बालसाहित्याची दिशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> फारुक एस. काझी

चाकोरीबद्ध अभ्यासक्रम जसा मुलांच्या बौद्धिक क्षमतेला मारक असतो तसेच चाकोरीबद्ध बालसाहित्यही त्यांच्या सर्जनशीलतेला मारक असते. मुलांना गूढ कथा, विज्ञान कथा, विज्ञान कादंबऱ्या, प्रवासवर्णने, प्राणी कथा, फँटसी कथा असे अनेक प्रकार वाचायला मिळायला हवेत. बालसाहित्यिकांनी मुलांच्या भावविश्वात सामील होऊन ‘त्यांच्याच’ भाषेत लिहायला हवे.

‘चांदोबा’ मासिक बंद पडले आणि बालसाहित्यात एकदमच मोठी खळबळ जाणवली. अस्वस्थता अनुभवायला मिळाली. मुलांसाठीचं एखादं मासिक बंद होणं ही बातमी तशी फारशी महत्त्वाची नाहीच मुळी. कारण आपल्याकडे ‘बालसाहित्य’ हा साहित्य प्रकारच दुय्यम दर्जाचा मानला जातो. एक महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणून त्याकडे कधीच पाहिले जात नाही.

‘चांदोबा’ बंद झाला आणि ‘मराठी बालसाहित्य’ हा विषय चर्चेसाठी ऐरणीवर आला. बालसाहित्याने आता कात टाकली पाहिजे. कार्टुन्स, सिनेमा, ऑडियो कथा, व्हिडीयो गेम्स इ. माध्यमातून साहित्य मुलांपर्यंत पोचवायला हवं हे ही सुचवून झालं. आमच्या पिढय़ा अमुक पुस्तकं वाचून घडल्या, आता कुणी दर्जेदार लिहीत नाही असं सांगूनही झालं. या सगळ्यात काळाबरोबर बदललं पाहिजे हा मुद्दा लेखक – कवी, पालक, प्रकाशक, चित्रकार, वितरक, समीक्षक – अभ्यासक या सर्वांनीच स्वीकारला पाहिजे. कारण कुणा एकात बदल घडवून परिस्थितीत फारशी बदल घडणार नाही.

बोधपर, आदर्शवादी, गोड-गोड, उपदेशपर, पौराणिक कथा लेखन म्हणजे ‘बालसाहित्य’ असं समजण्याचा प्रघात आपल्याकडे असावा असे राहून-राहून वाटते. याला अपवाद जरूर आहे, मात्र इतर हिंदुस्थानी भाषांतील व पाश्चात्त्य बालसाहित्याचा विचार करता आपल्याकडील बालसाहित्य आपलं क्षितिज विस्तारताना दिसत नाही. याची कारणं अनेक आहेत. मध्यमवर्गीय शहरी कुटुंबांतील वातावरण, भाषा, अनुभवविश्व यात अडकून पडलेलं साहित्य ग्रामीण, आदिवासी भागातील मुलांना आपलंसं वाटतं नाही. वाचन ही आपली प्रायोरिटी नसते. टीव्ही, मोबाईल, संगणक, व्हिडीओ गेम्स यामुळे मुलं वाचत नाहीत असं म्हणताना मुलांत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी फारसं कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. (अपवाद आहेच)

