>> योगेश मिश्र
हिंदुस्थानात पाळीव कुत्र्यांच्या देखभालीची बाजारपेठ दरवर्षी 13.9 टक्क्यांच्या दराने वाढत आहे. हा व्यवसाय 2025 मध्ये 80 कोटी डॉलरवर पोहोचलेला असेल, असा अंदाज आहे. 2023 च्या अखेरपर्यंत हिंदुस्थानात कुत्रा हा सर्वाधिक लोकप्रिय पाळीव प्राणी बनलेला असेल. हिंदुस्थानींमध्ये विदेशी कुत्र्यांबाबत एक व्रेझच निर्माण झाली आहे. ज्या मुक्या प्राण्यांबद्दल आपल्याला जराही माहिती नाही, अशा कुत्र्यांना पाळण्याचा आग्रह घराघरातून होत आहे. हा केवळ या जनावरांवरील अत्याचार नसून आपले घर, घरातील लोक आणि अन्य लोकांसाठीही धोका आणि जोखीम आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या पैसरबाग भागात पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने आपल्या मालकिणीचाच जीव घेतला. सुशीला त्रिपाठी ही महिला कुत्र्याच्या हल्ल्यात ठार झाली. ऐंशी वर्षांच्या सुशीला यांचा मुलगा अमित याला कुत्र्यांची आवड असून त्याने एक पिटबुल आणि एक लॅब्रेडॉर कुत्रा पाळला आहे. अमित स्वतः जिम ट्रेनर आहे. त्याच्या आईचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर खळबळ माजली. महापालिका कुत्र्याला घेऊन गेलीच; पण लोकांनीही तऱहेतऱहेची मते मांडायला सुरुवात केली. या घटनेनंतर अमितनेच कुत्र्याला ठार का केले नाही? आईच्या मृत्यूनंतरही त्याचे कुत्र्यावरील प्रेम अबाधित कसे राहिले? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. काही जण म्हणाले, कुत्र्याचा काय दोष? काहींनी सांगितले की, कुत्र्याच्या या खास प्रजातीवर चाळीस देशांमध्ये बंदी आहे, मग इथेच ते पाळण्याची अनुमती मिळतेच कशी? अमितला तुरुंगात पाठवायला हवे का? कुत्र्याला शिक्षा देता येऊ शकेल का? दिलीच तर त्यामुळे समस्या सुटेल का? असे प्रश्नही उपस्थित झाले.
गुरुग्राममधील मिलेनियम सिटी असो वा लखनौचे मोहल्ले असोत, वेगवेगळय़ा जातींचे कुत्रे तेथील लोकांच्या घरात पाहायला मिळतात. आता तर काही घरांमध्ये असे कुत्रे दिसू लागले आहेत, जे पूर्वी आपल्याला परदेशी चित्रपटांमधूनच फक्त पाहायला मिळत असत. जर्मन शेफर्ड किंवा डॉबरमन कुत्रा पाळून लोकांना आता आपला जीवनस्तर उंचावल्यासारखे वाटत नाही. आता ल्हासा अप्सू, अलास्कन हस्की, पिटबुल, चिहुआहुआ अशा कुत्र्यांमध्येच या धनिकांना स्टेटस सिम्बल दिसतो. लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्रीव्हर हे कुत्रे आता अगदी सामान्य झाले आहेत. आता पिटबुलसारख्या लढाऊ प्रजातीची व्रेझ लोकांमध्ये आहे. ज्या मुक्या प्राण्यांबद्दल आपल्याला जराही माहिती नाही, ज्यांचे आजवर केवळ पह्टोच बघितलेत, अशा कुत्र्यांना पाळण्याचा आग्रह घराघरातून होत आहे. हा केवळ या जनावरांवरील अत्याचार नसून, आपले घर, घरातील लोक आणि अन्य लोकांसाठीही धोका आणि जोखीम आहे.
