मधाच्या गोडव्याचे कडू वास्तव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनीता नारायण

मधात ‘शुगर सिरप’च्या भेसळीचा छडा लावल्यानंतर उद्योग जगतातून पुस्तकी प्रतिक्रिया आल्या. जगभरातील बिझनेस स्पूलमध्ये जे शिकविले जाते तेच या कंपन्यांनी सांगायला सुरुवात केली, परंतु मध हे इतर उत्पादनांपेक्षा वेगळे आहे. पूरक आणि पोषक घटक म्हणून मध घेतला जातो. त्यात औषधी गुण असतात आणि त्यात साखरेची भेसळ करण्याचा अर्थ आहे आरोग्याशी खेळ करणे. उद्योग जगत ताकदवान आहे याची आम्हाला जाणीव आहे, परंतु आपले आरोग्य आणि मधमाश्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे याचीही जाणीव आम्ही ठेवली आहे.

जो मध आपण गुणवत्तापूर्ण आणि आरोग्यवर्धक म्हणून सेवन करतो, त्यात साखर मिसळलेली आहे. या भेसळीचा छडा लावणे अवघड असते. कारण चीनमधील कंपन्यांनी एक असे ‘शुगर सिरप’ तयार केले आहे, जे हिंदुस्थानी प्रयोगशाळांमध्ये मधाच्या तपासणीत ‘पास’ होऊ शकते. कोविड-19 च्या संसर्गामुळे आपले सर्वांचे आरोग्य मुळातच धोक्यात आले आहे. या कालावधीत मधाची विक्री वाढली आहे. कारण मध रोगप्रतिकार शक्ती वाढवितो तसेच अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबॉइल गुणांमुळेही मध औषधी मानला जातो. परंतु आपण मधाऐवजी साखरेचे सेवन करीत आहोत आणि ते आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण साखरेमुळे आपले वजन वाढते. सरासरीपेक्षा अधिक वजन असलेल्या लोकांना कोविड-19 शी संबंधित त्रासांचा धोका अधिक प्रमाणात आहे, याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत.

या घटनेचा दुसरा अर्थ असाही आहे की, मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करणाऱयांचे थेट आर्थिक नुकसान होत आहे. जर ते या व्यवसायातून बाहेर फेकले गेले तर त्यांनी पाळलेल्या मधमाश्याही पुचकामी ठरतील आणि त्यांची परागीकरणाची सेवाही व्यर्थ ठरेल. जर मधमाश्यांनी एका रोपाकडून दुसऱया रोपाकडे परागकण वाहून नेण्याचे कार्य बंद केले तर खाद्यान्नाच्या उत्पादकतेत प्रचंड घसरण होईल. त्यामुळेच मधातील ही भेसळ म्हणजे गुन्हाच आहे. ही भेसळ उघड झाल्यानंतर उद्योग जगतातून काय प्रतिक्रिया येईल, याचा अंदाज मी बांधू शकते. सर्व निर्धारित निकषांचे पालन आपल्याकडून होत असल्याचा खुलासा ते करतील. बडे ब्रँड मानली जाणारी उत्पादने प्रयोगशाळेत तपासणी झालेली असतात. मग त्यात भेसळ झाली असे कसे म्हणता येईल, असाही युक्तिवाद केला जाईल, परंतु आपण तसे म्हणू शकतो. कारण त्यासाठी व्यापक तपासण्या झालेल्या आहेत. खाद्यबाजार आता फारसा चांगला राहिलेला नाही, हेच यातून दिसून येते.

मधुमक्षिका पालकांचा रोजगार जात आहे, हे जेव्हा आम्हाला समजले होते तेव्हाच त्याचे कारणही समजले होते, परंतु कोणी त्याविषयी बोलू इच्छित नव्हता. कोणीही चिनी कंपन्यांचे आणि शुगर सिरपचे नाव घेऊ इच्छित नव्हता. मे महिन्यात हिंदुस्थानी खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ‘शुगर सिरप’ आयात करणाऱयांना निर्देश जारी केले आणि अशा सिरपची भेसळ मधात केली जात असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे सांगितले. खाद्य आयुक्तांनाही प्राधिकरणाने तपासण्या वाढविण्याच्या सूचना केल्या. प्राधिकरणाने ज्या शुगर सिरपचा उल्लेख केला होता, त्याचा उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयातील आयात-निर्यातसंबंधीच्या आकडेवारीत कुठेच उल्लेख सापडत नाही, परंतु त्याविरोधात आवाज उठविणे सुरूच राहिले. फेब्रुवारीमध्ये सरकारने आयात केलेल्या मधाची प्रयोगशाळेत अतिरिक्त चाचणी करणे अनिवार्य केले. याअतिरिक्त चाचणीचे नाव आहे ‘न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेजोनेन्स स्पेक्ट्रोस्कोपी’ म्हणजेच एनएमआरएस. जेव्हा मधात ‘शुगर सिरप’ची भेसळ केलेली असण्याचा संशय असतो तेव्हा ही चाचणी घेतली जाते हे आम्हाला माहीत होते. ही भेसळ उघड करणे सोपे नसते, म्हणूनच ही चाचणी करायला सांगितले जाते.

