धनादेश ‘बाउन्स’ किंवा ‘डिसऑनर’ झाला तर…?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ऍड. शिवांगी झरकर

चेक बाउन्स किंवा डिसऑनर हा अक्षम्य गुन्हा आहे. त्यामुळे चेक देणाऱयाने आणि घेणाऱयाने चेक बाउन्स किंवा डिसऑनर होऊन पैशाचा व्यवहार बिघडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. सर्व नियमांचे योग्य पालन करावे. चेक हे एक व्यवहारातील पैशाच्या सुरक्षेतेचे साधन आहे. तो बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर कडक कारवाई होते आणि फार कमी वेळात न्याय मिळतो. म्हणून चुकीच्या व्यक्तींकडून चेक घेणे टाळा. जिथे विश्वास आहे तिथेच चेक घ्या किंवा द्या!

आपल्या देशात शेकडो बँका आहेत आणि त्या बँकांच्या आर्थिक व्यवहारातील सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे चेक. उद्योग क्षेत्रातील दैनंदिन व्यवहारात चेक नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या पेमेंटबद्दल सुरक्षितता हवी असेल तर आगाऊ पेमेंटबद्दल धनादेश (चेक) घेतला जातो. दैनंदिन जीवनात कोणी शाळेची/महाविद्यालयाची फीज चेकने भरतो तर काही लोक कर्जाचे हफ्ते चेकने भरतात. एखाद्याला उधारीवर (क्रेडिट) माल वा वस्तू हव्या असतील तर उरलेल्या पेमेंटची सुरक्षितता म्हणूनदेखील चेकचा वापर केला जातो.

धनादेश हा निगोशिएबल इंस्टमेंट ऍक्टमध्ये येतो. त्यामुळे त्याला एक प्रकारचे बिल ऑफ एक्सचेंज मानले जाते. समोरच्याला चेक देताना एकतर क्रॉस किंवा अकाउंट पेयी करून दिला जातो. बऱयाच वेळेला चेक दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर बाउन्स होतो किंवा डिसऑनर होतो किंवा केला जातो. चेक बाउन्स किंवा डिसऑनर होण्याची बरीच कारणे असतात. कधी कधी चेक दिल्यानंतर पेमेंटबद्दल लोकांना लक्षात रहात नाही आणि अकाउंटमध्ये योग्य ती रक्कम नसल्यामुळे चेक बाउन्स होतो. परंतु काही लोक समोरच्याला फसवण्याच्या दृष्टीने चेक देतात आणि नंतर पैश्याच्या अभावी चेक बाउन्स होतो.

z चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर काय करायचे?
जेव्हा चेक बाउन्स किंवा डिसऑनर होतो तेव्हा बँक एक चेक रिटर्न मेमो तयार करते, ज्यामध्ये पेमेंट न केल्याची संपूर्ण माहिती असते. नंतर ज्याच्या नावाचा चेक होता (चेक होल्डर) आणि जो डिसऑनर झाला तो डिसऑनर चेक आणि चेक रिटर्न मेमो त्या व्यक्तीला देते. चेक होल्डर, तीन महिन्यांमध्ये तो चेक पुन्हा बँकेत पेमेंटसाठी टाकू शकतो जेणेकरून दुसऱयांदा तरी चेक वाटला जाईल. परंतु जर पुन्हा चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर चेकहोल्डरला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तो त्याच्या पैशासाठी समोरच्यावर कायदेशीर कारवाई करेल.

z चेकहोल्डर कधी कायदेशीर कारवाई करू शकतो?
जेव्हा चेकहोल्डरला दिला गेलेला चेक हा आर्थिक व्यवहारासाठी, कर्जाचे हफ्ते म्हणून असेल. परंतु जर बेकायदेशीर प्रकारे जर हा चेक फसवून घेतला असेल तर त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही.