वस्तुतः विदेशी कुत्र्यांबाबत हिंदुस्थानींमध्ये एक प्रकारची व्रेझच निर्माण झाली असून, ती वरवरची आहे. आपल्या समाजशास्त्राविषयी ही व्रेझ बरेच काही सांगून जाते. वरवर पाहूनही बऱयाच गोष्टी समजतात. वोडापह्नच्या जाहिरातीत जेव्हा पग जातीचे कुत्रे लोकांनी पाहिले, तेव्हा हे पाळण्यात काय-काय अडचणी येतात हे माहीत नसतानाच लोकांनी मोठय़ा प्रमाणावर पग कुत्री खरेदी करण्यास सुरुवात केली. आजही दरवर्षी पन्नास हजार पग कुत्री अवैधरीत्या हिंदुस्थानात आणली जातात. सगळय़ात ट्रेंडिंग जातीच्या कुत्र्याचे मालक होण्याची आंधळी शर्यत लागली असून, त्यासाठी लोक काहीही करू लागले आहेत… कुत्र्यांची फर कापून टाकण्यापासून कुत्र्यांना वातानुकूलित खोलीत बंदिस्त करण्यापर्यंत…! आजकाल हस्की कुत्रे पाळण्याची फॅशन आली आहे. ही प्रजाती बर्फाळ आणि अतिथंड प्रदेशांमध्ये आढळते. हस्कीच्या शरीरावरील नैसर्गिक फर (केस) इतकी दाट असते की, उणे 52 अंश सेल्सिअस तापमानातही त्याला काही होत नाही, परंतु आपल्याकडे लोकांनी चेन्नई, लखनौ, दिल्ली अशा 50 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचलेल्या शहरांमध्ये अशी कुत्री पाळली आहेत. दिल्ली, नोएडा, मुंबई आदी शहरांमध्ये पाळीव कुत्री रस्त्यावर सोडून दिल्याच्या बऱयाच घटना घडतात. लोक हौसेने विदेशी कुत्री आणतात आणि त्यांची देखभाल करता येत नाही तेव्हा ती रस्त्यांवर सोडून देतात.
वस्तुतः पाळीव प्राणी आणण्याची व्रेझ किंवा ट्रेंड हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर वाढत चालला आहे आणि भविष्यातही तो वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. शहरांच्या विकास आणि वृद्धीबरोबरच गेल्या काही वर्षांत अनेक लोकांच्या उत्पन्नातसुद्धा वेगाने वृद्धी झाल्याचे दिसून आले आहे. अशा लोकांचा पाळीव प्राण्यांबद्दलचा दृष्टिकोन बदलला आहे. आता लोक पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्य म्हणून घरात स्थान देतात. सुरुवातीच्या काळात आपला मदतनीस म्हणून माणसाने कुत्रा पाळायला सुरुवात केली होती. कुत्र्याला अनेक किलोमीटरवरील वास येतो. ओरिजिन्स ऑफ डॉग ः डोमेस्टिकेशन अॅण्ड अर्ली हिस्ट्री या पुस्तकात म्हटले आहे की, 1600 वर्षांपूर्वी पश्चिम युरोपात लांडग्यांना माणसाळवून पाळण्यास सुरुवात झाली. तसेच इस्रायलमध्ये खोदकाम करताना एका वृद्ध व्यक्तीच्या अवशेषांबरोबरच कुत्र्याच्या पिल्लांचे अवशेष मिळाल्याचा उल्लेखही या पुस्तकात आहे.
पॅनिस ल्यूपस फॅमिलियराइज हे कुत्र्याचे शास्त्राrय नाव होय. कुत्रा हा लांडग्याच्या वंशातील आहे. कुत्र्याचे सरासरी आयुष्य बारा वर्षांचे असते. सर्वाधिक वर्षे जगलेल्या कुत्र्याचे नाव मॅगी होते आणि ते 29 वर्षे 5 महिने जगले. कुत्र्याचे तेरा रक्त गट असतात. कुत्र्यांना लाल आणि हिरवा रंग दिसत नाही. कुत्र्याची वास घेण्याची शक्ती माणसाच्या एक हजार पट अधिक असते. कुत्र्यांनाही स्वप्ने पडतात. प्रत्येक कुत्र्याच्या नाकाचे ठसे (नोज प्रिन्ट) वेगळे असतात. प्रतिसेपंद 45000 पंपने होणारा आवाजही कुत्र्याला ऐकू येतो. माणूस केवळ 20000 पंपने असलेला आवाजच ऐकू शकतो. कुत्रा वेगवेगळळय़ा दहा आवाजांमध्ये भुंकू शकतो. कुत्र्याच्या शरीराचे तापमान 100 ते 120.5 फॅरनहाइट यादरम्यान असते. चॉकलेट खाल्ल्यामुळे कुत्र्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अंतरिक्षात जो पहिला जीव जाऊन आला, तो कुत्राच होता. लाइक नावाचा हा कुत्रा 3 नोव्हेंबर 1957 रोजी अंतरिक्षात पाठविण्यात आला होता.
