
स्वराज्याच्या पहिल्या लढाईचे शिल्पकार म्हणून सरदार शिवाजीराव इंगळे यांचे नाव घेतले जाते. वीर सरदार शिवाजीराव इंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे आणि स्वराज्याचे एक निष्ठवान व पराक्रमी सरदार होते, ज्यांनी स्वराज्य स्थापनेत आपले बलिदान दिले. आदीलशाहीमधील ते एक वजनदार घराणे होते. मराठा साम्राज्याच्या विस्तारात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.
बुलढाणा जिह्यातील करवंड गावचे रहिवासी असलेले सरदार शिवाजीराव इंगळे हे महाराष्ट्रातील प्रमुख इंगळे घराण्याचे महत्त्वाचे घटक मानले जात. 8 ऑगस्ट 1648 रोजी खळद, वाळुंज, बेलसर परिसरात झालेल्या स्वराज्याच्या एका महत्त्वाच्या लढाईत सरदार शिवाजीराव इंगळे यांनी नेतृत्व केले होते. त्यांचे समाधीस्थळ पुणे जिह्यातील वाळुंज येथे आहे. त्यांच्या 372व्या शौर्यदिनानिमित्त इथे त्यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. एका स्वराज्ययोद्ध्याचे स्मृतीस्थळ म्हणून ते ओळखले जाते. करवंड येथे त्यांची ऐतिहासिक गढी आजही भग्नावस्थेत आहे.



























































