मुद्दा – सार्वजनिक आरोग्य आणि पर्यटन

>> राजन वसंत देसाई

आपला देश निसर्गरम्य आणि वैविध्यपूर्ण अशा पर्यटनपूरक साधनांनी भरलेला आहे. संपूर्ण हिंदुस्थान पाहायचा असेल तर माणसाचं आयुष्यच अपुरं पडेल इतका पर्यटनाचा वारसा लाभला आहे. पर्यटन हा विषय घेण्याअगोदर नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊया. वैयक्तिक आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य हे एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्हीही अबाधित राहायला हवे हे आता कोरोना काळात तर अगदी अधोरेखित झाले आहे. सध्या तरी संपूर्ण जगात आरोग्य या विषयावर खल चालू आहे. हिंदुस्थानसारख्या मोठय़ा लोकसंख्येचा विचार केला तर एकदोन देश सोडले तर एका बाजूला हिंदुस्थान आणि बाकी सारे जग असे मूल्यमापन करावे लागेल. म्हणून आपल्या देशाकडे समृद्ध अशा नैसर्गिक साधनांची उपलब्धता असतानाच त्यावर होणारा ग्लोबल वॉर्मिंगचा फ्रश्नदेखील तितकाच जटील होत आहे. भौगोलिक विचार केला तर आपला देश तिन्ही सीमारेषांवर समुद्राने वेढलेला आहे आणि उत्तरेला हिमालय म्हणजेच चारही बाजूनी पाणी हाच फ्रमुख घटक आहे. पाणी म्हणजे जीवन समृद्धी असे असले तरी ग्लोबल वॉर्मिंगमुळे हेच पाणी धोकादायक बनले आहे. आताही नद्या, नाले, समुद्र आपणच दूषित करून या नैसर्गिक स्रोतांना रोगफ्रवाहक बनवत आहोत हे जेव्हा समजेल आणि त्यानंतर अनेक वर्षे समुद्रातून कचरा वाहत येऊन रोगराई पसरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याला कारण मानवाचे दुर्लक्ष. यातून सार्वजनिक आरोग्य आपणच धोक्यात आणतो आणि त्यामुळे नैसर्गिक साधनांचा ऱहास होतो. या देशाला पर्यटन इतकी संपत्ती भरभरून दिली आहे, त्याची माहितीसुद्धा आपण पूर्णपणे घेत नाही. आपल्या देशात लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेले लोकफ्रतिनिधी असतात. या फ्रत्येक लोकफ्रतिनिधीने मतदारसंघात काय पिकतं आणि काय विकतं, त्याचबरोबर आपलं गाव, आपलं शहर पर्यटनाच्या दृष्टीने कसं रेखाटलं जाईल आणि त्यातूनच भूमिपुत्रांना तेथेच रोजगार कसा उपलब्ध होईल या सर्व बाबींकडे लक्ष पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य हा केवळ आणि केवळ एकच महामार्ग आहे. महामार्ग एवढय़ासाठी की, संपूर्ण देशच आता अनेक महामार्गांनी जोडला जातोय. व्यापारी दृष्टीने देवाणघेवाण महत्त्वाचा भाग आहे, परंतु केवळ व्यापार-उदीम हेच कारण नसून संस्कृती आणि त्यातूनच पर्यटन सुलभ होण्याकडे कल आहे, पण यासाठी या देशातील नागरिकांची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य याबाबतीत मानसिकता बदलणे जरुरीचे आहे. दंडात्मक कारवाई हा त्यावरील उपाय नसून तो अपाय आहे. एखादी गोष्ट करू नको म्हटल्यावर तीच मुद्दामहून करण्यामागे काही समाजविघातक लोकांचा कल असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फ्रातर्विधीस बसणे, रस्त्यावर सर्रासपणे उघडय़ावर खाद्यपदार्थ विकणे, कचरा उघडय़ावर टाकणे यातून अनेक संसर्गजन्य रोगांचा फैलाव होत असतो आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब नागरिकांच्या डोक्यात इतकी अंगवळणी पडली आहे की एखादे गाव, शहर स्वच्छतेच्या बाबतीत उपाययोजना करीत आहे हे वास्तव विकृत मनोवृत्तीच्या लोकांना हास्यास्पद वाटते. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाऊन सहजरीत्या थुंकणे हे अगदी नेतेही करत असतात हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य हा विषयच सर्वच सरकार अन् फ्रशासनाने अगदी गावपातळीपर्यंत युद्धपातळीवर घेणे गरजेचे आहे आणि त्यातूनच पर्यटनाचा विकास शक्य होईल. कारण देशातील अगदी थोडी पर्यटनस्थळे तेथील सार्वजनिक आरोग्य, मूलभुत सुविधा याबाबतीत परिपूर्ण आहेत. एखादे स्थळ वा मंदिर स्वच्छ म्हणजे स्वच्छता नव्हे, तर तो संपूर्ण फ्रदेशच फ्रदूषणमुक्त असायला हवा. यासाठी पर्यावरणाचा समतोल, ग्लोबल वॉर्मिंगमुळे संपूर्ण जगावर होणारा वातावरणातील बदल आणि आपले आपत्कालीन व्यवस्थापन हे अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. वैद्यकीय उपलब्धता ही अधिक सुलभ आणि परिपूर्ण व्हायला हवी. कोरोनासारखे आजार कमी होणार, पण काही ठिकाणी आपल्याच हलगर्जीपणामुळे वाढीस लागणार यामुळे देशाला आर्थिक नुकसान तर आहेच, पण शिक्षण आणि उद्योगधंदेसुद्धा एक-एक पायरीखाली जात आहेत. हे कधीच आपल्या देशाला परवडणारे नाही. आपला देश जर वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य याबाबतीत परिपूर्ण झाला तर आपल्या देशात नैसर्गिक साधनांचा आणि त्यातूनच पर्यायाने पर्यटनाची इतकी मोठी उपलब्धता आहे की, इतर कोणत्याच देशाकडे कोणत्याच बाबतीत बघायची गरज नाही. हे कदाचित अतिशयोक्तीचे वाटेल, पण या देशालाच जर परिपूर्ण बनायचे असेल तर आरोग्य आणि पर्यटन याच दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हे देशाची सीमा सुरक्षित करणे इतक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या