आता पोलीस दलात ‘एआय’चा वापर करणार; गुन्हेगाराचा माग काढून गुन्ह्यांची उकल करणे होणार गतिमान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर यांच्यासोबत एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला असून या माध्यमातून गुह्यांची उकल तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापनासाठी याचा वापर करता येणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यामुळे गुह्याची उकल करणे अधिक गतिमान होणार आहे.

कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी आणि पोलीस दल अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलले जाणार आहे. दरम्यान, या संदर्भात एक मॉडेल तयार करण्यात आले असून त्याचे प्रेझेंटेशन पोलीस दलातील काही प्रमुख अधिकाऱयांसमोर करण्यात आले. या संदर्भात फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, यामध्ये आम्ही सरकारची एक कंपनी तयार केली आहे. ही पंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा कायदा सुव्यवस्थाकरिता, गुह्याची उकल करण्यासाठी करणार आहे.

जिथे पाऊस तेथील पोलीस भरती स्थगित
राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती सुरू होणार आहे. राज्यातील 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. मात्र, ही पोलीस भरती भर पावसाळ्यात घेण्यात येत असून उमेदवारांना मैदानी कसरत करता येत नाही. मैदानात चिखल साचला आहे. त्यामुळे जिथे जिथे पाऊस असेल तिथे भरती स्थगित करण्यात येणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी मुंबईत सायबर डिटेक्शन सेंटर
देशातले आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर महापे येथे लवकरच सुरू होत आहे. या सर्व व्यवस्थेतून देशातले एक आधुनिक पोलीस दल हे महाराष्ट्राचे होईल, असे फडणवीस म्हणाले.