच्या सॅनिटरी नॅपकिन्सचा खर्चही अनेक घरात चिंतेचा व त्यासाठी तिला हिणवण्यासाठीचा विषय असतो. स्त्राrच्या लैंगिक भावना उद्दिपित होऊ नये व तिने केवळ ‘आदर्श माता’ व्हावे, म्हणून काही देशांत वयात येण्यापूर्वी योनीचा काही भाग कापून टाकण्यात येतो. (त्याला चेस्टिटी टेस्ट म्हणतात.) युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये वयात आलेल्या मुली सैन्याच्या अत्याचारांना बळी पडतात. शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागांतही कुमारीमातांचे गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसते. प्रसारमाध्यमांतून सहज उपलब्ध होणारे उन्मादक मनोरंजन, फास्ट फूड आणि आधुनिक जीवनशैलीमुळे मुलींचे लवकर वयात येण्याचे (व लवकर मेनॉपॉज येण्याचे) प्रमाणही वाढले आहे. विकसनशील देशातल्या 25 टक्के विवाहित वा अविवाहित मुली वयाची अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच आई बनतात. अशा महिलांची 67 टक्के मुले कुपोषित व रोगट असतात. हिंदुस्थानात जन्माला येणाऱया दर सहा मुलींपैकी एकीचा मृत्यू मुलामुलींत केल्या जाणाऱया भेदभावामुळे (उपेक्षा, कुपोषण, मारहाण, अतिश्रम इ.) होतो. युनिसेफने केलेल्या एका सर्वेक्षणात 44 टक्के मुलींना नवऱयाने मारहाण करण्यात काही चूक आहे असं वाटतच नाही.
खरेतर आपल्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, प्रगतीच्या संधी सर्वांसाठी आहेत, हे सर्व थरांत पोहोचायला हवे. ‘अल्पवयीन मुलीशी मी लग्न करणार नाही’, तसेच ‘मीही पुरेसा प्रगल्भ नि कमावता झाल्याखेरीज लग्न करणार नाही,’ असे तरुण मुलानेही ठणकावून सांगायला हवे. त्यासाठी स्त्रियांसह पुरुषांना समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे. चांगली, सुदृढ, निरोगी, संपन्न पिढी जन्माला यावी यासाठी तशीच उत्तम समाजधारणा हवी. ती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, नाही असे नाही. केंद्र सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबवत आहे . त्यासाठी करोडो रुपयांचे नियोजन आहे. विविध संस्था, संघटना जाहिराती, पत्रके, पोस्टर्स, भाषणे यांतून जागर घडवत आहेत.तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने जरी हे सारे मंथन व कृतिशील गोष्टींचा जागर आपण करत असलो तरी स्त्राr-पुरुष समता ही अखिल समाजाची जडणघडण करणारी व्यापक जीवनशैली होण्याची आवश्यकता आहे. पुरुषप्रधान संस्कृती पुरुषी अहंकार कुरवाळते. त्यात पुरुषांचेही नुकसान होते, हे त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे. पुरुषांनी त्यांच्या गुणसूत्रांमध्ये मुरलेले मध्ययुगीन प्रतिगामी संस्कृतीचे आत्मकेंद्रित संकुचितपण नष्ट करायला हवे. मुलींना आपल्या हक्कांची जाणीव झाल्याने त्या अन्यायाला विरोध करत आहेत, आवाज उठवत आहेत. त्या भांडून स्वतःचे अधिकार मिळवीत आहेत. अशावेळी हा स्त्रियांचा लढा आहे, म्हणून पुरुषांनी अलिप्त राहून चालणारच नाही. कारण हा अवघ्या समाजाला ढवळून टाकणारा लढा आहे. स्त्रिया हा समाजाचा 50 टक्के व्यापणारा घटक आहे, असे क्षणभर मानले, तर हा निम्मा घटक मागास ठेवणे हे समाज-पुरुषासाठी लांच्छन आहे. म्हणूनच या प्रवासात मुलग्यांनी आणि पुरुषांनीही पुढे पाऊल टाकणे आवश्यक आहे. आपल्यापेक्षा बुद्धीने मुळीच कमी नसणाऱया, सहशिक्षण घेणाऱया, बरोबरीने वाढणाऱया, खेळणाऱया, सर्व क्षेत्रांत काम करू शकणाऱया मुली आपल्या शत्रू नाहीत, प्रतिस्पर्धी नाहीत, आपल्या सहचर, सहप्रवासी आहेत, हे त्यांना शिकवावे लागणार आहे. भावी काळात बालिका दिन साजरे करण्याचे प्रसंग न येवोत व सर्वत्र समता, स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता या मूल्यांनी ‘माणूसपण’ झळझळून निघो, हेच त्या त्रिकाल युगधर्माला आवाहन.



























































