
>> संजय सोनवणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे असंख्य पैलू आहेत. जगभरच्या स्त्र्ायांसाठी त्या अक्षय प्रेरणास्रोत आहेत. लोककल्याणकारी राज्य कसे चालवावे याचा आदर्श वस्तुपाठ आहेत… देश जोडण्याचे निर्मितीकार्य करणाऱया त्या द्रष्टय़ा राष्ट्रमाता आहेत. अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. शिवभक्त अहिल्यादेवींनी प्रजेतच शिव पाहिला. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्टय़ होते. प्रत्येकाच्या जीवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. अहिल्यादेवींच्या आजच्या जयंतीनिमित्त…
जनतेने धर्मराज युधिष्ठरानंतर फक्त अहिल्यादेवी होळकरांना उत्स्फूर्तपणे पुण्यश्लोक असा किताब बहाल केला. त्या थोर शिवभक्त होत्या. शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या तत्कालीन हिंदुस्थान देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतानाही त्यांनी फक्त आपल्या होळकर राज्याचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षिणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भूभागांत आपली निर्माणकार्ये केली. त्यातून देशाला जोडण्याचे कार्य केले. त्या कामांनी त्यांची ख्याती देशभरात चिरंतन राहिली आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील सर्वच राजेरजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे त्यांच्या इंदूर संस्थानाबाहेरच्या कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही.
अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. शिवभक्त अहिल्यादेवींनी प्रजेतच शिव पाहिला. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्टय़ होते. निपुत्रिक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल, असे कायदे बनवले. अहिल्यादेवींचे महत्त्वाचे क्रांतिकारी कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली महिलांना लष्करी प्रशिक्षण देणाऱया संस्थेची स्थापना. या संस्थेतून अक्षरशः हजारो स्त्र्ाया प्रशिक्षित झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वतःचे असे 500 महिलांचे लढवय्या पथक स्थापन केले होते. हिंदुस्थानच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच लष्करी पथक!
ही एक सामाजिक क्रांती होती. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्त्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. तत्पूर्वी कररचना ही राजेरजवाडय़ांच्या मर्जीप्रमाणे असे. त्यामुळे श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जीवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येक प्रजाजनाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत किंवा गुंतागुंतीचे विषय न्याय खात्याकडे स्वतः पाठवत.
राज्यातील व्यापार उदीम वाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वर येथे विणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्र्ााsद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की, महेश्वरी साडय़ा व अन्य वस्त्र्ाs हिंदुस्थानी बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही. उद्योग-व्यापाराच्या समृद्धीतूनच रोजगार निर्माण होतो आणि रयतेचे स्थायी कल्याण होते हे तत्त्व त्यांनी आपल्या आचरणातून पाळले. इंदूर हे त्या काळी एक छोटे खेडे होते. अहिल्यादेवींनी इंदूर हे एका औद्योगिक नगरामध्ये परिवर्तीत करण्याचा चंग बांधला. फलश्रुती अशी की इंदूर एका भव्य शहरात बदलले. आज ती मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी आहे.
अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असताना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. रानावनांतून जाणाऱया यात्रेकरूंना भिल्ल लुटत असत. अहिल्यादेवींनी सैन्य पाठवून त्यांचा बंदोबस्त करण्यापेक्षा भिल्ल असे का करतात याचा शोध घेतला. उत्पन्नाची कसलीही साधने नसल्याने भिल्ल लुटारू बनले आहेत हे लक्षात येताच त्यांनी भिल्लांना कसण्यासाठी शेतजमिनी दिल्या. एवढय़ावरच त्या थांबल्या नाहीत तर भिल्लांवरच यात्रेकरूंना सुखरूप इप्सित ठिकाणी अल्प मोबदल्यात पोहोचवण्याची जबाबदारी दिली. भिल्ल यात्रेकरूंकडून या कामासाठी जो मोबदला घेत त्याला ‘भिलवाडी’ म्हणत. यामुळे भिल्लांच्या उदरनिर्वाहाचीही सोय झाली आणि यात्रेकरूंना होणारा उपद्रव संपला.
इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. 1777 साली पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, ‘‘इंग्रज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करून मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याच्या तोंडावरच आघात करावा लागतो.’’ हे कार्य पेशव्यांना जमले नसले तरी पुढे महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन त्यांना अनेक युद्धांत धूळ चारली.
अहिल्यादेवींची कीर्ती त्या काळात जगभर पोहोचली होती. युरोपमधील स्त्र्ााrस्वातंत्र्यवादी चळवळीच्या त्या आदर्श बनल्या होत्या. जोआना बेली या ब्रिटिश कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर इंग्रजीत खंडकाव्य लिहिले. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, ‘‘तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशीर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी. आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात… खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले… एक राजस हृदयी, कोमल अंतःकरणाची आणि बुलंद व्यक्तिमत्त्वाची ती अहिल्या!’’
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचे असंख्य पैलू आहेत. जगभरच्या स्त्र्ायांसाठी त्या अक्षय प्रेरणास्रोत आहेत. लोककल्याणकारी राज्य कसे चालवावे याचा आदर्श वस्तुपाठ आहेत… देश जोडण्याचे निर्मितीकार्य करणाऱया त्या द्रष्टय़ा राष्ट्रमाता आहेत.






























































