>> मंगल गोगाटे
बागा तर बऱयाचशा देशांमध्ये असतात, परंतु सगळय़ात मनोहारी व दिलखेचक बागा हॉलंडमध्ये आहेत. युरोप फिरणारे प्रवासी हॉलंडमधील टय़ुलिप्सची बाग बघण्याचं स्वप्न घेऊनच प्रवास आखतात. दरवर्षी ही बाग सुमारे दोन महिने पर्यटकांसाठी खुली असते.
आपल्या देशातील लोकांना तर या बागेचं खास आकर्षण व कौतुक आहे. अनेक हिंदी सिनेमांनी या बागेची नेत्रदीपक दृश्य दाखवून लोकांना या बागेचं खास आकर्षण निर्माण झालं आहे. दरवर्षी जगभरातून सुमारे 8 लाख पर्यटक या जागेला भेट देतात. आतापर्यंत साधारणपणे 500 कोटी पर्यटकांनी या बागेच्या सुंदरतेचा आस्वाद घेतला आहे.
1950 मध्ये ती पहिल्यांदा लोकांसाठी खुली करण्यात आली आणि त्यावर्षी 2 लाख छत्तीस हजार लोकांनी इथे भेट दिली. यावर्षी ही बाग 71 व्या वेळेस खुली करण्यात येत आहे. यावर्षीचा खास विषय आहे. ”रंगीबेरंगी दुनिया.” 79 एकरच्या या जागेत सुमारे 70 लाख कंद इथल्या जमिनीत, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावले जातात आणि फुलं मार्चमध्ये फुलू लागतात. यासाठी 30 माळी वर्षभर पूर्णवेळ काम करत असतात. हंगाम संपल्यानंतर माळी सगळे कंद काढतात आणि त्यांचा नाश करून गुरा-ढोरांना खायला देतात.
टय़ुलिपच्या बागेबरोबरच इथे एक जपानी बाग, एक ब्रिटिश निसर्गदृश्य बाग, एक वसंत कुरण, एक नैसर्गिक बाग, एक ऐतिहासिक बाग, एक चक्रव्युहासमान बाग आणि 7 प्रेरणादायी बागा तयार केल्या जातात. ही बाग टय़ुलिप्सप्रमाणे मोठय़ा आकाराच्या कमळांसाठीही प्रसिद्ध आहे. तसेच डॅफोडिल्स, हायसिंथ, डेलिया अशी अनेक फुलेही इथे पाहायला मिळतात.
1857 मध्ये ब्रिटिश निसर्गदृश्य बाग म्हणून ही बाग चालू झाली, पण त्याहीपूर्वी अगदी 15 व्या शतकात ही जागा शिकारीसाठी आणि मसाले गोळा करण्यासाठी वापरली जाई, जे मसाले स्वयंपाकात वापरले जातात म्हणून या जागेचं नाव कल्कहप्द अथवा स्वयंपाकघराची बाग असं पडलं. 1949 मध्ये टय़ुलिपचे कंद उगवणारे 20 डच एकत्र आले आणि त्यांनी इथे कंद लावायला सुरूवात केली आणि मग त्यांनी इथे टय़ुलिपचे शो भरवण्यासाठी नियोजनास सुरूवात केली. मात्र ही फुलं मुळात हिमालयातल्या टियान शान या भागातील आहेत. नंतर टर्कीमागे ती हॉलंडला पोचली.
बागेच्या एका टोकाला एक पवनचक्की असलेल्या या 79 एकरांच्या जागेत पर्यटक इतके फोटो काढतात की ही बाग जगातील फोटोसाठी सर्वात जास्त वापरलेली जागा आहे. पूर्वी या फुलांचे रंग पटय़ापट्टय़ांचे नव्हते, पण एका व्हायरसमुळे ते तसे झाले, 17 व्या शतकात! आता ते तसे मुद्दाम बनवले जातात. 1634-37 या काळात टय़ुलिपच्या एका कंदाची किंमत हजार गिल्डर्स वा त्याहीपेक्षा जास्त मिळू लागली. एवढय़ा पैशात त्याकाळी कालव्यातलं एखादं घर सहज विकत घेता येई.
आता कमीतकमी 800 विविध प्रकारची टय़ुलिपची फुलं 42 लाख कंद लावून निर्माण केली जातात. दरवर्षी हे कंद लावण्याचा आराखडा बदलला जातो.
(2005 मध्ये टय़ुलिपच्या एका प्रकारच्या फुलांना ऐश्वर्या राय हिचं नाव दिलं आहे.)
एकूणच फुलांच्या बागा आणि परेड यासाठी हॉलंड खूप प्रसिद्ध आहे. तसंच ते परेडस्साठीही प्रसिद्ध आहेत. इथे इतकी फुल बनतात की त्यातली अर्धी निर्यात केली जातात. कुकेनहॉफशिवाय इतर अनेक शेतातही या फुलांची लागवड शेतकरी करतात.
यावर्षीही अनेक पर्यटकांनी इथे भेट द्यायचं ठरवलं असणार, परंतु कोरोनाच्या संकटामुळे डच सरकारने परिस्थिती आटोक्यात आणण्याच्यादृष्टीने ही बाग ठरवल्याप्रमाणे खुली होणार नाही. असं 23 मार्चला जाहीर केलं आहे. ते म्हणाले इथे होणारे सगळे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. परिणामी अनेक शेतकऱयांनी टय़ुलिप्स अक्षरश: कचऱयात फेकून दिली आहेत.
बागेला भेट देणाऱया इच्छुकांसाठी चांगली बातमी एवढीच की कुकेनहॉप्सचे व्यवस्थापन रोज एक आभासी (न्ग्rtल्aत्) व्हिडिओ इंटरनेटवर टाकतात. सध्या तोच पाहून आपण आपले समाधान करून घ्यायचे.





























































