नवी नाटके सज्ज!

464

मराठी रंगभूमीवर रसिकांच्या सेवेसाठी येण्यास दोन दमदार नाटकं सज्ज झाली आहेत.

दसऱयाच्या मुहूर्तावर
कुसुम मनोहर लेले

1997 साली रंगभूमीवर तुफान गाजलेले ‘कुसुम मनोहर लेले हे’ नाटक नव्या रुपात पुन्हा रंगभूमीवर येतय. संतोष कोचरेकर हे या नाटकाची निर्मिती करणार आहेत. तसेच प्रदीप मुळये हे या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुजाता देशमुख या एका घटस्फोटीत महिलेला मनोहर लेले नाकाचा इसम खोटे लग्नाचे आश्वासन देऊन फसकतो आणि तिचे मूल पळकतो, ही या नाटकाची कथा होती. या नाटकातील सुजाता ही व्यक्तिरेखा त्यावेळी फार गाजली होती. वीस वर्षांपूर्वी जेव्हा हे नाटक प्रथमच रंगमंचाकर आलं ते गणरंग आणि महाराष्ट्र या दोन निर्मिती संस्थांनी मिळून ते केलं होतं.

नव्या नाटकातील भूमिका शशांक केतकर आणि संग्राम समेळ आलटून पालटून करणार आहेत. या नाटकाला अशोक पत्की संगीत देणार आहेत. या नाटकात पल्लकी पाटील, पुण्याच्या मानसी मागीकर हे कलाकार आहेत. सतीश जोशी, प्रियंका कासले आणि किरण राजपूत हेही कलाकार या नाटकात आहेत. हे नाटक 8 ऑक्टोबर रोजी दसऱयाच्या शुभमुहूर्तावर रंगभूमीवर येणार आहे… याचवेळी हे नाटक पूर्की ज्या कलाकारांनी गाजकलं त्या संजय मोने, डॉ. गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी आणि देकिका देशपांडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चांगल्या कथानकाबरोबरच उत्तम सेट्स, उत्तम कॉस्च्युम्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. कथानक तेच आहे, फक्त आजच्या काळानुसार आणि प्रेक्षकांना रुचतील असे काही बदल त्यात केले आहेत. नकीन सेट्स आणि प्रकाशयोजनाही नक्या प्रकारे प्रदीप मुळ्ये यांनी केली आहे. प्रदीप मुळ्ये खूप कर्षांनी पुन्हा दिग्दर्शनात उतरत आहेत. हेही या नाटकाचे कैशिष्टय़च असल्याची माहिती नाटकाचे निर्माते संतोष कोचरेकर यांनी दिली.

यशस्वी लग्नाचा कानमंत्र असणारे तेरी भी चूप

मोतलिंग प्रोडक्शनच्या ‘तेरी भी चूप’ या नाटकाच्या शिर्षकाप्रमाणेच त्याचा विषय आहे. नातेसंबंध टिकवायचे असतील तर खोटं बोलंलंच पाहिजे असं म्हणणारं हे विनोदी नाटक आहे. यामध्ये चार पात्र   आहेत.

तेजस रानडे या तरुणाने या नाटकाचे  लेखन केले आहे. त्याचे हे पहिलेच  व्यावसायिक नाटक आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, वेशभूषा मंगल केंकरे आणि संगीत अजित परब यांचे आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत प्रियदर्शन जाधव, मयुरा रानडे असून अजून दोन पात्रं ठरलेली नाहीत. लग्न झालेल्या जोडप्यांनी हे नाटक हमखास पाहायला पाहिजे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या