प्रसाद नाकारूनी शास्त्रांचे पालन करती स्वामी !

>> निळकंठ कुलकर्णी

।। श्रीगुरुदेव दत्त ।।

” वासुदेव स्वामी जाता पंढरीसी ,

श्रीपांडुरंगाचे दर्शन घेतले
स्वामींनी ,

प्रसाद नाकारूनी शास्त्रांचे
पालन करती स्वामी ,

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भिलवडीवरून शास्त्रीबुवा पंढरपूरला आले श्रीपांडुरंगाचे दर्शन घेऊन ते बाहेर पडत होते महाद्वारात एक ब्राह्मण बसला होता शास्त्रीबुवांना डाळ्यांचा प्रसाद देऊ लागला शास्त्री बुवांनी तो नाकारला पण सौ अन्नपूर्णाबाईंनी मात्र तो घेतला तेव्हा सौ अन्नपूर्णाबाई म्हणाल्या ‘ अहो हा प्रसाद आहे ना ? ‘ नाकारू नका ! तुम्हांला खायचा नसेल तर खाऊ नका पण घेऊन जवळ बांधून ठेवा !’ मग शास्त्रीबुवांनी प्रसाद घेऊन एका फडक्यात बांधून घेतला जवळच्या एका धर्मशाळेत दोघांनी वस्ती केली.

रात्री स्वप्नांत श्रीपांडुरंग आले आणि शास्त्रीबुवांना म्हणाले ” आमचा प्रसाद तुम्ही का ग्रहण केला नाहीत ? ” शास्त्रीबुवा म्हणाले तो प्रसाद बाजारातील हरभरे ओले करून भाजलेल्या डाळ्यांचा होता असे डाळे ब्राह्मणाने खाऊ नयेत असे शास्त्र आहे हे शास्त्र आपणच निर्माण केले आहे ना ? ते आम्ही पाळतो शास्त्रपालनाचे आमचे ब्रीद असल्यामुळे प्रसादाचा अवमान करावा लागत आहे याबद्दल क्षमा असावी! ” बरे तर नका खाऊ ! ” असे म्हणून देव अदृश्य झाले जाग आल्यावर शास्त्रीबुवांनी ती पूरचुंडी शोधली पण ती नाहीशी झाली होती .

।। यतिचक्रवर्ती इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिंत अभंग ।।

।। पुंडलीकवर उभा विटेवर । नित्य कटीवर कर ठेवुनी ।।१।।

।। भिवरेचे तीरीं विख्यात पंढरी ।
नादब्रह्म वरी वरिष्ठा जी ।।२।।

।। त्या माजी विठ्ठल राहे जो निश्वल । चिन्मय केवळ काळकाळ ।।३।।

।। चंद्रभागेजवळ राऊळ विशाळ । तेथे घननीळ निर्मळ जो ।।४।।

।। राई रखुमाबाई ज्याच्या पाश्वेभागी । पाहतां वीतरागी भोगी हो कां ।।५।।

।। कटी बरोबर हा भव सागर ।
दावी भक्तोंद्वार वासु म्हणे ।।६।।

आपली प्रतिक्रिया द्या