
>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
महाराष्ट्राच्या चित्रकथी परंपरेचे तसेच कळसूत्री बाहुल्यांच्या परंपरेचे ज्येष्ठ कलावंत परशुराम गंगावणे यांना प्रतिष्ठsचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा गुणवंत, परंतु उपेक्षित असलेल्या अनेक लोककलावंतांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्यात पिंगुळीचे चित्रकथी कलावंत परशुराम गंगावणे यांच्यासोबतच गोव्याचे लोकसाहित्य-लोककला संशोधक विनायक खेडेकर, बिहारचे लौडा नाच्या रामचंदर मांझी, कर्नाटकच्या जोगती-जोगतिणी परंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱया मंजाम्मा जोगती या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील पुडाळ तालुक्यातील पिंगुळीचे परशुराम गंगावणे यांनी चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या या लोककलांना आपल्या कलांगण या संस्थेतर्फे पर्यटन संस्पृतीचा चेहरा दिला आहे.
चित्रकथी परंपरा पिंगुळी शैली आणि पैठणी शैली यासाठी प्रसिद्ध आहे. पैठणी शैलीचे कलावंत आता उरलेले नाहीत. पिंगुळी शैलीचे परशुराम गंगावणे हे आदिवासी ठाकर समाजातील चित्रकथी तसेच कळसूत्री बाहुल्या नाचविणारे आणि कथाकथन करणारे बाहुलेकार म्हणून प्रसिद्ध आहेत. परशुराम गंगावणे हे माझे ज्येष्ठ स्नेही. त्यांच्या ‘कलांगण’मध्ये अनेक वेळा गप्पांच्या मैफली झाल्या आणि त्यातून चित्रकथी परंपरा आणि कळसूत्री बाहुल्यांची परंपरा या दोन्ही परंपरांचा वेध घेता आला. मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्तक विष्णुदास भावे यांच्या 1843 साली सांगली मुक्कामी रंगभूमीवर आलेल्या ‘सीतास्वयंवर’ नाटकावर कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी परंपरा, भागवत मेळे, यक्षगान, तमाशा या कलांचा विलक्षण प्रभाव होता. चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या या मराठी रंगभूमीचा पूर्वरंग होतं असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. चित्रकथी परंपरा आणि कळसूत्री बाहुल्या हा परशुराम गंगावणे यांचा जीवनश्वास आणि जीवनध्यास आहे
परशुराम गंगावणे हे पिंगुळीतील गुढीपूरचे. त्यांची ‘कलांगण’ नावाची संस्था असून या संस्थेद्वारे ते पर्यटकांसाठी चित्रकथी आणि बोलक्या बाहुल्यांचे खेळ करतात. चित्रकथीचा वारसा त्यांच्या घरी पिढय़ान्पिढय़ांचा आहे. चित्रकथी परंपरा ही साधारणतः साडेतीनशे वर्षांपूर्वीची असून ठाकर समाजामध्येच ही परंपरा सुरू झाली. कागदावरील रंगीत चित्रे दाखवून वीणा, खुडूक (डमरूसदृश छोटे तालवाद्य) यांच्या साथीने कथाकथन करणारे चित्रकथी हे लोकसंस्पृतीचे उपासक आहेत. पिंगुळी शैली आणि पैठणी शैली अशा चित्रकथीच्या दोन शैली असून पैठणी शैली कालौघात अस्तंगत झाली. मात्र सिंधुदुर्ग जिह्याच्या पुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे पिंगुळी शैली अस्तित्वात आहे.
चित्रकथी सादरीकरणात निरूपण, संवाद, गायन अशा त्रिसूत्रीतून रामायण, महाभारत आणि पुराणे यातील कथांचे कथन होते. तसेच लाकडी बाहुल्या अथवा चर्मबाहुल्या तयार करून या बाहुल्यांचे खेळ दाखविले जातात. त्यामुळे परशुराम गंगावणे यांना चित्रकथी कलावंत तसेच बाहुलेकर असेही म्हणतात. त्यांच्या कथाकथनात सहजस्फूर्तता व उत्स्फूर्तता असते. चित्रकथी मांडी घालून बसतात. पोथी बांधण्याची फळीपुढे तो चित्रे ठेवतो. खांद्यावर वीणा, डाव्या हातात टाळ घेऊन तो उजव्या हाताने चित्रे बदलतो. दोन चित्रांच्या मधील प्रसंगांमध्ये तो एखाद्या अभंगाचे चरण लावून नीतिबोध करतो. रिद्धी-सिद्धीसह गणेशाचे अवतरण, गणेशाचे वंदन, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश, रामायण, महाभारतातील कथाकथन असे चित्रकथीचे स्वरूप असते.
