ठसा – विद्या बाळ

955

महिलांच्या चळवळीला विशेष योगदान देणाऱया विद्या बाळ यांचे गांधी पुण्यतिथी दिवशीच झालेले निधन पुढील अनेक पिढय़ांना कायम स्मरण करून देईल. स्त्रीसक्षमता आणि पुरुषांना बरोबर घेऊन माणूस म्हणून पुढे जाण्यासाठी त्यांनी केलेली धडपड खूप मोठी आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, त्यांनी त्यांच्या स्तंभलेखनात म्हटलं आहे…‘1964 पासून सुरू झालेला पत्रकारितेबरोबरचा माझा प्रकास गेली 50 वर्षे चालूच आहे. हे माझं सगळ्यात मोठं प्रेयसही आहे आणि श्रेयसही. शाळकरी अभ्यासात मराठी भाषा आवडायची. निबंधलेखनात मन रमायचं. या आवडीच्या बीजांना अंकुरण्याची आणि मोहोरण्याची मिळालेली संधी मी इतकी वर्षे उपभोगते आहे. पत्रकारितेनं मला गरज असूनही फारसा पैसा दिला नाही. पण त्यापलीकडचं एवढं अमोल असं काही दिलं आहे की, पैसा नाही म्हणून त्यापासून दूर जाण्याचा विचार माझ्या स्वप्नातही आला नाही. म्हणूनच ‘स्त्री’मधल्या स्थिर नोकरीतून बाहेर पडल्याकर एका परीनं बिनआधाराचा ‘मिळून साऱयाजणी’चा वेडा वाटणारा घाट मी घातला. मला लख्ख उमगलं होतं की, ‘स्त्री’ची नोकरी सोडली तरी तिनं जागवलेली स्त्रीप्रश्नांची जाण आणि पत्रकारिता मी विसरू शकत नाही. स्वतःमधल्या आणि परिवर्तनाच्या दिशेनं नेणारी हीच वाट आहे हे मी समजून चुकले होते.’ प्रचंड आत्मविश्वास आणि धडाडीनं काम करणाऱया विद्या बाळ यांचे कार्य तमाम महिलांना आदर्श वाटेवरून जायला शिकविते.

पुण्यातील फर्ग्युसन महाकिद्यालयातून विद्या बाळ यांनी 1958 मध्ये बी.ए. (अर्थशास्त्र्ा) ही पदवी घेतली. पुणे आकाशवाणीकर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून त्यांनी दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर 1964 ते 1983 या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या सहाय्यक-संपादक झाल्या आणि 1983 ते 86 या काळात मुख्य संपादक होत्या. तेथून बाहेर पडल्याकर त्यांनी ऑगस्ट 1989 मध्ये ‘मिळून साऱयाजणी’ हे मासिक सुरू केले. हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले. या मासिकाद्वारे स्त्रीयांचे विश्व उलगडत त्यांनी महिलांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत समाजप्रबोधन केले. स्त्रीयांच्या समस्या सोडवता याव्यात यासाठी त्यांनी ‘नारी समता मंच’ ही संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्त्र्ायांच्या समस्यांकर चर्चा झाली. याबरोबरच स्त्रीयांना बोलण्यासाठी हक्काची जागा हवी या उद्देशाने विद्या बाळ यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. या कार्याला पुरुषांची साथ मिळावी यासाठी त्यांनी 2008 साली ‘पुरुष संवाद केंद्र’ही सुरू केली. महिलांच्या समस्यांसाठी कार्य करताना त्यांनी एक सक्रिय समाजसेविका म्हणून व्यापक पातळीवर काम केले. विद्याताईंनी ‘मिळून साऱयाजणी’ मासिकाशी संलग्न ‘सखी मंडळा’ची स्थापनाही केली. ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय,’ ‘साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,’ ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या संस्थांही त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन असे चौफेर लेखनही त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. चळवळीत काम करताना विद्या बाळ यांच्यावर टीका झाली. पण त्या म्हणतात, ‘याच चळवळीमुळे मला नैरोबी, ब्रायटन, बोस्टन, श्रीलंका अशा परदेशांतल्या स्त्र्ायांच्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील ‘मदर ऑफ विमेन्स मूव्हमेंट’- बेटी फ्रीडनला, इजिप्तच्या डॉ. नवाब अल सादवीला भेटण्याची संधी मिळाली. ससेक्स विद्यापीठात त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिपमुळे ‘विमेन, मेन ऍण्ड डेव्हलपमेंट’ हा अभ्यासक्रम करता आला. देश-विदेशातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी, परिषदा यामुळे क्षितिज विस्तारलं. जगणं समृद्ध आणि श्रीमंत होत राहिलं. त्याबरोबरच आपण कुठे आहोत, आणखी केवढा पल्ला गाठायचा आहे याचं भान आलं.’ सर्वसामान्य महिलांना आपलंस करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचं काम त्यांनी करून ठेवलं. त्यांच्या या कार्याची दखल समाजाने घेतली. स्त्रीवादी चळवळीत केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांचे स्त्रीवादी चळवळीतील अग्रणी अशा शब्दांत सार्थ गौरव करण्यात आला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विद्या बाळ यांचा ‘आत्रेय’तर्फे ‘शिरीष पै पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र फाऊंडेशनने ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांच्या जाण्याने स्त्रीवादी चळवळीच्या एक खंबीर अग्रणी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या