
>> पी. व्ही. सावंत
योग, प्राणायाम केल्यामुळे बराच ताणतणाव कमी होतो. हे नियमित योग व प्राणायाम केल्याने सिद्ध झाले आहे. योग व प्राणायाममुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो, रक्ताभिसरण वेगाने होते. श्वासोच्छ्वास योग्य पद्धतीने घेतला जातो. योग व प्राणायामाबरोबरच तुमची श्वसनक्रियाही योग्यरीत्या असायला हवी. अपूर्ण व चुकीच्या श्वसन प्रकाराचे वाईट परिणाम होतात. शरीराला, फुप्फुसांना, मेंदूला, हृदयातील पेशींना प्राणवायूची गरज असते. परंतु अशुद्ध पदार्थांच्या थरांमुळे आपली फुप्फुसे नीट काम करीत नाहीत.
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत बहुसंख्य लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कामाच्या ताणामुळे, समस्यांमुळे शारीरिक व्यायाम करीत नाहीत. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. मधुमेह, रक्तदाब व कर्करोग तर झपाटय़ाने वाढत आहेत. पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा, ढोकळा, रसगुल्ला, बटर व चिकन, भेलपुरी आदी जंकफूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने लोकांच्या आजारात भर पडत आहे. आपल्याकडे काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल जागरुकताच नाही. डॉक्टरने सांगितले तेही कुणी ऐकत नाही. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी लोक काहीही आणि कितीही खातात आणि वजन वाढवतात. रोगाला आमंत्रण देतात; परंतु वाढत्या आजारांची संख्या पाहता लोकांनी आता आपल्या जिभेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. आपल्या देशात वाढत चाललेल्या मधुमेहामुळे जंकफूडला रामराम ठोकला पाहिजे. परंतु भूक लागल्यावर लोक मिळेल ते खातात आणि आजारी पडतात. तरुणपणात जंकफूड पचते; परंतु जसजसे वय वाढते तशा आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. नियमित व्यायाम नसल्यामुळे त्यात भर पडते. हे टाळायचे असेल, शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर (वय वाढल्यावर म्हातारपणात आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून) लोकांनी रोज नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
योग, प्राणायाम केल्यामुळे बराच ताणतणाव कमी होतो. हे नियमित योग व प्राणायाम केल्याने सिद्ध झाले आहे. योग व प्राणायाममुळे शरीराच्या सर्व अवयवांना चांगला व्यायाम मिळतो, रक्ताभिसरण वेगाने होते. श्वासोच्छ्वास योग्य पद्धतीने घेतला जातो. योग व प्राणायामाबरोबरच तुमची श्वसनक्रियाही योग्यरीत्या असायला हवी. अपूर्ण व चुकीच्या श्वसन प्रकाराचे वाईट परिणाम होतात. शरीराला, फुप्फुसांना, मेंदूला, हृदयातील पेशींना प्राणवायूची गरज असते. परंतु अशुद्ध पदार्थांच्या थरांमुळे आपली फुप्फुसे नीट काम करीत नाहीत. त्यांची क्षमता कमी होते आणि आपल्या हृदयात प्राणवायू कमी पोहोचतो. शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध करायचे असेल, अशुद्ध पदार्थ जाळून टाकायचे असतील तर तुम्ही पुरेसा प्राणवायू घेतला पाहिजे. त्यासाठी तुमची श्वसनक्रियाही योग्य पाहिजे. योग्य श्वसनक्रियेवर ब्रह्मविद्या साधक संघाने भर दिला असून आध्यात्मिक श्वसन प्रकार व ध्यानाचे दुर्मिळ योगशास्त्र या संघाच्या शिक्षकांकडून साधकांना शिकविले जाते.