हा आपल्या आरोग्याशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे आपण हा तसाच सोडून देऊ शकत नाही. तपासणीत भेसळ उघड होऊ न देणारे ‘शुगर सिरप’ खुलेआम विकणाऱया चिनी कंपनीची वेबसाइट जेव्हा आम्हाला सापडली, तेव्हा आमच्या प्रयत्नांना पहिले यश आले. हा एक धंदाच होऊन बसला आहे हे आम्हाला त्या वेळी लक्षात आले. सुरुवातीला भेसळीसाठी मका आणि ऊस अशा वनस्पतींपासून तयार केलेल्या ‘शुगर सिरप’चा वापर केला होता. या वनस्पती सी-4 फोटोसिंथेसिस प्रक्रियेचा अवलंब केला जातो. जेव्हा ही भेसळ उघड होऊ लागली तेव्हा सी-3 फोटोसिंथेसिस प्रक्रियेचा अवलंब करणाऱया वनस्पतींपासून म्हणजेच भात आणि बीट यांसारख्या वनस्पतींपासून तयार केलेल्या नव्या प्रकारच्या गोडव्याचा वापर केला जाऊ लागला. परंतु विज्ञानाच्या मदतीने मधातील याही भेसळीचा छडा लावला गेला. आता ऑनलाइन चिनी पोर्टलवर कंपन्यांचा असा दावा आहे की, त्यांनी सी-3 आणि सी-4 शुगर टेस्ट पास होऊ शकेल, अशी पद्धत शोधून काढली आहे. हिंदुस्थानात ज्या कंपन्या ‘फ्रक्टोस सिरप’ निर्यात करतात, त्या याच कंपन्या याच होत. परंतु त्यांच्या अंतिम ग्राहकाचा शोध आम्हाला घेता आला नव्हता. हे सिरप अनेक प्रकारच्या औद्योगिक उत्पादनांसाठी आयात केले जाते. म्हणजेच वरवर पाहता हा वैध व्यवसाय होता.

मधात भेसळ होत असल्याचा अहवाल आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर उद्योग जगतातून आम्हाला ‘पुस्तकी’ प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत. जगभरातील बिझनेस स्पूलमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याच या प्रतिक्रियांमधून सांगितल्या जात आहेत. शब्दांचे अवडंबर रचून ग्राहकांना भ्रमित करणे आणि आपली उत्पादने स्वच्छ तसेच सुरक्षित असल्याचे सांगणे असा प्रयत्न या प्रतिक्रियांमध्ये दिसतो, परंतु ग्राहकसुद्धा जागृत आहे. मध इतर उत्पादनांप्रमाणे नाही. तो पोषक आणि पूरक आहार म्हणून वापरला जाणारा घटक आहे. त्यात औषधी गुण असतात आणि त्यात साखरेची भेसळ करण्याचा अर्थ आहे आरोग्याशी खेळ करणे. उद्योग जगत ताकदवान आहे याची आम्हाला जाणीव आहे, परंतु आपले आरोग्य आणि मधमाश्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे याचीही जाणीव आम्ही ठेवली आहे, ठेवलीच पाहिजे.

हिंदुस्थानी यंत्रणा विशेषतः सीमा शुल्क विभाग कसे काम करतो, हे चिनी पंपन्यांना ठावूक होते. एका कंपनीने आम्हाला ‘पेंट पिगमेंट’च्या नावाखाली आम्हाला हा नमुना पाठवला. ‘फ्रक्टोस सिरप’ची आयात कमी झाली असल्याचे आम्हाला गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानींनी संबंधित तंत्रज्ञान चीनकडून खरेदी केले आहे. आम्ही पुढील शोध सुरू केला आणि आता हे सिरप बाजारात ‘ऑल पास सिरप’ या नावावर उपलब्ध आहे, याचा शोध आम्हाला लागला. सर्व चाचण्या पास करू शकेल असे हे सिरप असल्याचे त्याच्या नावातूनच ध्वनित होत आहे. आम्ही या सिरपची प्रयोगशाळेत चाचणी घेतली आणि खरोखर ते ‘पास’ झाले. त्यातून या घातक धंद्याचा पुरता पर्दाफाश झाला. आम्ही ज्या प्रसिद्ध 13 ब्रँडस्ची तपासणी एनएमआरएस तंत्राद्वारे केली त्यातील अधिकांश ब्रँडस् ‘नापास’ झाले. 2020 मध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘एफआरएसएआय’च्या नव्या निकषांमध्ये मात्र हे ब्रँड ‘पास’ झाले होते. आम्ही ज्या जर्मन प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी केली त्या प्रयोगशाळेने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की, या नमुन्यांमध्ये शुगर सिरप मिसळलेले आहे.