
>> मलिका अमरशेख
अमृतमंथनातून चौदा दिव्य वस्तू निघाल्या. त्याप्रमाणे मराठी जनमानसातल्या प्रतिमेला जिवंत ठेवले तर अनेक दिव्य प्रतिभा नवनिर्मिती निर्मिली जाईल आणि पुनःश्च जगाच्या इतिहासात मराठी माणसाचं मानाचं पान सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल!
व्यापार-उदीम-पणन या क्षेत्रात आपण प्राचीन काळापासून मागे आहोतच. म्हणजे फक्त महाकवी कुसुमाग्रज म्हणून गेलेत-
‘‘नाविक आम्ही तरीही फिरतो
सात नभांखाली
निर्मितो नवक्षितिजे पुढती
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा ह्या खुळय़ा सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला!’’
पण नावच ‘कोलंबसचे गर्वगीत’! न् कोलंबस पण सात समुद्रापारचा. आपल्यात कोणीच कोलंबस नाही… अगदी पूर्वापारपासूनच रिस्क नको. सरकारी नोकरी सेफ हा समज अगदी आजपर्यंत! उद्योजक पहा-टाटा-बिर्ला-अंबानी-अदानी- आपण तर एकमेव किर्लोस्करांचंच नाव घेऊ शकतो चाचरत.
मग स्त्र्ाया तर सोडूनच द्या. स्त्र्ायांना स्वयंपाकघरातून उंबऱयाबाहेर पडायलाच किती वर्षे लागली. आता आता कुठे त्या राजकारणात, समाजकारणात, इतर क्षेत्रात येऊ लागल्या. अर्थात गावची स्त्र्ााr सरपंच झाली तरी निर्णय त्यांचे ‘हे’च घेतात. यामागचंही कारणं असंख्य आहेत. मुळात आपली पुरुषप्रधान संस्कृती स्त्र्ायांना घरातून बाहेर येऊ देत नाही. घरातली कामं, जबाबदाऱया तिनं पार पाडाव्यात एवढीच बिचाऱयांची छोटीशी इच्छा! जर ती बिझनेस करू लागली तर घरी आल्यावर गरम चहा, जेवण, नाश्ता वगैरे कोण देणार?
पण महाराष्ट्रातले पुरुषही कुठे व्यवसायात आहेत? व्यापारी- बिझनेस- कंपनी… यात मराठी माणूस कुठंच नाही. खरं तर आज व्यापारी वर्गाची व्याप्ती खूप वाढलीय. शेकडो उद्योगधंदे निर्माण झालेत. यांत्रिकीकरण ऍडव्हान्स झाल्या… कर्ज देण्याच्या पण सरकारी-खाजगी योजना आहेत. तरीही…
मराठी लोकांची स्वप्नं फार छोटी असतात. की मराठी माणसं स्वप्नच पाहत नाहीत? स्वप्न पाहणं पण त्यांना रिस्की वाटत असणार!
– एकच सुखद अपवाद आहे; तो म्हणजे नाटय़पंढरी न् फिल्मस्. अर्थात महाराष्ट्राला महान नाटय़परंपरा आहे. देवल, खाडिलकर, बालगंधर्व, मंगेशकर, गडकरी, प्र. के. अत्रे तर फाळके, भालजी, धायबर, फत्तेलाल, दामले, व्ही. शांताराम ते थेट आत्ता आत्ताचे निशिकांत कामत, नागराज मंजुळे, संदीप सावंत, राजीव पाटील, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर अशी बरीच कल्पक प्रतिभावान नवी फळी उभारी देतेच मराठी चित्रपटाला!
गजेंद्र अहिरे, केदार शिंदे, संजय जाधव, सतीश राजवाडे, महेश मांजरेकर, सचिन पिळगावकर आणि सुबोध भावे यांच्या फिल्मचे विषयही वेगळे- समृद्ध जीवन-माणूस- समाज यांचे नवे आयाम दाखवणारे!
आता फिल्म- नाटक कंपनी या तर जास्तच जोखमीच्या! तरीही नवी पिढी नव्या कल्पना घेऊन भरारी घेतायत!
याचा एक अर्थ असाही होतो की, मराठी माणूस हिशोबी नाही. तो भाबडा कुटुंबवत्सल संवेदनाशील असा आहे. त्याला बिझनेसमधले डावपेच-पैशासाठी काही गोष्टी करणं- हे जमणारं नाही. त्यापेक्षा फिल्म, नाटय़ यात क्रिएटिव्हिटी आहेच, मानसिक समाधानही आहे आणि आपल्या मातीतलं दुःख- वेदना- मराठी माणसाची नाळ जुळलेलं नाच-गाणंही दाखवता येतं! तर या बेभरवशाच्या व्यवसायाला ते बिझनेस समजत नाहीत हे मोठंच श्रेयस!
आजही नाटकाच्या सुरुवातीला नारळ वाढवला जातो. नटेश्वराची पूजा केली जाते. नांदी म्हटली जाते. तर फिल्ममध्येही आजही ती कला म्हणूनच मराठी माणूस बघतो!
