
विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे एक प्रभावशाली आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. साधारण दिसणाऱया या सहृदयी माणसात एक पुशल वैमानिक, असामान्य फोटोग्राफर, तडफदार वक्ता आणि चिकित्सक लेखक होते. लहान असल्यापासूनच त्यांना संरक्षण दलांचे आकर्षण असल्यामुळे कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एनसीसी एयर विंगमध्ये पॅडेट म्हणून प्रवेश घेतला होता. पुढे त्यांना 1965 मध्ये एअर फोर्सच्या ट्रान्सपोर्ट ब्रँचमध्ये कमिशन मिळाले. 36 वर्षांच्या बेदाग, संस्मरणीय सेवेनंतर ते 31 मार्च 2001 रोजी निवृत्त झाले. 77 वर्षांच्या संस्मरणीय आयुष्यानंतर 25 डिसेंबर 2020 रोजी ते अनंतात विलीन झाले. आपल्या कारकिर्दीत अशोक मोटेंनी ऑटर, डग्लस डकोटा डीसी 3, हॉकर सिडने एचएस 748, अँटोनॉव्ह एएन 32, इल्युशिन आयएल 76, डॉर्नियर डीओ 228, आरबी 47 रेकी एयरक्राफ्ट, टायगर मॉथ डीएच 82 आणि एचजेटी 16 या विविध विमानांवर 12 हजारांपेक्षा जास्त तासांचे उड्डाण केले. हिंदुस्थानी वायुसेनेचे ते नावाजलेले पह्टोग्राफर होते. 1965 चे हिंदुस्थान-पाक युद्ध , 1971 चे बांगला देश स्वातंत्र्य युद्ध आणि कारगिल युद्ध (1999) मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. 65 च्या युद्धात त्यांनी बहुतांश सहायक वैमानिकाची (को-पायलट) भूमिका निभावली. 71 च्या युद्धात बांगलादेशावर शरणपत्रिका (सरेंडर पॅम्फ्लेट्स) टाकणे, ढाका एअर फिल्डवरील बॉम्बिंगच्या वेळी फायटर, बॉम्बर्सबरोबर केलेले फोटो मिशन, तैनजैलवर 2 पॅरांनी केलेल्या पॅराड्रॉपचे चित्रीकरण, मी कार्यरत असलेल्या मुक्ती वाहिनीच्या मदतीसाठी केलेली उड्डाणे आणि इतर सामरिक मदत उड्डाणांमधे ते प्रमुख वैमानिक (मेन पायलट) होते. 99 च्या युद्धात ते स्थलसेनेबरोबर राहून त्यांना हव्या असलेल्या लक्ष्यावर विमानांना आणणारे फॉरवर्ड एअर पंट्रोलर (एफएसी) होते. एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस यांच्या कारगिलमधील बहुचर्चित मिग सॉर्टीचे दिशादर्शकही अशोक मोटेच होते. याशिवाय त्यांनी श्रीलंकेत कार्यरत असलेल्या हिंदुस्थानी शांती सेनेच्या मदतीसाठीही अनेक उड्डाणे केली होती. शांती काळात मिझोराम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, लडाख आणि कश्मीरमध्ये तैनात सैन्याच्या मदतीसाठी ते अथक उड्डाण करत असत. पूर्वोत्तर राज्यांमधील घनदाट जंगलांमधे व उत्तुंग बर्फाळ पर्वतराजींवर कार्यरत असलेल्या जवानांना आणि प्रत्यक्ष युद्धातील सैनिकांनाच अशा मदत उड्डाणाची महत्ता कळू शकते. कारकिर्दीच्या शेवटी अशोक मोटे एअर हेडक्वार्टरचे एअर इंटलिजन्स संपर्प आणि लोकसंवर्धन अधिकारी होते. एअर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीसांच्या सफेदसागर या कारगिल युद्धातील एअर ऑपरेशन्ससंबंधी इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा त्यांचा मानस होता, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. ते प्रख्यात छायाचित्रकारही होते. विमानांतून काढलेल्या पह्टोंशिवाय पॅमेरा हाती घेऊन त्यांनी काढलेली हजारो छायाचित्रे दिल्लीतील एअर पर्ह्स अका&इव्हजमध्ये आहेत. अशोक मोटे ऑक्टिव्ह डय़ुटीवर असताना त्यांनी काढलेली अनेक छायाचित्रे वायुसेनेच्या बहुतांश दिनदर्शिकांमध्ये सामील केली गेली. याशिवाय ते रसाळ समालोचकही होते. दिल्लीत होणारी 15 जानेवारीची आर्मी डे परेड, 27 नोव्हेंबरची एनसीसी डे परेड, एअर/आर्मी हेडक्वार्टर्सचे समारंभ आणि दिल्ली, नागपूरमधील एअर शोचे समालोचन अशोक मोटे यांच्या ओघवत्या समालोचनाशिवाय पुढे सरकत नसे. ते एअर पर्ह्सचा लिव्हिंग एनसायक्लोपीडिया म्हणून ख्यातनाम होते. ते एक उत्तम लेखकही होते. एपूण सहा भाषांवर त्यांच प्रभुत्व होते. त्यांच्या पुस्तक/युद्धकथांनी प्रेरित होऊन अनेकांनी संरक्षण दलांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मराठी व इंग्रजी वृत्तपत्र आणि मासिकांसाठी त्यांनी लिखाण केले. याव्यतिरिक्त अशोक मोटे एक ओजस्वी वक्तेही होते. नागपूर, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेकांनी त्यांच्या ओघवत्या शेरोशायरी व संस्कृत वचनांनी भरलेल्या आणि रक्त सळसळवणाऱया भाषणांचा आस्वाद घेतला असेल. अनेक शाळा, कॉलेजेस आणि बहुश्रुत कार्यक्रमांत त्यांची भाषणे झाली. परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, कथाकथन आणि चलचित्र वाहिनीवरील असंख्य कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोपून दिले. दरदिवशी किमान 25 सैनिक, परिचितांना दूरध्वनी करण्याचा पायंडा त्यांनी शेवटपर्यंत पाळला. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रभाकर मोटे आणि ऑल इंडिया रेडियोच्या पदाधिकारी शोभा मोटे यांचे सुपुत्र विंग कमांडर अशोक मोटे त्यांच्या पश्चात त्यांच्या अर्धांगिनी डॉक्टर भावना मोटे अन् मोठा आप्त व मित्र परिवार आहे. जनमानसात त्यांची स्मृती चिरंतन ताजी असेल. कारण ओल्ड सोल्जर्स नेव्हर डाय, दे जस्ट फेड अवे!
– कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)
[email protected]






















































