
>> डॉ. विद्यासागर पाटंगणकर
हिंदुस्थानी पुराणसंस्कृतीने ज्या विविध देवदेवतांच्या रूपांचा कथाविष्कार केला त्यात मारुती, हनुमान, हनुमंत या नावाने एक दिव्य वलय लोकमानसात निर्माण पेले आहे. मारुती किंवा हनुमान हा हिंदुस्थानी परंपरेने उभा केलेला एक आदर्श आहे. मारुती हा रामभक्त म्हणून रामायण काळात प्रसिद्ध पावला, शिवाय त्याला चिरंजीवित्वाचे वरदानही लाभलेले आहे. मारुती हा ‘मनोजय’ आहे. मनाचा वेगही त्यापुढे कमी पडतो. तो ‘बुद्धिमतां वरिष्ठ’आहे. बुद्धिमान, शक्तिमान, गतिमान, तरीही नम्र म्हणूनच महान! चिरंजीवित्वाचा हा अर्थ आहे.
हिंदुस्थानी पुराणसंस्कृतीने ज्या विविध देवदेवतांच्या रूपांचा कथाविष्कार केला त्यात मारुती, हनुमान, हनुमंत या नावाने एक दिव्य वलय लोकमानसात निर्माण पेले आहे. मारुती किंवा हनुमान हा हिंदुस्थानी परंपरेने उभा केलेला एक आदर्श आहे. मारुती हा रामभक्त म्हणून रामायण काळात प्रसिद्ध पावला, शिवाय त्याला चिरंजीवित्वाचे वरदानही लाभलेले आहे. मारुती हा ‘मनोजय’ आहे. मनाचा वेगही त्यापुढे कमी पडतो. तो ‘बुद्धिमतां वरिष्ठ’ आहे. बुद्धिमान, शक्तिमान, गतिमान, तरीही नम्र म्हणूनच महान! चिरंजीवित्वाचा हा अर्थ आहे.
हिंदुस्थानी पुराणसंस्कृतीने ज्या विविध देवदेवतांच्या रूपांचा कथाविष्कार केला त्यात मारुती, हनुमान, हनुमंत या नावाने एक दिव्य वलय लोकमानसात निर्माण पेले आहे. मारुती हा रामभक्त म्हणून रामायण काळात प्रसिद्ध पावला, शिवाय त्याला चिरंजीवित्वाचे वरदानही लाभलेले आहे. सप्तचिरंजीवांमध्ये मारुतीचा आवर्जून उल्लेख आहे.
‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमंतो बिबीषण’ यात हनुमंताचे नाव आहे. मारुतीबद्दलच्या आख्यायिकेत तो वायुपुत्र-अंजनीसुत म्हटले आहे; तसेच जन्मतः सूर्याला गिळंकृत करण्यास झेपावला असे म्हटले आहे. एका गाण्यात ‘बालपणी गेलासी तू सूर्याला धराया’ असा लोकश्रद्धेनुसार निर्देश आहे. तर आनंदतनय या 17 व्या शतकातील कवीने
‘पवन तनय परम विनय रामसेवती
उगवताचि अर्क बिंब घेतले करी’
असा उल्लेख केला आहे. त्यावेळी इंद्राने मारलेल्या वज्रामुळे त्याची हनुवटी प्रहाराने जखमी झाली. म्हणून त्यास ‘हनुमंत’ असे नाव मिळाले. मरुत म्हणजे वारा. त्याचा पुत्र म्हणून ‘मारुती’ ही संज्ञा मिळाली. चैत्र शुद्ध पौर्णिमा हा त्याचा जन्मोत्सव दिन सर्वत्र परंपरेने साजरा होतो. उत्तर हिंदुस्थानात ‘हनुमानगढी’ प्रसिद्ध आहे. हनुमान चालीसाचे वाचन-पठण सर्वत्र केले जाते.
हनुमान हा दुःखमय नष्ट करणारा आहे. हनुमंताची ‘ब्रह्यचारी’ म्हणूनही प्रसिद्धी आहे, मात्र तरीही त्याच्या घर्मबिंदूपासून मकरध्वज नावाचा पुत्र झाल्याचे परंपरा मानते.
