आभाळमाया : अंतराळात ‘थ्रीडी’ छपाई!

608

>> वैश्विक ([email protected])

अंतराळात विविध प्रयोग करून तिथल्या वजनरहित अवस्थेत असताना काही गोष्टी साध्य झाल्या तर त्या उद्याच्या चांद्र-मंगळवारीला उपयुक्त ठरणार आहेत. चंद्रावर जाण्यासाठी अनेक देशांच्या सरकारी वैज्ञानिक यंत्रणा सिद्ध झाल्या असतानाच उद्या अंतराळ प्रवासाचा व्यवसाय होऊन त्याचंही खासगीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सुरुवातीला अंतराळात प्राणी पाठवून त्यांच्यावर तिथल्या गोष्टींचा काय परिणाम होतो याची चाचपणी झाली. रशियाने फार पूर्वी ‘लायका’ नावाची पुत्री अंतराळात पाठवल्याचं अनेकांना आठवत असेल. माणसाने पृथ्वी सोडून अंतराळात गेल्यावर त्याच्या शरीरावर कोणते परिणाम होतात याचाही अभ्यास सुरू आहेच. वजनरहित अवस्थेत अंतराळ स्थानकावर अनेक महिने काढल्यावर हाडं ठिसूळ होतात का पिंवा इतर शारीरिक व्यथा-व्याधी उद्भवण्याची शक्यता असते का याचं निरीक्षण उद्या स्पेसमध्ये मोठय़ा संख्येने माणसं पाठवताना उपयोगी पडणार आहे.

पृथ्वीला गुरुत्वाकर्षण असल्याने आपल्याला वजन असतं. पृथ्वीवरच्या वातावरणाचा भार सहन करण्याची शक्ती आपल्याला तशा उत्क्रांतीमुळे जन्मजातच लाभलेली असते, परंतु एकदा का अंतराळात गेलं की, शरीर पिसासारखं हलपं होतं. सहजतेने, पंखांविना तरंगायला लागतं. स्पेस स्टेशनमधल्या अंतराळवीरांचे यूटय़ूबवरचे व्हिडीओ पाहिले तर त्यांच्या तरंगत्या हालचालींची गंमत वाटेल, पण त्यांच्यासाठी ती गंमत नसते. ती शिकण्यासाठी पृथ्वीवर अनेक दिवस परिश्रम घेतलेले असतात. कारण साधा टूथब्रश हातात पकडायचा तर ‘ग्रिप’च  मिळणार नाही हे ठाऊक असतं. पाण्याचे थेंब निसटले तर ते तसेच तरंगत राहणार याची सतत जाणीव ठेवावी लागते. स्पेस स्टेशनमध्ये इकडून तिकडे जाण्याचं तंत्रही आत्मसात करावं लागतं. जमिनीवर पार रोवून उभं राहणं ही कल्पनाच तेथे नसल्याने एखाद्या यंत्राचा वापर पिंवा ते बिघडलं तर दुरुस्त करण्याची साधी क्रियाही कठीण होते. तिथल्या छोटय़ा कपाटाचं दार उघडून, आत काहीतरी ठेवून पिंवा काढून ते बंद करण्याची सोपी वाटणारी गोष्ट कठीण बनते.

थोडक्यात, यानात तरंगणारे अंतराळवीर पाहायला वाटते तशी ‘मजा’ तिथे काम करताना असत नाही. हळूहळू अंतराळयात्री त्या परिस्थितीला (वातावरणाला म्हणता येत नाही. कारण तिथे वातावरण नसतंच) सरावतात. अनेक दिवस तिथे राहत महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग करतात. त्यामध्ये कोणत्या प्रकारची धान्ये तिथेच पिकवता येतील, कोणत्या भाज्या घेता येतील याचाही समावेश असतो. कारण केवळ यांत्रिक जीवनाने माणसाचं समाधान होत नाही. त्याला भरपेट खाणं लागतंच. त्याची सोय व्यवस्थित झाली की, मग आणखी पुढच्या गोष्टी सुचायला लागतात.