ब्रह्मविद्या हीच तुमच्या आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली आहे, असेही ब्रह्मविद्या संघाच्या साधकांकडून सांगितले जात आहे. ब्रह्मविद्येचा ज्यांनी ज्यांनी प्राथमिक अभ्यास केला आहे, शिबिरात भाग घेतला आहे त्यातील सर्वांनाच त्याचा फायदा झाला आहे. ज्यांनी पुढील आयुष्य जगण्याच्या आशा सोडल्या होत्या, आत्मविश्वास गमावला होता, ज्यांना नैराश्य आले होते, जीवन अंधःकारमय झाले होते अशा बहुसंख्यजनांच्या जीवनात प्रकाश आला आहे. जीवन समृद्ध झाले आहे, असे ब्रह्मविद्येचा अनुभव घेतलेले साधक सांगत आहेत. त्यामुळे साधकांनी ब्रह्मविद्या शिका आणि आपले आयुष्य उज्ज्वल व शक्तिमान करा. ब्रह्मविद्या हे सुखी जीवनाचे शास्त्र आहे. ब्रह्मविद्येच्या पद्धतीत श्वसन व विचार यावर भर दिला आहे. श्वास आणि विचार यांच्याशिवाय आपण जीवनाचा विचार करू शकत नाही. योग्य श्वसन व योग्य विचार हे कुठेही शाळा, कॉलेजात शिकविले जात नाही. ब्रह्मविद्येत आध्यात्मिक श्वसन प्रकारांच्या सरावाने श्वसनक्रिया व विकारांची प्रक्रिया सुधारते.
ब्रह्मविद्येच्या साधनेने तुमच्या सर्व रोगांचे समूळ उच्चाटन होते. अस्थमा, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मानदुखी, पाठदुखी आदी विकारांवर मात केली जाते, असे ब्रह्मविद्येचे साधक सांगतात. आपले शरीर विद्युतशक्तीवर चालणाऱया एखाद्या यंत्रासारखे आहे. परमेश्वराने निर्माण केलेल्या असंख्य पेशींनी रचलेले अत्यंत गुंतागुंतीचे हे शरीर एक अप्रतिम यंत्र आहे. कुठलेही यंत्र जर नियमितपणे व योग्यप्रकारे वापरले गेले नाही तर ते कालांतराने निकामी होते. आपल्या शरीराचेही तसेच आहे. फुप्फुसांच्या क्षमतेचा पूर्ण वापर झाला नाही, फुप्फुसात आलेल्या रक्ताचे शुद्धीकरण झाले नाही तर आपल्या रक्तवाहिन्यांची स्थिती इमारतीच्या पाइपलाइनसारखी होते. पाइपमध्ये जर चॉकअप झाले तर पाइप बदलावा तरी लागतो किंवा त्यातील अशुद्ध पदार्थांचे जमा झालेले थर काढावे लागतात. आपल्या रक्तवाहिन्यांचेही तसेच आहे. जिने चढल्यावर व धाप लागल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि एकतर एन्जोग्राफी किंवा बायपास तरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतो. हे असे का होते, तर नियमित श्वसन प्रकार व प्राणवायू घेण्याचा सराव न केल्यामुळे फुप्फुसांची आवरणे कठीण होऊन त्यांचा लवचिकपणा कमी होतो. फुप्फुसांचे पूर्ण प्रसारण होत नाही.
औषध घेऊन तुमचा रोग तात्पुरता बरा होतो; परंतु त्याचे समूळ उच्चाटन होत नाही. रोग मुळापासून बरा करायचा असेल तर प्राणायाम आवश्यक आहे. ब्रह्मविद्या या साधनेने मानवाचा दृष्टिकोन बदलतो आणि तो अधिक आनंदी, उत्साही व आत्मविश्वास संपन्न होतो. ब्रह्मविद्या ही आध्यात्मिक साधनेची अत्यंत प्राचीन पद्धत आहे. यातील साधनेच्या पद्धती मूळच्या हिंदुस्थानातील आहेत. इथून त्या तिबेटमध्ये गेल्या व आता परत आपल्याकडे हिंदुस्थानात आल्या आहेत, असे ब्रह्मविद्या साधक संघाचे प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगतात. गेल्या जुलैअखेरीस मुंबईसह महाराष्ट्रात ब्रह्मविद्येचे वर्ग सुरू झाले असून 22 आठवडय़ांच्या या शिबिरात आठवडय़ातून केवळ एकदा दीड तास ब्रह्मविद्येचे वर्ग घेतले जातात. (कार्यालय – लक्ष्मी केशव बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.) दूरध्वनी क्र. 25339977 / 25347788)तेव्हा ब्रह्मविद्या शिका आणि आरोग्यसंपन्न व यशस्वी व्हा, असे ब्रह्मविद्येचे साधक सांगत आहेत.
www.bramhavidya.net




























































