
– ब्रिगेडियर हेमंत महाजन ( [email protected])
चीन आणि हिंदुस्थानने कडक हिवाळय़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले सैन्य तैनात केले आहे. मात्र रोज एक चिनी सैनिक या अति उंच सीमेवर मृत्युमुखी पडत आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी एलएसीवर आयर्न मॅन सैनिक तैनात करतो असे नवीन मानसिक युद्ध चीन खेळायचा प्रयत्न करत आहे. हिंदुस्थानच्या सीमारेषेच्या जवळ चीन सुपर हीरोप्रमाणेच एक्सोस्केलेटन सूट परिधान केलेले सैनिक दाखवत होता. मात्र प्रत्यक्षात आयर्न मॅन सैनिक सीमेवर दिसायच्याऐवजी प्रयोगशाळा आणि व्हिडीओ वॉर फेअरमध्येच दिसत आहेत.
चीन आणि हिंदुस्थानने कडक हिवाळय़ात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या, हिंदुस्थानच्या सीमेवरील बाजूच्या पुढच्या चौक्यांवर आपले सैन्य तैनात केले आहे. लष्करी कारवाया करून हिंदुस्थानला लडाखमागे हरविण्यामध्ये चीनला गेल्या सात महिन्यांमध्ये पूर्ण अपयश आलेले आहे. म्हणून आता चीन वेगवेगळय़ा गैरलष्करी पद्धतीचा वापर करून हिंदुस्थान-चीन सीमेवर तणाव कायम ठेवायचा प्रयत्न करत आहे. याचा मुख्य उद्देश आहे की, ही सीमा कायमची गरम राहावी आणि हिंदुस्थानला या सीमेवर पुष्कळ जास्त सैन्य तैनात करायला लागावे, नवीन शस्त्र विकसित करावी लागावी, हिंदुस्थानला चीनबरोबर शस्त्रस्पर्धा करावयास भाग पाडावे, ज्यामुळे हिंदुस्थानचे लष्करी बजेट वाढेल आणि आर्थिक प्रगतीचा वेग कमी होईल.
यात आता अजून एक मानसिक युद्धाचा आयाम पुढे आला. नुकत्याच एका रिपोर्टनुसार, हिंदुस्थानी सीमेवर तैनात असलेल्या पीएलएच्या सैनिकांना आयर्नमॅन एक्सोस्केलटन सूट देण्यात आले आहे. या सूटच्या मदतीने चिनी सैनिक उंचीच्या ठिकाणावर अधिक वजन घेऊन जाऊ शकतात. या भागात चीनचा एक महत्त्वपूर्ण एअरपर्ह्स बेस आहे. या भागातील सैनिकांनी हे सूट घालणे सुरू केले आहे. या सूटमुळे सैनिकांची पंबर किंवा पायाला दुखापत होण्याची शक्यताही कमी होते. खराब हवामानात गस्त घालताना सैनिकांना या सूटमुळे जास्तीचे सामान जवळ ठेवणे शक्य होते असा दावा आहे. याला हिंदुस्थानचे प्रत्युत्तर काय असेल यावर आपण लक्ष पेंद्रित करु.
चीनची सेंट्रल टेलिविजनच्या (CCTV) रिपोर्टनुसार, एका सप्लाय डिलिव्हरी मिशनदरम्यान शिनजियांग मिलिट्री कमांडच्या सैनिकांनी या सूटच्या मदतीने 20-20 किलोग्रॅम जेवण-पाणी आपल्यासोबत घेतले होते. तज्ञांच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानामुळे उचललेले वजन सैनिकांच्या पायांवर नाही, तर आयर्न मॅन एक्सोस्केलटन सूटच्या फ्रेमवर पडते. वजन फ्रेममध्ये ट्रान्सफर होते. त्यामुळे अधिकचे वजन सोबत घेऊन चालण्यास सैनिकांना सोपे जाते. डोंगराळ भागात हे सूट प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात येते.
उंचीवर ऑक्सिजनची कमतरता असते. त्यामुळे जवळ असलेल्या सामानाचे वजन तुलनेने खूप अधिक वाटू लागते. उंच ठिकाणी गेल्याने माणसाची सहनशक्तीही कमी होते. अशा परिस्थितीत आयर्न मॅन एक्सोस्केलटन सूट घातल्याने सैनिकांना जड वजन उचलण्यास मदत मिळते. तसेच उंच ठिकाणी जास्त काळ राहणेही यामुळे शक्य होते. हिमाचल प्रदेशात थंडी खूप असल्याने अनेक सैनिक आजारी पडत असतात.