z काही महत्त्वाच्या सूचना –
1. चेक ज्याच्या नावाचा आहे त्याच्याच नावाचे अकाऊंट असावे. चेक देणाऱयानेसुद्धा त्यांच्या नावानेच चेक द्यावा.
2. चेक हा पैशाच्या अभावामुळे बाउन्स किंवा डिसऑनर झालेला हवा.
3. जर चेक देणाऱयाने नोटीस मिळाल्यावर येणाऱया 15 दिवसांत पेमेंट नाही केले तर गोशिएबल इंस्टमेंट ऍक्टच्या कलम 138 प्रमाणे कारवाई केली जाईल.
z चेक बाउन्स किंवा डिसऑनरमध्ये असलेला गुन्हा आणि मिळणारी शिक्षा ः
z फौजदारी (क्रिमिनल) खटला (केस) ः
चेक बाउन्स किंवा डिसऑनरमध्ये जर चेक देणारा गुन्हेगार असेल तर जेवढय़ा रकमेचा चेक आहे त्याच्या दुप्पट रक्कम किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. चेक बाउन्स किंवा डिसऑनर करणाऱयाचे चेक बुक थांबवले जाते.
z दिवाणी (सिव्हील) खटला (केस) ः
पैशाच्या वसुलीसाठी चेकधारक दिवाणी न्यायालयात खटला (केस) दाखल करू शकतो.
जर उद्योगात कोणी उधारीवर माल मागत असेल तर तुम्ही पैशाची सुरक्षा म्हणून समोरच्या व्यक्तीकडून चेक घेऊन आपले पेमेंट सुरक्षित करू शकता. 90 टक्के केसेसमध्ये लिगल नोटीस मिळण्यानंतर पेमेंट केली जातात. आजच्या धकाधकीच्या काळात पैशाची सुरक्षा ही सर्वात मोठी जबाबदारी आहे म्हणून चेक बाउन्स किंवा डिसऑनरला फौजदारी खटल्यात पकडले जाते आणि कठोर शिक्षा ठोठावली जाते .
चेक बाउन्स किंवा डिसऑनर हा अक्षम्य गुन्हा आहे. त्यामुळे चेक देणाऱयाने आणि घेणाऱयाने चेक बाउन्स किंवा डिसऑनर होऊन पैशाचा व्यवहार बिघडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. सर्व नियमांचे योग्य पालन करावे. चेक हे एक व्यवहारातील पैशाच्या सुरक्षेतेचे साधन आहे. तो बाउन्स किंवा डिसऑनर झाला तर कडक कारवाई होते आणि फार कमी वेळात न्याय मिळतो. म्हणून चुकीच्या व्यक्तींकडून चेक घेणे टाळा. जिथे विश्वास आहे तिथेच चेक घ्या किंवा द्या!
n www.advshivangi.com
(Founder of Law Fleeter Adv. Shivangi)
चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाल्यावर काय करावे आणि कोणता कायदेशीर मार्ग निवडावा?
1. चेक बाउन्स किंवा डिसऑनर झाल्यावर तो बाउन्स किंवा डिसऑनर चेक आणि चेक रिटर्न मेमो बॅंकेतून 30 दिवसांच्या आत घेऊन यावा.
2. त्यानंतर वकिलाच्या मदतीने 15 दिवसांच्या आत समोरच्या पक्षाला (चेक देणाऱयाला) लिगल नोटीस पाठवावी आणि त्यात थकलेल्या पेमेंटला 30 दिवसांत परत करण्याची मुदत द्यावी.
3. जर चेक देणारा या 30 दिवसांत पेमेंट करू नाही शकला तर बाउन्स किंवा डिसऑनर चेक आणि चेक रिटर्न मेमो, लिगल नोटीस आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे घेऊन वकिलाच्या मदतीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेगोशिएबल इंस्टमेंट ऍक्टच्या कलम 138 प्रमाणे तक्रार नोंदवावी.
4. नोटीसचा वेळ संपायच्या आत ही तक्रार दंडाधिकारी न्यायालयात नोंदवली गेली पाहिजे.