
>> सुभाषचंद्र सुराणा
पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना पार्ले कंपनीचे मेलोडी चॉकलेट भेट दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात व परदेशांतून क्विक फॉर्म्सवर मेलोडीची मोठी मागणी येऊ लागली व त्याचा तुटवडा जाणवू लागला. पार्ले मेलोडी ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी टॉफी. सोशल मीडियावर मेलोडीचा ट्रेण्ड व्हायरल झाल्यामुळे दलाल स्टीटवर एक वेगळ्याच मेलोडीचा सूर लागला. अनेक गुंतवणूकदारांनी घाईगडबडीत पार्ले इंडस्ट्रीज, जी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, त्या कंपनीच्या समभाग खरेदीस सुरुवात केल्याने या कंपनीच्या समभाग खरेदीची लॉटरी पार्ले इंडस्ट्रीजला लागली. वास्तविक ही कंपनी इमफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस्, रिअल इस्टेट आणि मेमरी साईक्लिंग या व्यवसायासाशी निगडित आहे, परंतु तो शेअर मार्केटच्या लिस्टिंगवर असल्याने या कंपनीच्या शेअर खरेदीमुळे 5 टक्क्यांनी विक्री वाढून ती अप्पर सर्किटमध्ये पोहोचली. या कंपनीच्या समभागाची किंमत 5.25 रुपये आहे. देशभरात 8.57 लाख शेअर्सची खरेदी, विक्री झाली. चुकीच्या व नामसाधर्म्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईगडबडीत फक्त ‘पार्ले’ या नावामुळे चुकीची शेअर खरेदी केली आणि पार्ले फ्रूट इंडस्ट्रीजला पेनीस्टॉकचा फायदा झाला. ‘मेलोडी’ ड्राम्यामुळे देशातून भारतीय बनावटीच्या चॉकलेट टॉफीची निर्यात 166 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये निर्यात 132 कोटी रुपये एवढी वाढली, अशी माहिती वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडियावर दिली. आर्थिक वर्ष 2013-2014 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात 49.68 कोटी रुपये होती. टॉफी निर्यातीतील वाढ ही भारताची वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगती तसेच कष्ट करण्याची क्षमता वाढल्याचे प्रतीक आहे. भारतीय कन्फेक्शन कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उच्च दर्जाची श्रेणी सुधारल्यामुळे आपल्या देशातील टॉफी, चॉकलेट यांना आफ्रिका, पश्चिम आशिया, दुबई, लंडन येथून चांगली मागणी येत आहे. यापूर्वी आपल्याकडे ‘रावळगाव’ शुगर फॅक्टरीची टॉफी फेमस होती. अनेक छोटय़ा, मध्यम कंपन्यांच्या संत्रा, लेमन, मिंटच्या टॉफी व कॅण्डींना चांगली मागणी आहे.































































