
>>शुभांगी बागडे
अंगणवाडी या शब्दाचा अर्थच मुळात अंगणातील निवारा. हसतखेळत बागडताना उंबऱ्यापलीकडच्या जगाची ओळख करून देणारे हे अंगण. चिऊ, काऊ, माऊ यांची ओळख करून देणारे हे अंगण खऱ्या अर्थाने विस्तारतं ते अंगणवाडीतून. बालशिक्षण हा कोणत्याही मजबूत व्यवस्थेचा पाया असतो. केवळ शिक्षणच नव्हे तर मुलांचे बौद्धिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक पोषण करणारी व्यवस्था म्हणजे अंगणवाडी असे अंगणवाडीबद्दल म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मुलं ही कोणत्याही राष्ट्राची संपत्ती. पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने देशातील खेडी मागासलेली असल्याने अशा खेडेगावामधील बालकांपर्यंत आहार आणि आरोग्यसेवा पोहचवता यावी याकरिता बालकांसाठी सुरू असलेली ही योजना आहे. त्यामुळे बालकांची जडणघडण आणि त्यांचा विकास या उद्देशावर आधारित असे अंगणवाडीचे कार्य आहे. एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यक्षेत्रात अगदी शेवटच्या परंतु महत्त्वाच्या पातळीवर काम करणाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका, माध्यान्ह भोजन बनविणाऱ्या महिला असा महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग या योजनेंतर्गत आहे. एकात्मिक बाल किकास योजनेअंतर्गत भोजन, शाळापूर्क प्रशिक्षण, गर्भवती माता, आई व बाळाला पहिल्या सहा वर्षांपर्यंत प्राथमिक आरोग्यसेवा, पोषक आहाराचे, गोळय़ांचे वितरण, प्राथमिक आरोग्याची माहिती देणे आणि पडताळणी, लसीकरणाच्या कामात सहकार्य इत्यादी महत्त्वपूर्ण कामे या महिलांकडून केली जातात. यातील अंगणवाडी योजनेतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे काम महत्त्वाचे ठरते.
यातील काही सेवा या प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये मुलांना दिल्या जातात तर काही सेवा या घरभेटीतून दिल्या जातात. मात्र अंगणवाडीत फक्त तीन वर्षांपुढची मुले येऊ शकतात. तीन ते सहा गटातील मुलांना योजनेचा थोडाफार लाभ मिळतो. विशेषतः अतिकुपोषित मुलांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते असे दिसते.
बालकांच्या मानसिक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे, ०-६ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा.
बालकांमधले मृत्यू, आजार, कुपोषण कमी करणे आणि यामुळे होणारी शैक्षणिक गळती थांबवणे, आई आणि कुटुंबाचे बालसंगोपनाचे कौशल्य वाढवणे, यासाठी निरनिराळय़ा विभागांचे सहकार्य घडवून आणणे ही अंगणवाडी योजनेची काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करणाऱ्या काही अंगणसेविकांची नुकतीच भेट झाली. पुण्यातील जनवाडी जनता वसाहत, वडारवाडी या भागातील या अंगणवाडय़ा वैशिष्टय़पूर्णच म्हणाव्या लागतील. कारण या भागात मिश्र राहणीमान आहे. बहुतांश अशिक्षित, निम्नस्तरावरील स्थलांतरित कामगारवर्ग असणाऱ्या या भागात अंगणवाडी चालवणेही आव्हानात्मक होते. मात्र इथले मुख्य सेविका संगीता ठाकूर आणि वंदना इंगळे, रेणुका चिंचकर या अंगणवाडी सेविकांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने आज इथली मुले शाळापूर्व शिक्षण अगदी व्यवस्थितपणे घेत आहेत. