
>> महेंद्र पाटील
तुला कधी माझ्या नजेरत तू दिसली नाहीस का? मी तुझ्या मनाचा इतका खोलवर विचार करत असताना तू का नसतेस माझ्या सोबत. काय सांगू मी माझ्या मनाला की तू माझ्या मनाचे भाव का जाणून घेत नाहीस आणि का होत नाहीस माझ्या स्वप्नातील राणी.
तू भेटलीस अशीच अचानक पावसाळय़ातल्या एका दुपारी आणि तुला पाहिल्यावर तू थेट मनातच उतरलीस माझ्या. काही क्षणात तू तळ गाठलास माझ्या मनाचा. तेव्हापासून तू तिथेच आहेस माझ्या मनाच्या तळाशा. तुझं माझं पहिलं बोलणंसुद्धा खूप सुंदर होतं. ज्या दुपारी ओळख झाली त्याच संध्याकाळी तू बोललीस आणि बोलता बोलता आपण दूर निघून गेलो कल्पनेच्या एका सुंदर विश्वात. ती संध्याकाळ कधीच विसरू शकणार नाही. खूप गोड क्षण जगलो होतो आपण. त्या क्षणी मला वाटलं मी तुझ्या मनाच्या खूप जवळ येईन. पण तसं झालं नाही. दुसऱया दिवशी तू तुझ्यातच होतीस.
पुढे वेळ मिळेल तसं आपण बोलू लागलो. त्याच ऋतूत एक दिवस आपली भेट झाली. आपण पह्नवर बोललेल्या कोणत्याही गोष्टीचा संदर्भ त्या भेटीत नव्हता तरीही आपण तीन तास बोललो. बाहेर रिमझिम पाऊस होता. तुला समोर पहिलं आणि काही क्षण तुझ्याकडेच एकटक पाहत राहिलो. तुझं रंगरूप, तुझा आवाज, तुझे डोळे, तुझं स्माइल… अशा अनेक गोष्टी होत्या हरवण्यासारख्या. त्यात हरवत गेलो. घरी जाताना तुझाच चेहरा डोळ्यासमोर होता. त्या भेटीनंतर पुन्हा आपली भेट केव्हा होईल हे माहीत नव्हतं. खूपदा तुझ्या शहरात येऊनही भेटीच हट्ट केला नाही. आपण भेटलो त्या जागेवरसुद्धा गेलो. तू आणि तुझे क्षण आठवले. वर्षं पुढे जात होते. तोपर्यंत मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलो.
… आणि पुन्हा तुझी कामानिमित्ताने भेट झाली. तो दिवस पुन्हा नव्या आठवणी देऊन गेला. तुझ्या सोबत एक छान प्रवाससुद्धा झाला. फक्त त्या प्रवासात आपण एकटे हवे होतो. नवकीच तुला पूर्ण प्रवासात साथ दिली असती. त्या रात्री लाँग ड्राइव्हसुद्धा झाला असता. कधी कधी योग समोर असूनही दिसत नाहीत. बराच वेळ मनात हुरहूर राहिली. आजही त्या गोष्टीची खंत आहे मला. दोन वर्षं निघून गेली… आणि पुन्हा एकदा कामानिमित्त आपली भेट झाली, तीसुद्धा गर्दीत. आठ वर्षांत फक्त चार भेटी झाल्या, त्यातल्या तीन कामानिमित्त होत्या. कदाचित इतक्या वर्षात मनात साठवलेली तुझ्या बद्दलची हुरहूर आणि ओढ, दोन्ही एकत्र येऊन तुझ्याबद्दल वाटू लागलेलं प्रेम. हो, प्रेमच. तुला पाहिल्यांदा पाहिल्यापासून तुझ्याबद्दल फक्त प्रेमच वाटलं आहे. खूपदा वाटलं हे आकर्षण असेल. पण आकर्षण इतक्या वर्षांत भेट झाली नाही म्हणून विरून गेलं असतं.
तू माझी नाहीस हे माहीत आहे मला. तू माझ्या आयुष्यात मैत्रीण म्हणून आहेस ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. तुला कधी माझ्या मनातलं समजलं नाही का? तुला कधी माझ्या नजेरत तू दिसली नाहीस का? मी परवा संध्याकाळी तुला बोललो की तू बोल माझ्या मनाशी. तू बोलत होतीस, पण त्यात तुझं मन नव्हतं. मी तुझ्या मनाचा इतका खोलवर विचार करत असताना तू का नसतेस माझ्या सोबत. काय सांगू मी माझ्या मनाला की तू माझ्या मनाचे भाव का जाणून घेत नाहीस आणि का होत नाहीस माझ्या स्वप्नातील राणी. खूप छोटी स्वप्नं आहेत तुझ्याबद्दल माझ्या मनात. कधीतरी एका सुंदर संध्याकाळा,r एका निवांत क्षणी, निवांत ठिकाणी तुझी माझी भेट व्हावी. त्या सुंदर निसर्गाच्या साक्षीने रात्रभर तुझं गाणं ऐकत राहावं. हळूहळू रात्र पाण्यात उतरावी. तू माझ्या नि मी तुझ्या डोळ्यात हरवून जावं आणि ब्रम्हमुहूर्तावर धुक्याच्या मंद उजेडात, तू तलम सुंदर साडीत तुझे श्वास ऐकू यावे इतकी माझ्या जवळ असावीस. मंद वाऱयाच्या झुळकीने तुझ्या केसांच्या बटांना उडवावं आणि ती बट मी अलगद बोटाने तुझ्या कानामागे सारवावी. तुझा गोड चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत यावा आणि तू अलगद माझ्या कुशीत सामावून जावी. भोवताली दाट धुक्याचा प्रहर असावा. अशी वेळ कधीतरी नक्कीच यावी. तुला कधीतरी माझ्या मनाच्या भावना समजाव्यात. कधीतरी तू काही क्षण का होईना, माझी व्हावास… हे स्वप्न मी नेहमी पाहात राहणार कारण माझी स्वप्नं खरी होतात यावर माझा विश्वास आहे. जरी हे स्वप्न खरं झालं नाही तरी तू तशीच राहशील माझ्या मनात खोलवर, तळाशी, आजन्म…!





























































