सुंदर आणि सोज्वळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

1950 ते 1980 हा मराठी चित्रपटाचा गर्भश्रीमंतीचा काळ. या काळात पडद्यावर अनेक दिग्गज अभिनेत्री आपल्या तेजासह, गुणांसह नांदल्या. त्या अभिनेत्री-नायिका म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील वसंतवेलीच. सुलोचना, उषा किरण, जयश्री गडकर, उमा भेंडे, सीमा देव, आशा काळे आणि स्मिता पाटील… या सर्वांनी पावित्र्य, मांगल्य, प्रसन्नतेचा आविष्कार रुपेरी पडद्यावर साकारला. रुपेरी पडद्यावरच्या या नायिकांनी रसिकांच्या मनात कायम वसंतवेल फुलवली आहे. त्या वसंतवेलींना भेटा या नव्या सदरातून…

मराठी चित्रपटसृष्टीचा जेव्हा सुवर्णकाळ होता त्यावेळी मंगला खाडिलकर निवेदिका म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर अनेकांच्या मुलाखती घेत होत्या. चाळीस वर्षे त्या सातत्याने व्रत घेतल्याप्रमाणे रसिकांना मुलाखतींमधून मनसोक्त आनंद देत होत्या. अजूनही त्या कार्पाम करताना दिसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील सुलोचना, उषा किरण, जयश्री गडकर, उमा भेंडे, सीमा देव, आशा काळे आणि स्मिता पाटील या सप्ततारका नव्हे, तर सप्तकन्याच! त्या सर्वांनी पावित्र्य, मांगल्य, प्रसन्नता… यांचा आविष्कार रुपेरी पडद्यावर साकारला. तो आदर्श वाटावा असाच आहे. त्यांचे योगदान मराठी चित्रपटसृष्टी कदापि विसरणार नाही.

मंगला खाडिलकर यांनी 40 वर्षांत अनेक सांगीतिक कार्पामांत सहभाग नोंदवला आहे. निवेदकाची भूमिका इतकी तन्मयतेने साकारली की, निवेदन कसं करावं याचा परिपाठ त्यांनीच घालून दिला. नवीन निवेदकांना आणि त्या क्षेत्रात हल्ली नाव सिद्ध केलेल्या निवेदकांसाठी त्या एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आपल्या या प्रदीर्घ प्रवासातील आठवणींचा पदर उलगडताना त्या म्हणाल्या, सध्याची जी पिढी आहे ती सर्व बाबतीत समृद्ध आहे आणि मला त्यांचा अभिमान आहे. आपल्याला कुठे जायचंय ते वयाच्या कुठल्याही वळणावर कळत राहावं याची जाण मला या कार्पामांनी दिली आहे. आम्ही त्या काळी ज्या-ज्या ठिकाणी कार्पाम केले, त्याची आठवण या घडीला येतेय. त्या सर्व वादक कलाकारांबरोबर केलेले कार्पाम आठवतात. कुर्ल्याला केलेला कार्पाम तर कधीही विसरणार नाही. कारण तो कार्पाम रात्री 12 वाजता होता. 12 वाजता प्रेक्षक येतात आणि तेही गॉगल लावून? मी वादकांना विचारायचे की, यांना दिसतं कसं रे? पण तो एक वेगळा माहौल होता.

सुलोचना दीदी यांनी जेवढय़ा भूमिका साकारल्या त्यातून पावित्र्य तर दिसून आलंच, त्याहीपेक्षा नथ  घालावी ती सुलोचना दीदी यांनीच. तसंच नऊवारीचा पदर डोक्यावरून घेतल्यानंतर जी शालीनता आणि मराठी संस्कृती दिसून यायची ती त्यांच्याकडूनच. त्याला तोडच नाही. मंगला खाडिलकर सुलोचना दीदींविषयी म्हणाल्या, 1950  ते 1980 हा मराठी चित्रपटाचा गर्भश्रीमंतीचा काळ, जो प्रयोगशीलतेचा काळ होता. त्या काळाचं भाग्य असे की, या पडद्यावर अनेक वसंतवेली आपापल्या तेजासह, गुणांसह नांदल्या. नात्यांची बूज राखणारी, मायेचं लिंपण करणारी, आपले संस्कार पडद्यावर आपल्या देहबोलीतून आणि अभिनयातून दाखवणारी अशी नायिका म्हणजे सुलोचना दीदी. मराठी, हिंदी भाषेतून अभिनयाचा पाम करणाऱया अशा त्या होत्या म्हणूनच त्या वसंतवेलीत त्यांचं पहिलं रूप आहे.

वसंतवेलीत दुसरं रूप आहेत जयश्री गडकर. ‘साधी माणसं’ या चित्रपटातील त्यांचं रूप अजूनही दृष्टीआड होऊ शकत नाही. त्याबद्दल मंगला खाडिलकर म्हणाल्या, मराठी संस्कृतीची दोन रूपं म्हणजे सुलोचना दीदी आणि जयश्री गडकर. ‘साधी माणसं’मधली जयश्री गडकर यांच्या कपाळावरची कुंकवाची आडवी चिरी आणि खणाची चोळा, या वेशभूषेतून कष्टकरी वर्गाचं चित्र उभं केलं. त्यांच्यासारखा सौष्ठवपूर्ण चेहरा आणि देहबोली दुसऱया नायिकेत सापडणार नाही. लावणीचं लावण्य सादर करणाऱया जयश्रीबाई ‘साधी माणसं’मध्ये प्रथमच नायिका म्हणून आल्या आणि त्यांनी सर्वांची मनं जिंकली. एकेकाळी संध्याच्या मागे नृत्य करणाऱया जयश्रीबाई नायिका बनल्या. पडद्यावर दिसावं कसं, तर जयश्रीबाईंसारखं, अदा करावी तर जयश्रीबाईंनीच. महाराष्ट्रातील कुलशील आणि संस्कृती सांगणाऱया देहबोलीतून अभिनय करणाऱया जयश्रीबाईच. साध्या वेषात त्यांनी मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं. भाता शिकण्यासाठी सतत आठ दिवस लोहाराच्या आळीत जाऊन चांदुलीबाईंकडून (ज्या नायिकांना नऊवारी साडय़ा नेसवायच्या) भाता कसा चालवायचा हे शिकल्या. नात्यांचं लिंपण करणारी, मायेचं अस्तर लावणारी ही नायिका  सगळ्या नात्यांच्या वेलीतून येते.

[email protected]