चिनी सैन्य तोफांमध्ये जड दारुगोळा लोड करण्यासाठी नॉन-पॉवर्ड वापरत आहे असे दाखवले गेले, ज्यामुळे काही यांत्रिक फायदे होतात. एक्सोस्केलेटन सूट अति उंच भागात वर चढताना किंवा खाली उतरताना पंबर किंवा पायाच्या दुखापतीचा धोका टाळताना मदत देतो. यामुळे सीमावर्ती भागातील सैनिकांना शारीरिक फायदा मिळेल. पीएलए सैनिक अलीकडेच पुरवठा मिशन दरम्यान अन्न आणि पाणी घेऊन गेले. प्रत्येक व्यक्तीने सुमारे 20 किलोग्रॅम या वस्तू त्यांच्या बॅकपॅकमध्ये ठेवल्या.
जॉइंट लॉजिस्टिक सपोर्ट सेंटर येथील पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी 80 किलो व्रेट घेऊन जाताना पावर एक्सॉस्केलेटनचा वापर केला होता. दाखवलेले पह्टो, व्हिडीओ क्लिप्स खरी वाटत नाही. फार तर मानसिक युद्धाकरिता त्याचा वापर करता येईल; परंतु अजून अशा प्रकारचे पुठलेही स्टू सीमेवर वापरताना दिसले नाहीत. याचा वापर फार तर प्रयोगशाळेमध्ये केला गेला असावा.
अशा प्रकारच्या सूटचे संशोधन करण्याचा प्रयत्न अमेरिका आणि रशिया अनेक वर्षांपासून करत आहे. पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर अमेरिकेने हा प्रयत्न सोडून दिला. रशियाने अशा प्रकारचे काही सूट बनवले आहेत, पण ते अतिशय पिंमती आहेत आणि केवळ महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये म्हणजे किंवा स्पह्टक पदार्थ शोधून काढणे यामध्ये काही सैनिकांना ते दिले जाऊ शकतात. परंतु लढणाऱया प्रत्येक सैनिकाला ते दिले जाऊ शकत नाहीत; कारण त्याची किंमत प्रचंड असते. आपण आपल्या स्फोटक पदार्थ शोधणाऱया सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट आणि शरीराचे रक्षण करणारे चिलखत पुरवतो; पण हे फक्त थोडय़ा सैनिकांकरिताच असते. अशा महागडय़ा सूटपेक्षा इस्राएलने तयार केलेले रोबो जास्त उपयुक्त ठरू शकतात.
2019 मध्ये चीनने 100 वेगवेगळय़ा संशोधन संस्थांना अॅडव्हान्स स्केलेटन सूट आणि उडणारे सूट तयार करायला सांगितले होते. याची एक शर्यत लावण्यात आली होती आणि वेगवेगळय़ा सुटचे या ठिकाणी निरीक्षण करण्यात आले. उडणारे सूट आपण जेम्स बॉण्डसारख्या सिनेमात बघितले असतील; परंतु त्याची किंमत प्रचंड असते आणि त्याऐवजी स्वस्तामध्ये इतर शस्त्र तयार करता येऊ शकतात, जसे की ड्रोन किंवा लेझर शस्त्र किंवा डायरेक्ट एनर्जी वेपन. अजून एक्सोस्केलेटन सूट संशोधनाला पुरेसे यश मिळाले नाही; मात्र यापुढे किती यश मिळेल हे सांगता येत नाही. चीनने चालविलेल्या चिलखत किंवा एक्सोस्केलेटन सूट तयार करण्याच्या शर्यतीत अमेरिका आणि रशियाने प्रवेश केला आहे. एक्सोस्केलेटन सूट घालण्यायोग्य मोबाईल मशीन्स आहेत, इलेक्ट्रिक मोटर्स, न्यूमेटिक्स, लिव्हर, हायड्रॉलिक्स किंवा तंत्रज्ञानाचे संयोजन जे वाढीव सामर्थ्य आणि सहनशक्तीसह अवयव हालचाल करण्यास परवानगी देतात. आपण या संशोधनावर लक्ष ठेवावे.



























