गणेशाचे वंदन करणारे कविजन हे पात्र चित्रकथीमध्ये प्रारंभीच येते. या कविजन पात्राला गणेश आणि नंतर सरस्वती नीतिबोध करते. गणेश-सरस्वती वंदनेनंतर रामायण-महाभारत, नंदीपुराण, विष्णुपुराण, काशीखंड या ग्रंथांमधील एखादी निवडक कथा चित्रकथी सादर करतात. चित्रकथीच्या कविजन पात्रासारखेच दशावतारात सूत्रधार हे पात्र असते.
कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातला सूत्रधार बाहुल्यांच्या दोऱया आपल्या हातात घेऊन त्या खेळातील संचालन करतो. ‘बालरामायण’ हे रंगभूमीवर कळसूत्री बाहुल्या आणणारे संस्पृत भाषेतील एकमेव नाटक होय. या कळसूत्री बाहुल्यांचे अवयव हव्या त्या दिशेला फिरवता यावे म्हणून त्यांच्या अंगांतून तारा नेलेल्या असतात. या तारांनाच कळसूत्र असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिह्यामध्ये कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करताना मालवणी बोलीचा वापर करण्यात येतो. कळसूत्री बाहुल्यांसाठी सहा ते आठ लोकांचा संच असतो. रात्रभर पूर्वरंग आणि उत्तररंग या स्वरूपात हा कार्यक्रम चालतो. सिंधुदुर्ग जिह्यातील पुडाळ या तालुक्यातील चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांची परंपरा हा लोकसंस्पृतीचा अतिशय महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाश्रय लाभलेली ही कला काळाच्या ओघात नाहीशी झाली. मात्र परशुराम गंगावणे यांनी गेली 45 वर्षे हे आदिवासी ठाकर समाजाच्या पारंपरिक लोककला जतन व प्रसार करण्याचे काम करीत आहे. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ही लोककला जपून ठेवली. ठाकर आदिवासी ‘कलांगण’ म्युझियम अँड आर्ट गॅलरी हे सिंधुदुर्ग जिह्यातील पहिले आदिवासी लोककला संग्रहालय गंगावणे यांनी 3 मे 2006 पासून गुरांच्या गोठय़ामध्ये सुरू केले.
या संग्रहालयात सिंधुदुर्गचा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला, कळसूत्री बाहुल्या, चित्रकथी, बाहुल्या, पांगूळबैल, डोनावाद्य वादन, गोंधळ, पोतराज अशा लोककलांची मांडणी केली आहे. गंगावणे यांनी विश्राम ठाकर आदिवासी ‘कलांगण’ या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ’ , ‘व्यसनमुक्ती ’ , ‘स्वच्छ भारत अभियान’, ‘एड्स जागृती ’ अशा अनेक विषयांवर कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून कार्यक्रम केले आहेत. या लोककला जतन व संवर्धन करण्याचे काम पारंपरिक लोककलाकार परशुराम गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे करीत आहेत. त्यामुळेच हिंदुस्थान सरकारच्या सांस्पृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. यासाठी हिंदुस्थान सरकारच्या गुरु-शिष्य परंपरा या योजनेंतर्गत त्यांनी आठ कार्यशाळेतून दीडशेहून अधिक विद्यार्थी तयार केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश म्हणून इयत्ता 10 वीच्या इतिहास विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग आलेला आहे. पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल परशुराम गंगावणे यांचे अभिनंदन!
























































