
>> राखी तोडणकर
आहाराचे योग्य नियंत्रण करून निरोगी आरोग्य संपदा म्हणजेच fit and healthy राहण्यासाठी मदत करणे हे माझे ब्रीद. न्यूट्रिशन काऊन्सिलिंग हे माझे पॅशन आहे. त्यामुळे असंख्य लोकांशी जोडले गेले आहे. गेली 12 वर्षे माझे हे कार्य चालू आहे. मानवी शरीराची जडणघडण इव्रेडिबल आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचे डाएट वेगळे असते. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते. फूड सायन्स आणि न्यूट्रिशनमध्ये पोस्टग्रॅज्युएट डिग्री घेऊन गेल्या 12 वर्षांच्या अनुभवातून काही गोष्टी मला जाणवल्या, की आपण डाएटच्या नावाखाली ज्या चुकीच्या गोष्टी फॉलो करतो, उपाशी राहतो, जेवण कमी करतो, आपले रोजचे पारंपरिक पदार्थ सोडून इतर पदार्थ खातो, आपल्या रोजच्या जेवणातील पदार्थांना अनहेल्दी नाव देऊन बाकी बरंच काही खातो. पण खरं तर डाएटसाठी आपली पारंपरिक, प्रादेशिक अणि हंगामी (local, regional, traditional) आहार पाद्धत अतिशय योग्य आहे. वेगवेगळ्या प्रदेशात पिकणारी पिके, कडधान्ये, फळे, भाज्या यांचा वापर करून आपली हेल्थ निरोगी आणि उत्तम ठेवण्याचे काम आम्ही ‘हेल्दी मी’मध्ये करतो. आहार, विहार अणि आवड यांचा उत्तम समन्वय साधून ‘हेल्दी मी’मध्ये आम्ही गरजेप्रमाणे वेगवेगळे प्रोग्रॅम देतो. जसे – डायबेटीस management, काॅलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, PCOS डाएट, थायरॉईड नियंत्रक डाएट, वजन कमी करणे, वजन वाढवणे आणि इतर सर्व प्रकारचे मेडिकल आजार नियंत्रित करण्यासाठी डाएट प्लॅन करून देतो. आपले शरीर अणि मन जर निरोगी असेल तरच आपण आपले आयुष्य समाधानाने आणि आनंदाने जगू शकतो. म्हणूनच आहार तज्ञ म्हणून आम्ही तुमच्या जेवणाकडे फक्त डाएट म्हणून नाही तर सुख, समाधान आणि हॅपिनेसही पाहतो.






























































