
सोने खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी चांगली वार्ता आहे. सलग तिसऱया दिवशी सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचा भाव 250 रुपयांनी घसरला, तर चांदी 600 रुपयांनी स्वस्त झाली.
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 58 हजार 530 आहे. चांदी 71 हजार 130 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 53 हजार 653 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार 530 प्रति 10 ग्रॅम आहे.
फ्युचर्समध्ये नरमाई
सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीत आज तेजीने सुरुवात झाली, पण नंतर नरमाई दिसली. मल्टिकमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर सोन्याचे फ्युचर्स 18 रुपये वाढीसह 58 हजार 450 रुपयांवर उघडले. मे महिन्यात सोन्याच्या फ्युचर्स किमतीने 61 हजार 845 रुपये प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे मल्टिकमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा डिसेंबर वायदा आज 277 रुपये घसरून 71 हजार 500 रुपयांवर उघडला. बुधवारी सकाळी सोन्याचे वायदे 166 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 58 हजार 772 रुपयांवर होते.



























































