बाल मधुमेहींना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

बाल मधुमेहींचे जीवन हे इतर मुलांच्या तुलनेत खूप वेगळे असते. त्यांच्या दैनंदिन जीवनावर येणाऱया मर्यादा आणि मधुमेहामुळे निर्माण होणारी गुंतागुत ही नेहमीच त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा विषय असते. या पार्श्वभूमीवर अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणारी बाल मधुमेह दत्तक योजना निश्चितच दिलासादायक आहे.

फ्रेडरिक बॅन्टिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी इन्सुलिनचा शोध लावला आणि अवघे 29 किलो वजन असलेल्या 14 वर्षीय लिओनार्ड थॉम्पसन यास इन्सुलिनचे पहिले इंजेक्शन देण्यात आले. यानंतर लिओनार्डची रक्त शर्परा कमी झाल्याचे दिसून आले. पुढे या शोधासाठी 1923 साली फ्रेडरिक बॅन्टिंग यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इन्सुलिनच्या मानवावरील वापराला 11 जानेवारी 2022 या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

इन्सुलिनमुळे जगभरातील बाल मधुमेहींचे जीवन निश्चितच सुसह्य झाले. आज बाल मधुमेहींना इन्सुलिन डोस हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या बाल मधुमेह या व्याधीला काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी केलेले आयुर्वेदातील संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते.

बाल मधुमेहींच्या वेदना समजून घेऊन त्यांच्या जीवनाला आयुर्वेदाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणजे अनुयश आरोग्य प्रतिष्ठान. मधुमेही व्यक्तींच्या कल्याणासाठी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान कार्य करीत असून डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी 2006 मध्ये या संस्थेची स्थापना केली. समाजामध्ये मधुमेहाविषयी जागृती करणे आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मधुमेहासंदर्भात योग्य ती मदत सातत्याने करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे.

मधुमेह हा चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा आजार असून मधुमेह ही मानवजातीला भेडसावणारी सगळ्यात गंभीर आरोग्य समस्या आहे. मधुमेहाचे तीन प्रकार असतात. त्यामध्ये टाईप-1 डायबिटीस, टाईप-2 डायबिटीस आणि जस्टेशनल अर्थात गर्भारपणातील डायबिटीस. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात या तिन्ही प्रकारच्या मधुमेहींची संख्या वाढते आहे.

बाल मधुमेहींचे वाढते प्रमाण आणि त्यावर असलेला इन्सुलिन हा एकमेव उपाय ही अत्यंत चिंतेची बाब म्हणावी लागेल. सामान्यतः लहान मुलांमध्ये किंवा किशोरवयीन मुलांमध्ये टाईप-1 डायबिटीस विकसित होतो. त्याला वैद्यकीय भाषेत ऑटो इम्युन डिसऑर्डर असे म्हटले जाते. जेव्हा एखाद्या मुलाच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती त्याच्याच शरीरावर आक्रमण करते, तेव्हा ते आक्रमण अतिशय तीव्र स्वरूपाचे असते. अशा अवस्थेत ज्या पेशी आक्रमणाचा सामना करण्यासाठी पुढे येतात, त्या पूर्णपणे निष्क्रिय होतात. गुंतागुंतीच्या या स्थितीत शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन बंद होते आणि त्यालाच टाईप-1 डायबिटीस असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत मुलांना बाहेरून इन्सुलिन द्यावे लागते. कारण त्यांच्या बिटा कोशिकांमधून इन्सुलिनची निर्मिती अत्यल्प होते किंवा मुळीच होत नाही.

डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे निरीक्षण असे आहे की, इन्सुलिन या हार्मोनची निर्मिती स्वादुपिंड या ग्रंथीच्या बीटा कोशिकांद्वारे होते. हा अंतःस्राव्य ग्रंथीचा एक भाग आहे. सगळ्या अंतःस्रावी ग्रंथी या एकमेकांशी जोडलेल्या किंवा एकमेकांशी निगडित असतात. त्यामुळे एका ग्रंथीची कार्यप्रणाली बिघडली की, त्याचा परिणाम इतर ग्रंथींवर आणि त्यांच्या कार्यप्रणालींवर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या बाल मधुमेहींची पौगंडावस्थेतील शारीरिक वाढ आणि बदल या दोन्हीवर परिणाम होतो. डॉ. नांदेडकर यांच्या निरीक्षणानुसार बाल मधुमेहींची पौगंडावस्थेतील वाढ लांबणीवर पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मुलांना अनंत समस्यांचा सामना करावा लागतो. मधुमेहामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना इन्सुलिन द्यावे लागते. मात्र, यामुळे त्यांच्या रक्तशर्करेमध्ये खूप चढ-उतार होताना दिसून येतो. कारण त्यांना केवळ बाहेरून इन्सुलिन दिले जाते. मात्र नैसर्गिकपणे ज्या पद्धतीने शरीराच्या उर्वरित यंत्रणेने काम करणे अपेक्षित असते, ते होताना दिसत नाही.