ईशान्येकडील काही राज्यांमध्ये कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. नागालँडमध्ये कुत्र्याचे मांस सर्वाधिक विकले जाते. हिंदुस्थानात पाळीव कुत्र्यांच्या देखभालीची बाजारपेठ दरवर्षी 13.9 टक्क्यांच्या दराने वाढत आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱया बाजारपेठांपैकी हिंदुस्थानही एक आहे. हा व्यवसाय 2025 मध्ये 80 कोटी डॉलरवर पोहोचलेला असेल, असा अंदाज आहे. 2023 च्या अखेरपर्यंत हिंदुस्थानात 3 कोटी 10 लाख पाळीव कुत्री असतील आणि कुत्रा हा सर्वाधिक लोकप्रिय पाळीव प्राणी बनलेला असेल. हिंदुस्थानात मांजर हा दुसऱया क्रमांकावरील पाळीव प्राणी आहे. प्राणी पाळणाऱयांपैकी 20 टक्के लोकांकडे मांजर आहे. 2021 मध्ये हिंदुस्थानात 41 टक्के लोकांकडे कोणताही पाळीव प्राणी नव्हता. हिंदुस्थानात दरवर्षी 6,00,000 प्राणी पाळण्यासाठी घरी नेले जातात. पाळीव प्राण्यांसाठी खाद्याची बाजारपेठ हिंदुस्थानात 310 दशलक्ष डॉलर इतकी मोठी असून, प्राण्यांचे मालक आपल्या पाळीव प्राण्यांवर दरमहा सरासरी 4000 रुपये खर्च करतात. हिंदुस्थानात पशुचिकित्सा बाजारपेठेचा आकार 169 दशलक्ष डॉलर इतका आहे आणि 2027 पर्यंत तो 186 दशलक्ष डॉलरवर पोहोचलेला असेल. हिंदुस्थानात पाळीव प्राण्यांचे ग्रुमिंग करणारे लोक दरमहा 10 ते 25 हजार रुपये कमावतात. यावरून असे दिसून येते की, पाळीव प्राण्याची बाजारपेठ भले वाढत असली, डॉग लव्हर्सची संख्या भले वाढत असली तरी श्वानांची देखभाल करण्याइतका वेळ लोकांकडे नाही.
शहरांमध्ये सुमारे 50 टक्के लोकसंख्या फ्लॅटमध्ये राहते. अनेक जातींच्या कुत्र्यांच्या गरजा फ्लॅटमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत. मेटिंगची संधीही कुत्र्यांना मिळत नाही. या सर्व कारणांमुळे कुत्री आक्रमक होत जातात. इराणमध्ये कुत्रा आणि मांजर पाळण्यावरच बंदी आहे. तो गुन्हा मानण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. इराणमध्ये कुत्र्यांसाठी तुरुंगसुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर, सुशीला त्रिपाठी यांना चावा घेऊन ठार करणाऱया कुत्र्याचे भविष्यात काय होते, हे पाहावे लागेल. कुत्रा पाळण्यापूर्वी एक विचार निश्चितपणे केला पाहिजे तो असा की, तो एक जीव आहे. पाळीव प्राण्याची देखभालही माणसाप्रमाणेच करावी लागते. आपण हे करू शकू का, हा प्रश्न प्राणी पाळण्यापूर्वी स्वतःला विचारला पाहिजे. कुत्र्यांनाही नोकर-चाकरांच्या हवाली करायचे असेल तर ती पाळायचीच कशाला?
(लेखक लखनऊ येथील ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आहेत)




























































