
>> डॉ. संजय बोरुडे
शेतीचा शोध लागल्यानंतर पशुपालक समाज स्थिर झाला. त्यानंतर वस्ती आकाराला आली, वस्तीची वाडी झाली, त्यातून गाव आकाराला आले. समूहाने राहण्यामुळे एकमेकांचा आधार वाटू लागला. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण झाले. वृद्धांची सोय झाली. लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ते पार पाडू लागले. त्यातून ग्रामप्रमुख वगैरे पदे निर्माण झाली. त्यातून सामूहिक वर्तनासाठी नियमन तयार झाले, एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली. या नियमनांतूनच हे लोकसंकेत तयार झाले. व्यक्तिगत पातळीवर पाळले जाणारे, समूहात पाळले जाणारे आणि समाजात पाळले जाणारे लोकसंकेत असे या संकेतांचे स्वरूप आहे.
समाजामध्ये वावरताना अथवा सार्वजनिक जीवनात वावरताना सातत्याने ‘लोक काय म्हणतील?’ या प्रश्नाचा आपण सातत्याने विचार करत असतो. याचाच अर्थ सार्वजनिक जीवनात काही संकेत आपल्याला पाळावे लागतात. यालाच ‘लोकसंकेत’ असे म्हटले जाते. या लोकसंकेतांचे पालन करण्याची शिकवण आपल्याला कळत नकळत मिळत असते. हे लोकसंकेत पाळणाऱयाला समाजात एक प्रकारची किंमत असते. ते न पाळणाऱयाकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो. कधी कधी त्याला समजही देतो. म्हणूनच परंपरेने चालत आलेल्या लोकसकेतांचे महत्त्व वादातीत आहे.
नागरिक शास्त्र्ाातील नियमाप्रमाणे व्यक्ती, कुटुंब, समाज हा विकसनाचा क्रम आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीपासूनच या लोकसंकेतांचे पालन आवश्यक ठरते. अर्थात ‘लोक’ म्हणजे परंपरागत पद्धतीने जीवन जगणारे लोक असा आहे. हे लोक अर्थातच ग्रामीण भागात राहणारे आहेत. कारण या ग्रामीण भागातील लोकसंस्कृतीवर बाह्य संस्कारांचा पगडा सहजासहजी बसत नाही. ही ग्राम संस्कृती शहरी संस्कृतीपेक्षा आपले वेगळेपण टिकवण्याचा कायम प्रयत्न करते. राजेशाहीच्या काळात ‘नागर’ आणि ‘लोक’ हे भिन्न समाज मानले गेले. यात अभिजन हे नागर तर लोक हे बहुजन समजले गेले. या अर्थाने ‘लोकसंस्कृती’ही ‘बहुजन संस्कृती’ आहे, हेही यानिमित्ताने लक्षात घेतले पाहिजे.
शेतीचा शोध लागल्यानंतर पशुपालक समाज स्थिर झाला. त्यानंतर वस्ती आकाराला आली, वस्तीची वाडी झाली, त्यातून गाव आकाराला आले. समूहाने राहण्यामुळे एकमेकांचा आधार वाटू लागला. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण झाले. वृद्धांची सोय झाली. लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी ते पार पाडू लागले. त्यातून ग्रामप्रमुख वगैरे पदे निर्माण झाली. त्याआधीही युवावस्थेच्या अर्थात टोळ्या करून राहतानाही टोळी नायक होतेच. त्यातून सामूहिक वर्तनासाठी नियमन तयार झाले, एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली.
या नियमनांतूनच हे लोकसंकेत तयार झाले. व्यक्तिगत पातळीवर पाळले जाणारे, समूहात पाळले जाणारे आणि समाजात पाळले जाणारे लोकसंकेत असे या संकेतांचे स्वरूप आहे.
व्यक्तिगत पातळीवर पाळले जाणारे लोकसंकेत
यात व्यक्तिगत स्वच्छता, घराबाहेर पडण्याआधी स्वच्छ व सुंदर कपडे घालणे, बोलताना ‘अहो-जाहो’ करणे, समोरच्यांचा आदर ठेवणे, संभाषणात माधुर्य असणे वगैरे बाबी येतात.
कुटुंबात पाळले जाणारे लोकसंकेत
एकत्र कुटुंब असल्यास त्यात एकजण कारभारी असतो. त्याच्या आदेश सर्वांनी मानणे हा एक प्रमुख लोकसंकेत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत कुटुंबप्रमुख अर्थात वडिलांचे ऐकणे बंधनकारक आहे, असा एक ढोबळ लोकसंकेत आहे. जबाबदाऱया वाटून घेणे व त्याप्रमाणे काम करणे, आजारी व्यक्तीची सेवाशुश्रूषा करणे, स्त्र्ायांनी पदर घेणे, विनाकारण न हसणे वगैरे लोकसंकेत समाजमान्य आहेत.
समूहात पाळले जाणारे लोकसंकेत
एकमेकांशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवणे, सामूहिक कार्य असल्यास उद्दिष्टांप्रत जाण्यासाठी संपूर्ण योगदान देणे, नेमून दिलेले काम करणे, न ओरडता, भांडता संवाद साधणे इ.
समाजात पाळले जाणारे लोकसंकेत
विनाकारण कोठेही थुंकणे, शिवीगाळ करणे, शांतता भंग करणे, जातीयवादी बोलणे वगैरे गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहेत. वयस्कर मंडळींचा आदर ठेवणे, त्यांच्यापुढे तंबाखू वगैरे न खाणे, अधिकारी व पदाधिकारी यांना योग्य तो सन्मान देणे, तरुणांनी पारावर, वेशीत काम सोडून गप्पा न मारणे इ.
हे लोकसंकेत काही प्रमाणात कालबाह्य किंवा अप्रस्तुत असले तरी ते परंपरेने पुष्ट होत आलेले आहेत आणि त्या लोकमानसाचा भाग बनले आहेत हे नाकारून चालणार नाही.
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
n [email protected]



























