बालकुमारांसाठी लिहिल्या जाणाऱ्या साहित्यात परकीय सांस्कृतिक संस्कारांचा पगडा अधिक जाणकतो. मराठी साहित्यविश्वात बालसाहित्याला अजूनही गांभीर्याने घेतले जात नाही. बालसाहित्याचे कोणतेही निकष ठरवताना महत्त्काचा अडथळा आहे तो त्यांची मानसिकता समजून न घेण्याचा. सकस लेखन हा गुण नाहीसा होत चालला आहे, शिवाय नकीनतम किषय हाताळले जात नाहीत. ललित वा कादंबरी स्वरूपातील लेखन आताशा होताना दिसत नाही. एकेकाळी निसर्गकथा हा बालसाहित्याचा प्राण होता. सध्याचं युग हे विज्ञानयुग, तंत्रज्ञानयुग आहे असं मानलं तरी याबाबतचं मराठी भाषेतलं लेखन त्रोटक आहे. बालसाहित्यात किकिध साहित्य प्रकारच हाताळले जात नाहीत. मुलांना केगकेगळे साहित्य प्रकार काचायला मिळायला हकेत. मुलांना ते तसे काचायला मिळत नाहीत आणि मुलेही चाकोरीबद्ध लिहू, बोलू आणि काचू लागतात. चाकोरीबद्ध अभ्यासक्रम जसा मुलांच्या बौद्धिक क्षमतेला मारक असतो तसेच चाकोरीबद्ध बालसाहित्यही त्यांच्या सर्जनशीलतेला मारक असते. मुलांना गूढ कथा, किज्ञान कथा, किज्ञान कादंब-या, प्रकासकर्णने, प्राणी कथा, फँटसी कथा असे अनेक प्रकार काचायला मिळायला हकेत.

बालसाहित्यिकांनी मुलांच्या भावविश्वात सामील होऊन ‘त्यांच्याच’ भाषेत लिहायला हवे. मुलांचा बदलता परिसर, अनुभव, प्रश्न, चिंता, विचार इ. गोष्टी बालसाहित्यात यायला हव्यात. चांगल्या बालसाहित्याला तितक्याच कल्पक चित्रांची जोड दिली जायला हवी. ते साहित्य अधिक वाचनीय व आकर्षक ठरते. कारण चित्रं हा मुलांच्या भावविश्वाचा अभिन्न व आवडीचा भाग असतात. त्यासाठी मुलांसाठी कल्पकतेने चित्र देणाऱ्या चित्रकारांच्या पिढीची अधिक आवश्यकता आहे.

प्रकाशकांची व वितरकांची यात खूप मोठी भूमिका असायला हवी. प्रकाशकांनी मुलांसाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. नवनवीन प्रयोग करायला हवेत. आर्थिकदृष्टय़ा परवडणारं नसलं तरी ‘वाचती पिढी’ घडविण्यासाठी हे प्रयत्न अत्यावश्यक आहे. प्रकाशकांनी नवीन प्रयोगाचे स्वागत करायला हवे. त्यासाठी लेखक – चित्रकार यांच्या कार्यशाळा घ्यायला हव्यात. त्यातून दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहील. एका विशाल दृष्टिकोनातून याकडे पाहिलं गेलं पाहिजे.

या सर्व प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो पालक. हॉटेलिंग, शॉपिंगसाठी हजारोंचा चुराडा करणारे पालक मुलांसाठी पुस्तक घेताना मात्र मागे हटतात. महाग आहेत या सबबीखाली मुलांना पुस्तकापासून दूर ठेवलं जातं. वाचन, पुस्तक खरेदी ही सवय म्हणून रुजवणे आवश्यक आहे. तेव्हा मुलं वाचती होतील, समज असणारी पिढी घडेल. अन्यथा आपल्या हाती फारसं काही उरणार नाही. बदलाच्या दिशेने सर्वांनीच पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. एकमेकांकडे बोट दाखवून समस्या सुटणार नाहीत. उलट बालसाहित्याची परिस्थिती अधिकच बिकट होत जाईल. आता खरी गरज आहे ती मूलमित्र पालक, बालसाहित्यिक, बालसाहित्याचे अभ्यासक, प्रकाशक, वितरक व मुलांमध्ये वाचनाची सवय रुजवू पाहणाऱ्यांनी एकत्र येऊन बालसाहित्याच्या भविष्यासाठी एक स्ट्रटेजी ठरविण्याची. कृतिकार्यक्रम आखून त्याद्वारे कार्यवाही करण्याची. कोणतेही गैरसमज वाद-विवाद इ.दूर सारून बालसाहित्यासाठी सर्वांनीच रचनात्मक कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहायला हवं.