हनुमंताची दोन रूपे आहेत. समर्थ रामदासस्वामी यांनी हनुमंताची उपासना अर्थात बळाची उपासना हा आदर्श तत्कालीन संदर्भाचा विचार करून ठेवला. जनमानस हतोत्साहित, शक्तिहीन झालेले होते. अशा काळात मुस्लिम आक्रमणाला प्रतिरोध करण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक मानली. मारुतीची मंदिरे स्थापन केली. मूर्ती स्थापन केल्या. त्यात दोन प्रकारच्या मूर्ती आहेत. एक वीरमारुती आणि दुसरा दासमारुती! वीरमारुती म्हणजे शक्तियुक्त द्रोणगिरी उचललेला कालनेमीवर पाय ठेवलेला उग्र स्वरूप हनुमंत! तर दासमारुती म्हणजे नम्र असलेला, बैठा मारुती! वीरासनात असलेला!
समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मारुतीविषयीच्या स्तोत्रात ‘भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारुती’ म्हणून द्रोणागिरी पर्वत आणल्याचे, पर्वतप्रायरूप प्रकट केले आहे. भूत-प्रेत-समंध नष्ट करणारा हा मारुती आहे.
तसेच त्याच्या आरतीतही
‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ।
कडकडिले ब्रह्यांड धाक त्रिभुवनी
सुरवरनर निशाचर त्या झाल्या पळणी’
असे ओजस्वी विराटरूप प्रकट केले आहे.
‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, कडकडिले पर्वत’ या शब्दातून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय. तर दासमारुती हा रामभक्त बैठा असलेला ‘परम विनयशील’ आहे. यातून एक संदेश हिंदुस्थानी परंपरेला द्यायचा आहे, जो शक्तिमान, वीर पराक्रमी आहे, तो नम्रही असला पाहिजे. तो ‘दास’ही असावा. पण कोणाचा? तर रामाचा! नियंत्रित-संतुलित विचारांचा ‘दास’हवा. हे ‘दास्यत्व’ नाही, तर शक्ती असून सामर्थ्य असूनही स्वामीभक्ती श्रेष्ठ आहे!
मारुती हा ‘मनोजय’ आहे. मनाचा वेगही त्यापुढे कमी पडतो, तो ‘बुद्धिमतां वरिष्ठ’ आहे. बुद्धिमान, शक्तिमान, गतिमान, तरीही नम्र म्हणूनच महान! चिरंजीवित्वाचा हा अर्थ आहे.
मारुती-किंवा हनुमान हा हिंदुस्थानी परंपरेने उभा केलेला एक आदर्श आहे. जेथे रामायण तेथे मारुती असणारच, एवढा तो ‘रामभक्त’ आहे.
वाल्मीकी रामायणात तो ‘किंपुरुष’ असल्याचे म्हटले आहे. किष्किंधा नगरीत सुग्रीवासोबत हनुमंत होता, तो किंपुरुष जातीचे वानरांची एक प्रजात म्हणून. पण त्यांना ‘वानर’ म्हणणे चुकीचे होईल, कारण त्या नगरीचे वर्णन आधुनिक अद्ययावत आहे.
मारुतीने ‘रामायण’ लिहिल्याचेही परंपरा मानते. वाल्मीकी रामायणाची ख्याती पाहून त्यांनीही आपल्या नखाग्रांनी दगडा-धोंडय़ावर रामायण रचले, त्यास ‘हनुमन्नाटिका’ म्हणतात! पण नंतर ते समुद्रात टाकले असेही म्हणतात. आज संस्कृत नाटकात ‘हनुमन्नाटिकेचा’ उल्लेख येतो. त्या ग्रंथाचे संस्कार-प्रभाव पुढील अनेक ग्रंथकारांवर पडलेले आढळतात! त्यातील श्लोक बहारदार आहेत. सीता स्वयंवर प्रसंगी रामाने धनुष्याला प्रत्यंचा लावली. ते वर्णन पहा.
उक्षिंप्तं सह काwशिकस्य पुलके ः सार्थ मुखैर्नामितं
भूपानां जनकस्य संशयधिया सापं समास्फालितं
वैदेही मनसा समंच सहसा कृष्टोत तो भार्गवं….’
हनुमन्नाटकाचा आधार अनेक मराठी कवींनीही घेतला आहे. मारुतीच्या नावावरचे हे नाटक आहे.
आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्व, व्यक्तित्व आणि काव्य -आदर्श यांचे हे चिंतन! तंत्रमार्गातही हनुमंतोपासना आहे, तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल!
(लेखक अध्यात्म अभ्यासक आहेत)





























































