संरक्षण दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन<<

[email protected]

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय) प्रणालीचा वापर करून शस्त्रास्त्र तयार केली जाणार आहेत. लष्करात ‘एआय’चा वापर करण्यासाठी चीनने प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून हिंदुस्थानही आता तसूभरही मागे राहणार नाही. ही योजना लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठीही राबवली जाणार आहे. चीन आणि पाकच्या सीमेवर निगराणीसाठी ‘एआय’चा वापर केल्यास तेथील जवानांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. छोटय़ा छोटय़ा मोहिमांमधील यशासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो.

भविष्यातील युद्धासाठी अत्याधुनिक साधनांसह हिंदुस्थानी सैन्य सज्ज होत असून त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती घेण्यात आली. एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम सुरू केले आहे. यात मानवरहित टँक, जहाज, विमाने व रोबो हत्यारांचा समावेश असेल. नव्या पिढीच्या युद्धासाठी सज्जतेच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल. तिन्ही दलांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यातील युद्धांसाठी हे आवश्यकच आहे. त्यांनी यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स योजनेला अंतिम स्वरूप दिले जात आहे. सशस्त्र दल व खासगी क्षेत्रात एक मॉडेल म्हणून ते लागू केले जाईल. कुमार यांनी माहिती दिली की, नव्या पिढीच्या युद्धाची तयारी करताना तांत्रिक बाबी, स्वयंचलित आणि रोबोटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्य जागतिक शक्तींप्रमाणेच हिंदुस्थानकडूनही मानवरहित हवाई वाहने, मानवरहित जहाजे, मानवरहित रणगाडे, स्वयंचलित रोबो रायफलचा वापर केला जाईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय) प्रणालीचा वापर करून शस्त्रास्त्रs तयार केली जाणार आहेत. लष्करात ‘एआय’चा वापर करण्यासाठी चीनने प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून हिंदुस्थानही आता तसूभरही मागे राहणार नाही. ही योजना लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठीही राबवली जाणार आहे.

चीन व पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एआयचा उपयोग झाल्यास या सीमांवर संरक्षण करणाऱया सशस्त्र दलांवरील दबाव कमी होऊ शकतो. चीन एआय तंत्रज्ञानासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. त्यांची 2030 पर्यंत एक केंद्र स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. चीनने आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर सुरू करण्यासाठी संशोधन सुरू केले असून त्यावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. 2030 पर्यंत चीनला ‘एआय’संबंधीचे जगातील प्रमुख केंद्र बनवण्याची योजना चीनने आखली आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपीय संघ एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

चीन आणि पाकच्या सीमेवर निगराणीसाठी ‘एआय’चा वापर केल्यास तेथील जवानांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. छोटय़ा छोटय़ा मोहिमांमधील यशासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देश ‘एआय’मधील गुंतवणुकीत कितीतरी पुढे निघून गेले आहेत. मानवविरहित ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांचा शोध लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. मानवविरहित ड्रोनही ‘एआय’च्या मदतीनेच काम करते.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) या सगळ्या योजनेत महत्त्वाचा सहभाग असणार आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा पाया चांगलाच मजबूत असून त्याचाही फायदा या योजनेत होणार आहे. ‘एआय’संबंधी क्षमता वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.

हिंदुस्थानविषयी बोलयचे तर एआय केवळ स्मार्ट डिवाईस विकसित करण्यातच प्रमुख भूमिका निभावत आहे असे नाही तर सरकार व कॉर्पोरेट क्षेत्र दोन्हीमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यात महत्त्वपूर्ण काम करत आहे. हिंदुस्थानी रेल्वेचे सिग्नल फेल होण्याची शक्यता संपविण्यासाठी एआयच्या मदतीने रिमोट कंट्रोल मॉनिटरिंगचा प्रयोग सुरू आहे. यामध्ये एआयच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा खराब होण्याचा धोका आधीच संबंधित यंत्रणेला कळवला जातो. हिंदुस्थानातील अनेक पतसंस्थांनी आपल्या कामकाजात एआयचा प्रयोग सुरू केला आहे. एआयच्या मदतीने बँक चॅटबॉटचे निर्माण करत आहेत. जे ग्राहकांशी संवाद साधतात व माहिती संकलित करण्यास सहायक आहेत.

एचडीएफसी बँकेने बंगळुरूची कंपनी सेंसफोर्थ एआय रिसर्चच्या मदतीने मार्च महिन्यात लाँचिंग केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित रोबोट ‘इव्हा’चे निर्माण केले होते. इव्हाने आतापर्यंत 5,30,000 युनिक युजर्सबरोबर 12 लाखांहून अधिक वेळा संवाद केले असून जवळपास 27 लाख चौकशांना मोठय़ा सहजतेने उत्तर दिले आहे.

या विषयावरील एका अहवालानुसार, जगभरातील साडेसात कोटी ते साडेसदतीस कोटी लोकांना 2030पर्यंत आपल्या कामांत नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील. डिजिटायझेशन, ऑटोमेशन, एआयसारख्या क्षेत्रांत मनुष्यबळ लागेल.

हे सगळे बदल होत असताना नव्या तंत्रज्ञानानुरूप आपल्याला आपल्या कामात काही मूलभूत बदल करावे लागतील. त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. तसे तयार असू आणि नवी कौशल्ये शिकण्याची तयारी असेल तरच आपण टिकू शकू ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की, ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाला स्वतःची ‘अक्कल’ असली तरी मूलभूत शहाणपण किंवा कॉमन सेन्स नाही. त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करून घेण्यासाठी त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर चौकटीत बसवणे गरजेचे आहे. ‘एक्स्प्लनेबल एआय’ हे आणखी एक पुढचे पाऊल याच दिशेने पडले आहे. या बदलांना कवेत घेण्यासाठी आपणही तयार राहणे गरजेचे आहे.

रशियाचे पंतप्रधान पुतीन म्हणतात की, जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) प्रगती करील तोच पुढच्या दशकात जगावर राज्य करील. कृत्रिम बुद्धिमत्तेची परिमाणे आता बदलत चालली असून मानवाच्या आयुष्यातील बहुतांश अंगांना तिने स्पर्श केला आहे. हॉटेलमध्ये काय खावे, ऑनलाइन कोणती पुस्तके खरेदी करावीत, बँकेचे कर्ज नक्की किती मिळेल, विशिष्ट आजारासाठी कोणती उपचार पद्धती वापरावी अशा सर्वच सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. या गोष्टींची यादी वाढतच जाणार असून त्यासाठी गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर्सचा वापरही वाढणार आहे. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘स्टार्ट अप’ कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूकही होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे इंटरनेटमुळे झालेल्या क्रांतीपेक्षाही मोठी क्रांती होईल असा अंदाज बांधला जात आहे.