उडणाऱ्या गाड्या

626

गेल्या अर्ध्या शतकापासूनच जगभरातील प्रगत देश अवकाशात उडू शकणाऱया प्रवासी चारचाकीच्या निर्मितीच्या प्रयत्नात आहेत. फ्लाइंग कार अर्थात aन्ग्aह नप्ग्म्त म्हणून ही वाहने ओळखली जातात. 2011 मध्ये अशी अफवा पसरली होती की, टेराफुझिया नावाची कंपनी काही महिन्यांत 2,27,000 डॉलर्सची फ्लाइंग कार उडवायच्या तयारीत आहे आणि त्यातच उबेरसारख्या टॅक्सी कंपनीने 2023 पर्यंत अशा हवेत उडू शकणाऱया कार बनवण्याचे वचनदेखील दिले होते. या प्रयत्नांमध्ये एक गोष्टीचे साम्य आहे, आपण अजूनही या कंपन्यांच्या प्रयत्नांना फळ यायची वाट बघतो आहोत. आपल्याप्रमाणेच अमेरिकन एअरफोर्सदेखील बहुदा वाट बघत थांबायला कंटाळली आहे आणि म्हणूनच त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ‘प्रगत हवाई गतिशील वाहनांच्या व्यावसायिक बाजाराला गती देण्याचा प्रयत्न करणारा नवे संशोधन आणि त्याचा विकास कार्यक्रम ‘एजिलिटी प्राइम सुरू करण्यात आला आहे. जर वायुसेना अशा उपक्रमाला प्रोत्साहन देणार असेल, तर हवाई वाहतुकीचे भविष्य फारसे दूर नाही. ‘एअर फोर्स फॉर ऍक्विझिशन, टेक्नॉलॉजी अँड लॉजिस्टिक्स’चे सहायक सचिव ‘विल रोपर’ यांनी हे मत मांडले आहे. परवडणारी ‘इलेक्ट्रिक वर्टिकल टेकऑफ अँड लँडिंग’ (ईव्हीटीओएल) प्रणाली तयार करण्यासाठी 200 हून अधिक कंपन्या सध्या प्रयत्नशील आहेत. हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कार क्षेत्राचे भविष्य सध्या त्याकडे आशेनं बघते आहे. पहिल्या मागणीनुसार, वायुसेनेने प्रति तास 100 मैलापेक्षा जास्त वेगाने उडू शकणाऱया आणि तीन ते आठ माणसांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या वाहनांसाठी मागणी नोंदवली आहे. जोडीलाच 100 मैलांपेक्षा जास्त अंतर पार करण्यासाठी सलग एक तासापेक्षा जास्ती वेळ उड्डाण करण्याची क्षमता असणारी वाहने देखील मागविली आहेत. या वर्षाच्या 17 डिसेंबरपर्यंत या वाहनांच्या संरचनेपर्यंत पोहोचणे आणि 2023 पर्यंत पूर्ण हवाई चाचण्या साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या