तेरे चेहरे से नजर नही हटती…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीती मेंहेंदळे

जमिनीवर बारीकसं काही शोधायला निमित्त हवं असतं. नजर एकदा जमिनीला समांतर झाली की खूप लांबकरचं नजरेच्या टापूत यायला लागतं. मग तसंच जमिनीला गाल लाकून शोधत राहिलं की मस्त तंद्री लागते. तिथे एक लांबकर स्वप्नगरी वसलेली असते. तिचा एक होऊ घातलेला अर्धवट वयातला गोंडस राजकुमार असतो. त्याचं असं एक सुरक्षित कवच कुंडल असलेलं आयुष्य असतं. इथे खरंतर गोष्ट संपायला हवी. पण इथेच गोष्ट सुरू होते. ऋषी कपूर मला असा दिसला कायम. स्वप्नगरीचा राजकुमार वगैरे. आज तो नाहीये हा वर्तमानकाळ आहे आणि कालपरवापर्यंत सवयीने ऐकत आलेली गाणी श्रद्धांजलीचं रूप घेऊन फेर धरून आहेत ही वस्तुस्थिती.

त्याला पहिलं कधी पाहिलं तेही नक्की नाही आठवत. छायागीतमध्ये पाहिलं असावं बहुधा. त्याच्यावर नजर खिळून राहावी तो असा नक्कीच होता. थोडं जुनं गाणं लागायचं कधी.. ‘तितर के दो आगे तितर’… आणि आश्चर्य काटावं असा गुटगुटीत ऋषी कपूर आणि त्याचा जोकर आठवायचा. मला वैयक्तिक म्हटलं तर पूर्ण सिनेमात त्याचंच काम काय ते आवडलं होतं. सगळे त्यांच्या वयाला, शरीराला अनुसरूनवागत होते. पण त्याला खूप अवघड जबाबदारी दिली होती. अर्धवट वयातलं प्रेम उमलताना, फुलताना, आणि कोमेजताना दाखवायचं होतं तेही थोडा वेळच. त्याची देहबोली, प्रसंगी फक्त चेहऱयाचं बोलणं त्याच्या वयाच्या मानाने निश्चित कौतुकास्पद होतं.

त्याचं गिटार हातात धरणं (तांत्रिकदृष्टय़ा किती बरोबर असेल नसेल) एक विश्वास जागा करायचा. खूप काही समजत असल्यासारखे रंगून जाऊन पीस वाजवून दाखवायची त्याची जुनी सवय. अगदी ‘दर्द ए दिल’ पासून ‘सोचेंगे तुम्हे प्यार’ पर्यंत. ‘चेहरा है या चाँद खिला है’ म्हणताना त्याच्या हातात गिटार प्रेमाने धरलेल्या चित्राकरूनच आधी नजर हटत नाही डिम्पल असूनही.
‘सरगम’ त्याच्या हातातला डफ आणि त्याचं जीव ओतून डफ वाजवणं पाहिलं की हा खूप वर्षं डफच वाजवत असेल असं काटलं होतं.

गाण्याची आणि अभिनयाची समज ही माणसाला पोटातूनच मिळते. राज कपूर ही साक्षात संगीतातली दर्दी समजली जाणारी संस्था त्याला वडील लाभले होते. ‘हीना’च्या लताबाईंच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कोपऱयात शांत डोळे मिटून गाणं ऐकणारा ऋषी आठवतो अशा वेळी. त्याच्या या शांत चेहऱयामागे बरीच खळबळ होती. वडिलांनी रेड कार्पेट सुरुवात करून दिली तरी रस्ता पुढे सोपा नव्हताच. राजबिंडं रूप होतंच पण त्यामुळे काही संधी वाटय़ाला आल्याही नसतील. नसेना का. त्याने मागे फिरून पाहिलं नाही. ओम शांती ओम, बचना ऐ हसींनो, दिल लेना खेल है आणि अशी कित्येक गाणी सादर करून त्याने दशक गाजवून सोडली. आव्हान घ्यायचा स्वभाव त्याला नक्की स्वस्थ बसू देत नसणार. खोज, जहरीला इन्सान वगैरे सिनेमांमध्ये त्याला रहस्यपटात पाहून उत्सुकता वाढली. कळस म्हणजे हृतिकचा अगि>पथ. पूर्ण सिनेमात आजही आठवला तो फक्त ऋषी, कारण त्यात तो त्याच्या स्वभावाविरुद्ध भूमिकेत दिसला होता. इतकं त्याला निगेटिव्ह पाहताना आश्चर्य म्हणजे कुठेही नकारात्मक वाटलं नाही ना चीड आली.

एक अजून आठवण येते ती ‘दिदार ए यार’ सिनेमाची. उर्दू शायरी आणि मुस्लिम वातावरणातला हा चित्रपट उत्तम शायरी आणि संगीताने सजलेला. त्याची त्यावेळची लोकप्रिय जोडी जमलेली टीना मुनीम असल्याने सुंदर दिसण्याबरोबर त्याच्यावर अभिनयाची जबाबदारी वाढलेली. त्याचं त्या मुसलमानी पेहेरावात बखुबी वावरणं, शिक्षकाकडून उर्दू उच्चार तासून घेणं आणि ते पडद्यावर अजिबात जाणवू न देता सहज सादर करणं काय सोपं आहे का? ‘तुमको देखा तो ये समझमे आया’ किंवा ‘सरकती जाये है’ गाण्यांमधे त्याचा सहजसुंदर अभिनय वाखाणण्यासारखा. काही माणसं हृदयात अढळ बसवली जातात. कितीही उतार चढाव आले तरी त्यांना धक्का लागत नाही. अशी अनेक असतात. आठवणीने दिवसभराची रुक्ष कामं झाली की ऋषीची श्रवणीय गाणी ऐकावी (हल्ली इंटरनेटची कृपा म्हणून पहावी पण). त्याला आठवत डोळे मिटावे असं सुंदर रुटीन झालं होतं. किती वर्षं झाली. त्याने अचानक येऊन स्टेज हुकमी ताब्यात घ्यावं, पायाने चाळा म्हणून एखादा दगड किंका बर्फाचा तुकडा उडकाका, नायिकेने त्याला मजनू म्हणाकं त्याच्यासाठी जानबिन द्याकी, हे सारंच त्याला शोभतं.

आज ते गाणं मात्र काळीज कापत जाईल. ‘तेरे चेहरेसे नजर नहीं हटती…’ आणि तिथेच टेप तुटून गुंडाळत जाकी तशी एकेक ओळ त्याच्याभोवती गुरफटत जाईल.
बस नजारें हम क्या देखें..