– कोकणातली दशावतार मंडळी असो वा शहरातला गणेशोत्सव, त्यामध्ये सादर होणारी नाटकं-कलाकार- अगदी गावातला वासुदेव, गोंधळी, भारूड, लोकनाटय़, तमाशा- या सर्वांतून मिळणारा पैसा, प्रसिद्धी यापेक्षा त्या कलावंताना त्यातून मिळणारा अमूल्य आनंद- समाधान याला ते महत्त्व देत होते, देतात…! न पेक्षा यात पण बिझनेस होऊ शकतोच की. पण तो केला नाही मराठी माणसांनी हे एक मोठं संचित आहे.
‘देऊळ’ नावाचा एक फार सुंदर चित्रपट येऊन गेला. त्यात या भक्तीभावाचं हळूहळू कसं बाजारीकरण होत गेलं आणि शेवटी देऊळ आणि देव हा एक बीभत्स बिझनेस लोकांनी करून टाकला कसा याचं यथार्थ चित्रण त्यात केलेलं…
आता कोरोना काळात लोकांचे रोजगार गेलेत, थिएटर्स फिल्म- नाटकांची कामं बंद पडलीत. शेकडो कलाकार घरी बसलेत! तर हीच वेळ आहे की या व्यवसायांना पुनःश्च वेगळी दिशा देऊन या कलाकारांना अभिनित करायला लावावं- फिल्म न् नाटक यांना एक शिस्तबद्ध कंपनीचं रूप द्यावं, जेणेकरून प्रत्येकाला कामाचं समाधान पण मिळेलच, पण एक निश्चित मानधन मिळेल. कोरोना नव्हता तेव्हाही मानधन हे बेभरवशाचं होतं. काहींनी आपली शेतं, घर विकून फिल्म बनवल्या, पण पैशाचं गणित न जमल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली! तर असं होऊ नये यासाठी योजनाबद्ध पद्धतीने जर हे दोन्ही व्यवसाय पुनश्च चालवले तर प्रबोधन-मनोरंजन न् रोजगार मिळेल न् नव्या प्रतिभा नव्यानं चमकतील.
पूर्वीच्या वेदकाळी चौसष्ट विद्या न् चौदा कला होत्या. आता त्यांची संख्या असंख्यात पोचलीय.
ज्याप्रमाणे अमृतमंथनातून चौदा दिव्य वस्तू निघाल्या. त्याप्रमाणे मराठी जनमानसातल्या प्रतिमेला जिवंत ठेवले तर अनेक दिव्य प्रतिभा नवनिर्मिती निर्मिली जाईल आणि पुनःश्च जगाच्या इतिहासात मराठी माणसाचं मानाचं पान सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल! फक्त खेळातच नव्हे तर कल्पनेच्या व कलेच्या क्षेत्रातही आम्ही बाजी मारतो!
सर्वात चालणारा 100 टक्के फायदा देणारा व्यवसाय म्हणजे खाद्यसंस्कृती- हॉटेल! पण त्यात पण पूर्वीचे उडिपी, दक्षिणी यांबरोबर चायनीज खाण्याचं वेड वाढलेलं. मुंबईच्या जिप्सी चायनीजचे राहुल लिमये व ‘गोवा पोर्तुगीजा’चे सुहास व दीपा अवचट सोडता आणि विठ्ठल कामत सोडता यातही कुणी विजयाची गुडी उभारल्याचं दिसत नाही. म्हणायला पूर्वीच्या काळी मराठी, कोकणी स्त्र्ाया घरातून खानावळी चालवायच्या.
आज कोरोनामुळे हॉटेल बिझनेसचं कंबरडं मोडलंय. कित्येक हॉटेलं बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि आज कुठल्याच व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी कुणी पुढं सरसावत नाहीच. हिंदुस्थानला अतिशय समृद्ध भौगोलिक रचना मिळालीय. एवढे आपण भाग्यवान, पण त्याचे फायदे मात्र आपण करून न घेता नुकसानच करतोय. वर हिमालयाची अभेद्य तटबंदी- तिन्ही बाजूला असीम अथांग सागर! सुरुवातीला म्हटल्याप्रमाणं आपल्यात कितीतरी कोलंबस निघाले पाहिजेत. पण जलपर्यटनसुद्धा होत नाही. साधी क्रूझसुद्धा नाही आपल्याकडे- मासेमारी हा व्यापक बिझनेस, पण तोही मर्यादितच. अस्वच्छता न् अज्ञान हे एक मुख्य कारण.
खरं तर जुहू, वांद्रा, दादर ते मरीन ड्राईव्ह अशी जलवाहतूक कुण्या मराठी व्यापाऱयाने केली तर मुंबईच्या कितीतरी ट्रफिक जामची समस्या सुटेल व समुद्राचा वापर योग्यही होईल. लोकांची सोयही होईल. करण्यासारखं खूप काही आहे. पण आधी केलेची पाहिजे!





























































