
नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांऐवजी चार वर्षांचा झाला आहे. याआधीचे बारावीपर्यंतचे विभागदेखील काही प्रमाणात बदलले आहेत. पदवीचे शिक्षण हे व्रेडिट पद्धतीचे असून त्यात कोर्स, विषय निवडीचे स्वातंत्र्य असेल. शिवाय काही व्रेडिट कमावल्यानंतर गॅप घेऊन नोकरीचा अनुभव घेता येईल. एवढेच नव्हे, तर नोकरी करता करतादेखील शिकता येईल. म्हणजे शिक्षणाच्या खर्चाचा भार पालकांवर न पडता मुले स्वावलंबी व्हायला शिकतील. नव्या शैक्षणिक धोरणात आंतरशाखीय अभ्यासावर भर देण्यात आलाय. म्हणजे विज्ञान विषयाचे मेजर व्रेडिट घेऊन सोबत संगणक, कॉमर्स, व्यवस्थापन, आर्ट्स या शाखेचे आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. यामुळे शिक्षण, ज्ञान एकांगी न राहता वेगवेगळे विषय अभ्यासता येतील. ही काळाची, भविष्याची गरज आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम केला की पदव्युत्तर अभ्यास न करतादेखील चांगल्या नोकऱ्या मिळू शकतील. आर्थिक निकड म्हणून, घरची परिस्थिती म्हणून अनेकांना लवकर आर्थिक स्थैर्य हवे असते. अशा बहुसंख्य मुलांसाठी हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम निश्चित फायद्याचा ठरेल. यातही काही कालावधीनंतर अधिक व्रेडिट कमावत पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय आहेच. आपल्या परंपरागत शिक्षण पद्धतीत भिंती बांधून एका विषयाला दुसऱ्या विषयापासून दूर ठेवले जाई. आता नव्या पद्धतीत पूल बांधण्यावर भर आहे. निवडीत लवचिकता आहे. हे तरुण पिढीसाठी फायद्याचेच आहे, पण त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वावलंबी व्हावे लागेल. स्पून फीडिंगची सवय सोडावी लागेल. जास्त मेहनत घ्यावी लागेल.
आता प्रत्येक विद्यार्थ्यासाठी व्रेडिट बँक असेल. जसजसे विषय उत्तीर्ण व्हाल तसे तुमचे व्रेडिट तुमच्या खात्यात जमा होत जातील. अमुक संख्येचे व्रेडिट जमा झाले की डिप्लोमा, वाढीव व्रेडिट कमावले की पदवी, आणखीन व्रेडिट वाढले तर ऑनर्स, नंतर पीजी डिप्लोमा, नंतर पदव्युत्तर पदवी असे चढत्या श्रेणीने, टप्प्याटप्प्याने शिक्षण घेता येईल. सर्वच व्रेडिट कमावण्यासाठी कॉलेजात, वर्गात, जाण्याची गरज राहणार नाही. काही विषय ऑनलाइन शिकून परीक्षा देता येईल. प्रोजेक्ट, उद्योग क्षेत्रातील कृती अनुभव, सेमिनार अशा माध्यमातूनदेखील व्रेडिट कमावण्याचे स्वातंत्र्य असेल.
विशेष म्हणजे एकाच शाखेचे विषय घेण्याचे बंधन राहणार नाही. स्पेशलायझेशनचा जमाना गेला आता. तुम्हाला विविध शाखांचे थोडे थोडे का होईना ज्ञान गरजेचे आहे. फिजिक्समध्ये पदवी घेतलेल्या शास्त्र्ाज्ञाला केमिस्ट्रीत नोबेल परितोषिक मिळते. ते बायो केमेस्ट्री शिकवतात अन् बायो टेक्नॉलॉजी विषयात संशोधन करतात. (हे उदा. अमेरिकेत स्थायिक हिंदुस्थानी शास्त्र्ाज्ञाचे आहे.) यावरून काळ कसा बदललाय, भविष्याच्या गरजा कशा असतील याची कल्पना यावी. आर्ट्स, कॉमर्स, सोशल सायन्स या क्षेत्रातदेखील हेच तत्त्व लागू होते. म्हणजे फक्त मराठी, हिंदी साहित्याचे विषय घेऊन एमए करून उपयोग नाही. पत्रकारिता, मास कमुनिकेशन, इतिहास, राज्यशास्त्र्ा या विषयांचे ज्ञान असेल तर नोकरीसाठी तुमची किंमत निश्चित वाढेल. नव्या शैक्षणिक धोरणात हे अंतर्भूत आहे.
हे सारे अमलात आणायचे तर शिक्षक, विद्यार्थी, प्रशासन अधिकारी सर्वांना मनोवृत्तीत बदल करावे लागतील. कॉलेजच्या दहा ते पाच अशा ठरावीक वेळा चालणार नाहीत. आंतरशाखीय शिक्षण घ्यायचे तर वेळापत्रक तुमच्या सोयीचे नसेल. तुम्हाला स्वतःची वेळ मॅनेज करावी लागेल. प्रयोगशाळा, ग्रंथालय जास्त वेळ उघडे ठेवावे लागेल. आयआयटीसारख्या संस्थेत हे आधीपासून आहे. त्यामुळे अंमलबजावणीत अडचण काहीच नाही. फक्त हे क्रांतिकारक बदल आपण खुशीने स्वीकारले पाहिजेत. जास्तीत जास्त शिकवण्यापेक्षा जास्तीत जास्त शिकण्यावर भर हवा. मूल्यांकन पद्धतीतदेखील आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. सतत मूल्यमापन व्हावे. सेमिस्टर शेवटी तीन तासांचा, शंभर माका&ंचा पेपर, आठपैकी पाच प्रश्न सोडविण्याचे ऑप्शन हे सारे जुने मॉडेल बदलावे लागेल. चुका शोधण्यापेक्षा काय किती समजले हे तपासावे लागेल. नियमित विषयाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकता, संवाद काwशल्य, टीम वर्क, जागतिक घडामोडी, पर्यावरण, समाजभान या वर्ग बाह्य विषयावरदेखील तितकेच लक्ष पेंद्रित करावे लागेल, हे विषय व्रेडिट बँकेचे महत्त्वाचे भाग असतील.
नवे शैक्षणिक धोरण प्रत्येक स्तरावर इन लेटर अँड स्पिरीट अमलात आणले तर आपले एकूणच शिक्षण जागतिक दर्जाचे होईल हे निश्चित..
(जाता जाता… नवे बदल करताना विद्यापीठांनी फुकट पदव्या (सन्माननीय डॉक्टरेट, डी.लिट.) वाटणे बंद केले पाहिजे. व्यक्तीचे सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील काम कितीही मोठे असले तरी विद्यापीठाचे पदवी ग्रहणाचे नियम न पाळता पदवी दान करणे केव्हाही अयोग्यच आहे.)
>> डॉ. विजय पांढरीपांडे
























