याबाबतीत विचार करणाऱयांत इलॉन मस्क आघाडीवर आहेत. त्यांच्या ‘स्पेस एक्स’ पंपनीने त्यांची ‘टेस्ला’ कार अंतराळात धाडलीच आहे. परंतु उद्या चंद्र-मंगळ पृष्ठावर कार चालवायच्या असतील पिंवा आणखी कशाची गरज भासणार असेल तर त्याची निर्मितीही तिथेच करावी लागेल.

यासाठी उपयुक्त ठरणारं एक अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणजे थ्रीडी प्रिंटिंग. एखाद्या वस्तूचं चित्र आणि कमांड दिल्यावर दुसरीकडच्या यंत्रातून त्या आकाराबरहुपूम वस्तू तयार करण्याची क्षमता त्यात असते. त्यासाठी लागणारं ‘मटेरियल’ (सामग्री) नेलं की झालं. त्यामुळे कदाचित ‘पे लोड’ पिंवा चांद्र-मंगळ पृष्ठावर पाठवण्याची यंत्रं पिंवा बांधकाम सामग्री पिंवा अन्य काही यांच्या वजनाची चिंता करण्याची गरज नाही.

सध्या मात्र मस्क यांच्या फाल्कन-ए रॉकेटने ‘नासा’तर्फे अंतराळ स्थानकावर ‘थ्रीडी बायोलॉजिकल प्रिंटर’ पाठवण्याचं ठरवलं आहे. ही स्पेस रॉकेटची 18 वी अंतराळवारी आहे. त्यातून डझनभर वैज्ञानिक प्रयोगांचीही सामग्री जात असून त्यापैकी मानवी अवयवांची पृत्रिम निर्मिती करणाऱ्या थ्रीडी प्रिंटरचा समावेश आहे. माणसाच्या शरीरातील केशाकर्षणाची यंत्रणा पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे कठीण असल्याने वजनरहित अवस्थेत त्याची संरचना (स्ट्रक्चर) करता येते का याचा प्रयोग केला जाईल. यापूर्वी एका फिरत्या हॅण्डलची निर्मिती तेथे अशा प्रिंटिंगमधून झाल्याचं दिसलं. याशिवाय माणसाला खाद्यान्न म्हणून उपयुक्त ठरेल अशा ‘मॉस’चं (शेवाळासारखी वनस्पती) उत्पादन स्पेस स्टेशनवर करता येईल का याचेही प्रयोग चाललेत.

‘नासा’ने 20 जुलैला चांद्रविजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्यावर पाच दिवसांनी स्पेस एक्सच्या रॉक्सचं रॉकेट अंतराळात झेपावलं. बोइंग पंपनी आणि स्पेस एक्स यांनी ‘नासा’शी अंतराळवीर अवकाशात नेण्याचा करार केला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अशा आणखी टेस्ट फ्लाइट पाठवल्या जाऊ शकतात.

आता अंतराळात विहार करणं ही दिवसेंदिवस सोपी गोष्ट होणार आहे. पूर्वी पाश्चात्त्य आणि पौर्वात्य देशांच्या तंत्रज्ञानातील प्रगतीत अनेक वर्षांचं (दशकांचं) अंतर असायचं. सध्या अमेरिकेत सुरू असलेली अंतराळयात्रा स्पर्धा उद्या जगभर पसरेल. आपण आजच एकावेळी 104 उपग्रह ‘इस्रो’द्वारे सोडण्याचा विचार केला आहे. यापुढच्या काळात जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा कोणी बाळगणार नाही. अतंराळ भ्रमणाची आणि चंद्र-मंगळावर जाण्याची स्पर्धा मात्र निश्चितच वाढेल.

आपली प्रतिक्रिया द्या