बाल मधुमेहींच्या अंतर्गत शरीररचनेत इन्सुलिन निर्माण होण्याच्या यंत्रणेतील त्रुटीमुळे या मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो. ही मुले बऱ्यचदा एकलकोंडी राहतात. त्यांच्यात सर्वसामान्यपणे असलेल्या ऊर्जेची कमतरता असते. यातील बहुतांश मुले इतर मुलांबरोबर हिरीरीने खेळांमध्ये भाग घेत नाहीत. या सगळ्यामुळे हळूहळू ते नैराश्याला बळी पडतात. त्यांचे वय लहान असल्याने या सगळ्या शारीरिक आणि मानसिक अडचणी नेमक्या काय आहेत आणि त्यांचा सामना कसा करायचा याविषयी ते अनभिज्ञ असतात. यामध्ये घरातील बालमधुमेही आणि त्यांचे पालक या दोघांचीही पुचंबणा होते. या सगळ्याचे परिणाम या मुलांचे शिक्षण, नोकरी, करीअर, वैवाहिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्य या सगळ्यावर होतात. पर्यायाने त्यांचे जीवनमान आणि आयुर्मान खालावते.

बालवयात होणाऱ्या मधुमेहामुळे अनेक बालकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यांचे खेळणे, शाळा, अभ्यास या सगळ्याच बाबतीत त्यांना अनेक बंधनांचा सामना करावा लागतो. ही मुले खेळताना किंवा अन्य काही कारणाने पडली आणि त्यांना जखम झाली तर ती जमख भरून यायलादेखील वेळ लागतो. त्यामुळे बाल मधुमेह ही समस्या केवळ त्या बालकांसाठीच नाही, तर त्यांच्या संपूर्ण पुटुंबासाठी अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरते.

विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील 18 वर्षांखालील बाल मधुमेहींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच मधुमेहाने ग्रस्त बालकांबद्दल डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या मनात विशेष कणव असून हिंदुस्थानच्या या भावी पिढीसाठी त्यांनी बाल मधुमेह दत्तक योजना सुरू केली आहे. देशाच्या 67 व्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2016 रोजी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानने 67 बाल मधुमेही रुग्णांना उपचारांसाठी दत्तक घेतले. 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत दत्तक घेतलेल्या देशभरातील बाल मधुमेहींची संख्या 1221 पर्यंत पोहोचली आहे. या योजनेंतर्गत 18 वर्षांखालील टाईप-1 मधुमेह असलेल्या बालकांना अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याला मोफत औषध पाठवले जाते. विशेष म्हणजे हे औषध पाठविण्यासाठी लागणारा खर्चदेखील अनुयशतर्फे केला जातो.

डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या असे निदर्शनास आले आहे की, त्यांनी स्वतः संशोधन करून निर्माण केलेल्या आयुर्वेदिक औषधामुळे बाल मधुमेहींच्या रक्तशर्परेतील चढ-उतार थांबून ती स्थिर होण्यास मदत होते. रक्तशर्परा स्थिर झाल्यामुळे टाईप-1 प्रकारच्या डायबिटीसमध्ये होणारी गुंतागुंत कमी होण्यास मदत होऊन या मुलांचा आत्मविश्वास परत येतो, त्यांच्यात ऊर्जेचा संचार होतो. ही मुले इतरांमध्ये मिसळायला लागतात, त्यांच्यातील एकटेपणाची भावना कमी होते आणि त्यांना टाईप-1 डायबिटीस असला तरीही ते सर्वसामान्य आयुष्याचे धनी होतात. त्यांच्या शरीराच्या अन्य कार्यप्रणाली अधिक प्रभावीपणे कार्य करू लागतात. पौगंडावस्थेतून तारुण्यातील वाटचाल सुलभ होण्यास मदत होते. कोणतेही साईड इफेक्ट नसलेल्या या औषधामुळे बाल मधुमेहींची शारीरिक आणि मानसिक वाढ निसर्ग नियमाला धरून होते, असे अनेक निष्कर्ष डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्या संशोधनातून निर्माण करण्यात आलेल्या औषधाचे सेवन करणाऱया मुलांच्या निरीक्षणातून पुढे आले आहेत.

अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या तज्ञ डॉक्टरांकडून बाल मधुमेहींच्या पालकांना पह्नद्वारे योग्य प्रकारे मार्गदर्शन करून मोफत सल्ला दिला जातो. तसेच दर महिन्याला मिळणाऱया बाल मधुमेहींच्या फॉलोअप फॉर्मच्या आधारे पालकांच्या सगळ्या शंकांचे निरसनदेखील केले जाते.

डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी राबविलेला बाल मधुमेह दत्तक योजनेचा उपक्रम संपूर्ण देशातील एक महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रम मानला जातो. देशाच्या विविध राज्यांमधील ग्रामीण आणि विशेषतः दुर्गम भागातील बाल मधुमेहींना पोस्ट विभाग किंवा कुरियरच्या माध्यमातून विनामूल्य औषधे पाठविणारी अनुयश आरोग्य प्रतिष्ठान ही हिंदुस्थानातील पहिली संस्था असावी. अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या या योजनेचा लाभ 18 वर्षांखालील बाल मधुमेहींना घेता येतो. यासाठी अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या www.anuyash.org या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा 020-67393939 या क्रमांकावर संपर्प करावा.

[email protected]