खाऊच्या गोष्टी – खासमखास ख्रिसमस केक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

ख्रिसमसचं नातं जितपं सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री आणि गिफ्टस्सोबत जोडलं गेलंय आहे, तितपंच ते ख्रिसमस केकसोबत जोडलं गेलंय. केकच्या अगणित प्रकारात फ्रुट केक, प्लम केक, रम केक विशेष करून ख्रिसमस केक खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. ख्रिसमस केकच्या उगमाची ही गोड गोष्ट…

पूर्वीच्या काळी ख्रिसमस हा अनेकांसाठी उपवासाचा काळ असे. उपवासानंतर पोटात जाणारा पदार्थ म्हणून लापशीसदृश पदार्थ खाल्ला जाई. त्यात फळं, मध अशा अधिक ऊर्जा देणाऱया पदार्थांचा समावेश असे. त्याचप्रमाणे ख्रिसमस स्पेशल पुEिडग घरोघरी तयार होई. त्या पुEिडगमधील मूळ पदार्थ कायम ठेवत हेच ख्रिसमस पुडिंग पुढे केकमध्ये परावर्तित झालेलं दिसतं.

16 व्या शतकात लोकांनी अधिक उंची, श्रीमंती घटकांचा समावेश ख्रिसमसमधल्या विशेष पदार्थांत करायला सुरुवात केली. पूर्वी वापरल्या जाणाऱया ओटस्च्या जागी मैदा, अंडी आली. ते पदार्थाला बांधून ठेवण्यात उपयोगी होते, त्यामुळे लापशीची जागा तुलनेनं घट्ट केकने घेतली. पूर्वेकडील देशांतून आणलेल्या पदार्थांचा केकमध्ये वापर करणं त्याकाळी प्रतिष्ठsचं मानलं जाई. गंमत म्हणजे आजकाल केकवरचं आयसिंग ही अतिशय सर्वसामान्य बाब असली तरी प्राचीन काळात आम्ही साखर वापरण्याइतपत श्रीमंत आहोत हे दाखवण्यासाठी हे आयसिंग केलं जाई. सर्वसामान्यांना आयसिंग परवडत नसे, कारण साखर फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होती.

एकेकाळी ख्रिसमस 12 दिवस साजरा केला जात असे. औद्योगिक क्रांतीच्या काळात दिवस कमी झाले आणि ख्रिसमसचा कालावधी आठवडय़ापुरता मर्यादित झाला, पण काही प्रथा कायम राहिल्या. केकमध्ये नाणं सरकवणं ही त्यातलीच एक. बटरपेपरमध्ये नाणं ठेवून ते केकमध्ये ठेवलं जात असे. केक खाताना ज्याला ते नाणं मिळणार त्याला वा तिला राज्यपद मिळणार असं मानलं जाई.

ख्रिसमस केक बऱयाचदा खूप आधी बनवले जातात. काही वेळा अगदी नोव्हेंबरमध्येच केक बनवून हवाबंद डब्यात ठेवले जातात. मात्र अशा वेळी माफक प्रमाणात ब्रॅण्डी, शेरी, रम अथवा व्हिस्की या केकवर आठवडय़ातून एकदा ओतली जाते. याला ‘फिलिंग द केक’ असं म्हटलं जातं.

जपानमध्ये पूर्वी 25 वर्षांवरील स्त्र्ााrला गंमतीत ख्रिसमस केक म्हटलं जाई. 25 डिसेंबर नंतर त्या केकचं महत्त्व जसं कमी होतं तसं पंचवीशीनंतर स्त्रीचं कमी होणारं महत्त्व दर्शवणारी ही म्हण होती. आता हीच उपाधी 25 ऐवजी तिशीच्या पुढच्या स्त्रीसाठी वापरली जाते.

हिंदुस्थानचा विचार करता ख्रिसमस केकची प्रथा ब्रिटिशांसोबत रुजली. 1883 मध्ये तलासरी येथील ब्रिटिश अधिकारी ब्राऊन याने स्थानिक खानसामा मंबली बापू याला इंंग्लंडवरून आणलेला खास आणि महागडा केक खायला दिला आणि तसाच केक बनवायला सांगितला. पूर्वी केक बनवण्यासाठी यिस्टचा वापर होई, पण बापूने त्याजागी काजू, सफरचंद आणि स्थानिक केळी यांच्यापासून बनवलेल्या मद्याचा वापर केला. यातून बनलेल्या ख्रिसमस केकची चव आणखीनच खास होती. त्यानंतर हिंदुस्थानात ख्रिसमस केकची परंपरा निर्माण झाली आणि ती लोकप्रिय ठरली.

हिंदुस्थानसारख्या देशात जिथे विविध धर्मांची लोपं गुण्यागोविंदाने नांदतात, तिथे विविध धर्मियांच्या सणांचा आनंद खवय्येगिरीतून घरोघरी पोहोचतो. ख्रिसमसचा आनंद या केकमधून अनुभवता येतो. विशेष करून या दिवसांत काही उपनगरातून होणारा फेरफटका केक बेपिंगच्या सुगंधी आठवणी जाग्या करतो.

आजकाल उठताबसता केक आणायची सवय आपल्याला जडली आहे. सेलिब्रेशन आणि केक यांचं नातं जुळलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे केक शॉप्सची विपुल. पण या गदारोळात ख्रिसमस केक आजही आपलं वैशिष्टय़ राखून आहे. पारंपरिक पाककृतीतून जन्माला आलेल्या प्लम किंवा रम केकचा तुकडा जीभेवर पडतो. काहीसा कडवट गोड हवाहवासा स्वाद जीभेवर पसरतो आणि ओठात आपसूकच शब्द येतात. मेरी ख्रिसमस.