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अनुकूल असे साहित्य इथे पाहायला मिळाले. मुळाक्षरं, रोजच्या दिनक्रमाचे नियोजन, फळं-फुलांची नावे, कविता, अंक यांचे तक्ते इथे पाहायला मिळाले. या तक्त्यांच्या आधारे सेविका मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देतात. इथे नावीन्यपूर्ण असा हवामानाची नोंद घेणारा तक्ताही पाहायला मिळाला. हे तक्ते, कापडाचे पॅचवर्क केलेली कलाकुसर, वेगवेगळी उपयोगी चित्रं हे सगळे रंगकाम या सेविकांकडून केले जाते. यासाठी युनिसेफद्वारे तयार करण्यात आलेल्या आकार या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ या सेविकांना झला आहे. इथे मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक, सामाजिक विकासाकडेही लक्ष दिले जाते. याबाबत अंगणवाडी सेविका वंदना इंगळे सांगतात की, मुलांचा सर्व प्रकारे विकास व्हावा यासाठी इथे प्रयत्न केला जातो. त्यामुळे सुरुवातीला अंगणवाडी म्हणजे पाळणाघर नव्हे हेच आधी आम्हाला लोकांना समजावून सांगावे लागले. इथे मुलांना प्रात्यक्षिकातूनच जास्तीत जास्त गोष्टी समजावण्याकडे आमचा कल असतो. ज्यात त्यांचे वागणे-बोलणे, त्यांची भाषा, स्वच्छता, नीटनेटकेपणा याकडे खूप लक्ष द्यावे लागते. याबरोबरच बडबडगीते, खेळ या माध्यमातून शाळापूर्व शिक्षणही दिले जाते.
संगीता ठाकूर या या भागातील अंगणवाडींच्या मुख्य सेविका आहेत. इथल्या वेगवेगळय़ा अंगणवाडींचे पर्यवेक्षण, समन्वय याचे काम त्या पाहतात. त्या सांगतात की, १०-१५ वर्षांपूर्वी इथले वातावरण खूप वेगळे होते. सुरुवातीला पालक अंगणवाडीत पाठवत नसत. आता चांगला प्रतिसाद आहे. यातील मुलांचे दोन्ही पालक रोजंदारीच्या कामावर जातात. अशा मुलांचे योग्य संगोपन व्हावे यासाठी नोकरीपेक्षाही अधिक कर्तव्यं अंगणवाडीसेविका पार पाडतात. यामुळे या मुलांनाही सेविकांचा लळा लागतो आणि अगदी मुक्तपणे ही मुले इथे रमतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हेच मुलांचे सर्वांगीण पोषण आहे.
या अंगणवाडय़ांमधून अंगणवाडीत वजन तपासणी, वजन तक्ते-आरोग्यतक्ते ठेवणे, कुपोषण लवकर शोधून काढणे आणि सुधारणे, पूरक आहार-सुखदा (सुकडी), ‘अ’ जीकनसत्त्क डोस, शालापूर्व शिक्षण, मुलांचे पोषण, त्यांची स्वच्छता या सेवा दिल्या जातात.
एकात्मिक बाल विकास सेवाअंतर्गत या अंगणवाडींना १९७५ मध्ये सुरुवात झाली. बालकांमधील कुपोषणाशी लढणे हाच अंगणवाडी प्रकल्प सुरू करण्याचा मुख्य उद्देश होता. सध्या महाराष्ट्रात १,०८,००५ पेक्षा अधिक अंगणवाडय़ा/ मिनी अंगणकाडी केंद्रे आहेत. ज्यात ४०० कर पर्यकेक्षक आणि अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक अंगणकाडी कर्मचारी व मदतनीस कार्यरत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी हे सर्क आरोग्य, पोषण आणि शिक्षणविषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. बालकांच्या विकासाची एक नावीन्यपूर्ण योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. मात्र अंगणवाडीसाठी निवडलेला मुख्य वयोगट हा तीन ते सहा असा आहे. त्यामुळे तीनपेक्षा कमी वयाची मुले कुपोषण योजनेच्या दृष्टीने दुर्लक्षित राहतात. कुपोषण व आजारांचे प्रमाण याच वयोगटात जास्त दिसून येते. अंगणकाडी योजनेची ही एक मोठी त्रुटी आहे. याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण आहार व कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी मदत होत असताना त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.





























































